ETV Bharat / science-and-technology

Scientists Develop Mini Heart : अहो आश्चर्यम . . शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत मिनी हार्ट केले विकसित, जाणून घ्या कसे करते काम - टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक

जर्मन संशोधकांनी मिनी हार्ट तयार केले असून हे हृदय 0.5 मिलिमिटर आकाराचे आहे. हृदयविकारावरील नवीन उपचार पद्धती शोधण्यास या हृदयामुळे सोपे झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

Scientists Develop Mini Heart
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 20, 2023, 4:23 PM IST

लंडन : विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे अनेक नवीन नवीन शोध लावण्यात आले आहेत. आता तर संशोधकांनी मिनी हार्ट तयार केले आहे. जर्मन शास्त्रज्ञांनी मानवी हृदयाच्या सुरुवातीच्या विकासाच्या टप्प्याचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन केले आहे. रोगांवरील संशोधन सुलभ करण्यासाठी फक्त 0.5 मिलिमीटर आकाराचे 'मिनी-हार्ट' विकसित करण्यात आले आहे. टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक (टीयूएम) च्या संशोधकांनी ऑर्गनॉइड म्हणून ओळखले जाणारे 'मिनी हृदय' यशस्वीरित्या तयार केले आहे. यामुळे हृदयाच्या स्नायू पेशी आणि हृदयाच्या बाहेरील थराच्या पेशी बाबत महत्वाची माहिती मिळणार आहे.

हृदयाच्या कक्षेप्रमाणे आकुंचन होण्यास सक्षम : संशोधकांनी बनवलेले हे मिनी हृदय रक्त पंप करत नसले तरी ते विद्युतीय पद्धतीने उत्तेजित केले जाऊ शकते. हे हृदय मानवी हृदयाच्या कक्षेप्रमाणे आकुंचन करण्यास सक्षम आहेत. हृदयाच्या ऑर्गनॉइड्सच्या इतिहासात पहिल्यांदा 2021 मध्ये वर्णन केले गेले. संशोधकांनी यापूर्वी हृदयाच्या भिंतीच्या (एंडोकार्डियम) आतील थरातील कार्डिओमायोसाइट्स आणि पेशी असलेले ऑर्गनॉइड्स तयार केले होते.

प्लुरिपोटेंट स्टेम सेल्स वापरून बनवले मिनी हार्ट : हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगातील रिजनरेटिव्ह मेडिसिनचे संशोधक अलेसेन्ड्रा मोरेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. या संशोधकांनी टीमने प्लुरिपोटेंट स्टेम सेल्स वापरून 'मिनी हार्ट' बनवण्याची पद्धत विकसित केली. एका सेंट्रीफ्यूजमध्ये सुमारे 35 हजार पेशी एका गोलामध्ये कातल्या जातात. काही आठवड्यांच्या कालावधीत एका निश्चित प्रोटोकॉल अंतर्गत सेल कल्चरमध्ये भिन्न सिग्नलिंग रेणू जोडले जात असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. आम्ही शरीरातील सिग्नलिंग मार्गांची नक्कल करुन हृदयासाठी विकास कार्यक्रम नियंत्रित करत असल्याचेही मोरेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. या बाबतचे संशोधन नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यासह ते नेचर बायोटेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. वैयक्तिक पेशींच्या विश्लेषणाद्वारे उंदरांमध्ये नुकत्याच सापडलेल्या पूर्ववर्ती पेशी ऑर्गनॉइडच्या विकासाच्या सातव्या दिवशी तयार होत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.

हृदयविकारावर नवीन उपचार पद्धती शोधण्यात मदत : उंदरांमध्ये नुकत्याच सापडलेल्या पूर्ववर्ती पेशी मानवी शरीरात देखील अस्तित्वात असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या अंतर्दृष्टीतून हृदय स्वतःची दुरुस्ती का करू शकते याचे संकेत देखील देऊ शकतात. ही क्षमता प्रौढ व्यक्तीच्या हृदयात जवळजवळ पूर्णपणे अनुपस्थित असते. हे ज्ञान हृदयविकाराचा झटका आणि इतर रोगांवर नवीन उपचार पद्धती शोधण्यात मदत करू शकतात असा दावाही संशोधक अलेसेन्ड्रा मोरेट्टी यांनी केला आहे. ऑर्गनॉइड्सचा वापर वैयक्तिक रुग्णांच्या आजारांची तपासणी करण्यासाठी केला जाऊ शकतो. नूनन सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या प्लुरिपोटेंट स्टेम पेशींचा वापर करून शरीराच्या विविध भागांमध्ये सामान्य विकासास प्रतिबंध करणारा अनुवांशिक विकारावरही केला जाऊ शकतो. येत्या काही महिन्यांत टीम इतर जन्मजात हृदय दोषांची तपासणी करण्यासाठी तुलनात्मक वैयक्तिक ऑर्गनॉइड्स वापरण्याची योजना आखत असल्याचेही यावेळी संशोधक अलेसेन्ड्रा मोरेट्टी यांनी केला आहे.

हेही वाचा - Dead Satellite To Crash Into Earth : मृत उपग्रह बुधवारी कोसळणार पृथ्वीवर, मानवाला धोका नसल्याचे नासाने केले स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.