नवी दिल्ली : ट्वीटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी शनिवारी सांगितले की, ट्विटरचे ओपन सोर्स अल्गोरिदम पुढील महिन्यात उघड होईल. ट्वीटरवर सध्या बऱ्याच लोकांना अॅप वापरण्यास व लॉग इन करण्यात अनेक अडचणी येत आहेत. मस्क म्हणाले की, ट्विटर ट्विट शिफारस कोड प्रकाशित करेल. यामुळे पुढील महिन्यापासून खाते/ट्विटची स्थिती पाहता येईल.
-
Twitter will publish tweet recommendation code & make account/tweet status visible no later than next month.
— Elon Musk (@elonmusk) January 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Transparency builds trust.
">Twitter will publish tweet recommendation code & make account/tweet status visible no later than next month.
— Elon Musk (@elonmusk) January 13, 2023
Transparency builds trust.Twitter will publish tweet recommendation code & make account/tweet status visible no later than next month.
— Elon Musk (@elonmusk) January 13, 2023
Transparency builds trust.
थर्ड पार्टी ट्विटर टूल्स वापरणाऱ्या लोकांना समस्या : ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी पोस्ट केले की, पारदर्शकता विश्वास निर्माण करते. ते म्हणाले की कंपनी पुढील आठवड्यात इमेज लेंथ क्रॉप आणि इतर किरकोळ दोष दूर करेल. मस्क म्हणाले की, बुकमार्क देखील सर्च करता येतील. दरम्यान, Tweetbot सारखे थर्ड पार्टी ट्विटर टूल्स वापरणाऱ्या लोकांना लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. Tapbots द्वारे Tweetbot ने पोस्ट केले की Tweetbot आणि इतर ग्राहकांना Twitter वर लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. आम्ही अधिक माहितीसाठी Twitter वर संपर्क साधला आहे परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
-
We’re aware that Twitterrific is having problems communicating with Twitter. We don’t yet know what the root cause is, but we’re trying to find out. Please stay tuned and apologies.
— Twitterrific (@Twitterrific) January 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We’re aware that Twitterrific is having problems communicating with Twitter. We don’t yet know what the root cause is, but we’re trying to find out. Please stay tuned and apologies.
— Twitterrific (@Twitterrific) January 13, 2023We’re aware that Twitterrific is having problems communicating with Twitter. We don’t yet know what the root cause is, but we’re trying to find out. Please stay tuned and apologies.
— Twitterrific (@Twitterrific) January 13, 2023
हेही वाचा : Lenovo Tab P11 5G : लेनोवो ने लॉन्च केला 5जी अँड्रॉइड टॅबलेट, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
ट्विटर सपोर्टकडून अद्याप प्रतिसाद नाही : एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, 'आम्ही आशा करतो की ही केवळ एक तात्पुरती चूक आहे. आम्हाला अधिक माहिती मिळताच आम्ही तुम्हाला अपडेट देवू.' आणखी एक थर्ड पार्टी ट्विटर अॅप, Twitterrific, ने पोस्ट केले की त्यांना Twitter शी कनेक्ट करण्यात येणाऱ्या समस्यांची जाणीव आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्हाला अद्याप त्याचे मूळ कारण काय आहे हे माहित नाही, परंतु आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया संपर्कात रहा. मस्क किंवा ट्विटर सपोर्टने अद्याप त्रुटीला प्रतिसाद दिला नाही. थर्ड पार्टी ट्विटर अॅप डेव्हलपर्स समस्यांबद्दल तक्रार करण्यासाठी प्रतिस्पर्धी प्लॅटफॉर्म Mastadon वर गेले आहेत.
हेही वाचा : Twitter New Feature : ट्विटर वापरकर्त्यांना लवकरच लाँग फॉर्म ट्विटची मिळेल सुविधा