ETV Bharat / science-and-technology

Four Different Autism Subtypes : ऑटिझमचे उपप्रकार शोधण्यात संशोधकांना यश, मेंदूसह वागणुकीवर करतात परिणाम

ऑटिझम आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांच्या मेंदू आणि वर्तनात अनेकवेळा फरक असल्याचे संशोधकांना आढळून येते. मात्र आता संशोधकांनी ऑटिझम आजाराचे चार उपप्रकारात विभाजन केले आहे.

Autism Subtypes
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 10, 2023, 2:22 PM IST

न्यूयॉर्क : ऑटिझम आजाराने अनेक मुलांना ग्रासल्यामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ऑटिझम आजारामुळे आत्मकेंद्रीत होण्यात वाढ होऊन त्यांना इतर कोणाचाही सहवास नकोसा होतो. मात्र संशोधकांनी ऑटिझमचे आणखी चार उपप्रकार शोधून काढले आहेत. वेल कॉर्नेल मेडिसिनच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले असून हे संशोधन नेचर न्यूरोसायन्समध्ये 9 मार्चला प्रकाशित झाले आहे. विशेष म्हणजे ऑटिझम असलेल्या 299 नागरिकांच्या आणि ऑटिस्टिक नसलेल्या 907 नागरिकांच्या न्यूरोइमेजिंग डेटाचे विश्लेषण करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला.

संशोधकांना आढळले चार उपप्रकार : वेल कॉर्नेल मेडिसिन येथील संशोधकांनी ऑटिझम ग्रस्तांमध्ये शाब्दिक क्षमता, सामाजिक प्रभाव आणि वर्तन यासारख्या वर्तनात्मक वैशिष्ट्यांशी संबंधित मेंदू कनेक्शनचे नमुने शोधले. यावेळी त्यांनी चार ऑटिझम उपप्रकार वेगळ्या डेटासेटमध्ये प्रतिरूपित केले जाऊ शकत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी प्रादेशिक जनुक अभिव्यक्ती आणि प्रथिने परस्पर संवादातील फरक मेंदू आणि वर्तणुकीतील फरकांना कारणीभूत असल्याचे दाखवून दिले.

निदान आणि उपचारांसाठी येऊ शकतात नवीन पद्धती : अनेक न्यूरोसायकियाट्रिक निदानांप्रमाणे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या नागरिकांना सामाजिक संवाद, संवाद आणि वर्तणुकीसह विविध प्रकारच्या अडचणी येतात. कदाचित ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे त्यावर वेगवेगळ्या उपचारांची आवश्यकता असू शकते. परंतु यावर एकमत नसल्याचे वेल कॉर्नेल मेडिसिन येथील संशोधक डॉ. कॉनर लिस्टन यांनी यावेळी स्पष्ट केले. आमचे संशोधन ऑटिझमचे उपप्रकार शोधण्यासाठी एक नवीन दृष्टीकोन हायलाइट करते. त्यामुळे एक दिवस निदान आणि उपचारांसाठी नवीन पद्धती येऊ शकतात असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ऑटिझम आहे जनुकांशी संबंधित अनुवांशिक स्थिती : नेचर मेडिसिनमधील डॉ. लिस्टन आणि संशोधकांनी 2017 मध्ये संशोधन केले होते. या संशोधनात त्यांनी उदासीनतेचे चार जैविकदृष्ट्या वेगळे उपप्रकार ओळखण्यासाठी समान मशीन लर्निंग पद्धती वापरल्या होत्या. यावेळी ऑटिझमने ग्रस्त नागरिक विविध नैराश्याच्या उपचारांना वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असल्याचे स्पष्ट झाले होते. तुम्ही नैराश्याने ग्रस्त नागरिकांना योग्य गटात ठेवल्यास त्यांना सर्वोत्तम थेरपी देऊ शकता असे वेल कॉर्नेल मेडिसिनच्या मानसोपचार शास्त्रातील संशोधक डॉ. अमांडा बुच यांनी स्पष्ट केले. ऑटिझम ही शेकडो जनुकांशी संबंधित अनुवांशिक स्थिती आहे. यावर मर्यादित उपचारात्मक पर्याय आहेत. याची तपासणी करण्यासाठी डॉ बुच यांनी जनुक अभिव्यक्ती डेटा आणि प्रोटीओमिक्ससह न्यूरोइमेजिंग डेटा एकत्रित करण्यासाठी नवीन विश्लेषण केले आहे.

हेही वाचा - Twitter Stops Substack Links : ट्विटरची सबस्टॅक लिंक नाही सुरक्षित; ट्विटरने उचलले 'हे' पाऊल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.