ETV Bharat / science-and-technology

Twitter To Pay Content Creators : आता कंटेन्ट क्रियटरला ट्विटर देणार पेमेंट, एलन मस्क यांनी 'इतक्या' निधीची केली तरतूद - लिंडा याकारिनो

ट्विटर आपल्या कंटेंट क्रिएटरला आता पेमेंट करणार असल्याची घोषणा एलन मस्क यांनी केली आहे. त्यासाठी ट्विटरने 5 मिलियनचा निधी ठेवला आहे. मात्र पडताळणी केलेल्याच कंटेंट क्रिएटरला हे पेमेंट करण्यात येणार असल्याचे एलन मस्क यांनी जाहीर केले आहे.

Twitter To Pay Content Creators
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 10, 2023, 12:51 PM IST

हैदराबाद : ट्विटरने आपल्या कंटेंट क्रिएटरला पेमेंट देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ट्विटर आपल्या कंटेंट क्रिएटरला जाहिरातीसाठी पेमेंट करणार आहे. यासाठी ट्विटरने 5 मिलियनचा निधी राखीव ठेवला असून केवळ पडताळणी केलेल्या यूझरलाच हे पेमेंट करण्यात येणार असल्याची माहिती एलन मस्क यांनी शनिवारी ट्विट करुन दिली आहे.

  • In a few weeks, X/Twitter will start paying creators for ads served in their replies. First block payment totals $5M.

    Note, the creator must be verified and only ads served to verified users count.

    — Elon Musk (@elonmusk) June 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एलन मस्क यांनी केली होती घोषणा : ट्विटरवर कंटेंट क्रिएटरला पेमेंट करण्याचे एलन मस्क यांनी जाहीर केले होते. त्यानंतर एलन मस्क यांनी बुधवारी ट्विट करुन ट्विटरवर कंटेन्ट क्रिएट करणाऱ्या यूझरला पडताळणी करुन ई मेल आयडी देण्यात येतील, असेही या ट्विटमध्ये एलन मस्क यांनी नमूद केले होते. एखाद्या कंटेन्ट क्रिएटरला ट्विटर सोडायचे असल्यास ते आपल्या प्रक्रिया पूर्ण करुन सहज ट्विटर सोडू शकतील, असेही एलन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

यूझरला गोपनीयतेबद्दल चिंता : ट्विटरवर कंटेंट क्रिएटरला पेमेंट करण्याच्या एलन मस्कच्या घोषणेनंतर अनेक जणांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. यानंतर एलन मस्क यांच्या घोषणेमुळे यूझर आणि कंटेन्ट क्रिएट करणाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान प्रचंड वादविवाद करण्यात आला. काही यूझरने गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त केली. इतर प्लॅटफॉर्मवर त्यांचे सदस्य असल्याने त्यांच्यासाठी उलट काम करणे शक्य आहे का, असा प्रश्नही काहीजण एलन मस्क यांना विचारताना दिसले. मात्र डेटा कोणत्या फॉरमॅटमध्ये शेअर केला जाईल, याबाबत मोजक्याच यूझरने प्रश्न विचारला आहे.

लिंडा याकारिनो यांनी घेतला पदभार : एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची सीईओ पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. पराग अग्रवाल यांच्या हकालपट्टीनंतर एलन मस्क यांनी लिंडा याकारिनो यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती केली आहे. एलन मस्क यांनी लिंडा या पराग अग्रवाल यांच्यापेक्षा खूप चांगल्या कार्यक्षम असल्याचे स्पष्ट केले आहे. एलन मस्क यांनी लिंडा याकारिनो यांच्याकडे ट्विटरच्या सीईओची पदाची जबाबदारी दिली आहे. एलन मस्क यांना टेस्ला आणि स्पेसएक्सवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी लिंडा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवल्याची चर्चा जाणकार करत आहेत. मात्र ट्विटरच्या जाहिरातीमध्ये यूएसमध्ये मोठी घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये तब्बल 59 टक्क्यांनी ट्विटरच्या जाहिराती घसरल्या आहेत. अशा स्थितीत लिंडा याकारिनो यांनी ट्विटरच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

नवीन सीईओपुढे आव्हान : 1 एप्रिल ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ट्विटरची अमेरिकेतील जाहिरातींची कमाई 88 दशलक्ष डॉलर होती. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 59 टक्क्यांनी ही कमाई कमी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जाहिरात विक्रीत घट होत राहणार असल्याचा अंदाज कंपनीच्या अंतर्गत समितीने नोंदवला आहे. त्यामुळे नवीन सीईओपुढे हे मोठे आव्हान असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप आयओएस बीटा वर नवीन 'अपडेट्स' टॅब आणणार
  2. Instagram Update : इंस्टाग्राम स्टोरी आयकॉनचा आकार अचानक वाढला, यूजर्सने दिल्या प्रतिक्रिया
  3. Facebook Instagram verified account : ट्विटरनंतर फेसबुकसह इन्स्टाग्रामवरदेखील वापरकर्त्यांना मोजावे लागणार पैसे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.