मॉस्को- कोरोनावरील सर्वात स्वत लस कोणत्या देशाची असेल, याचीही स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. रशियाची स्पूटनिक व्ही ही कोरोनावरील लस ही फायझर आणि मॉर्डनच्या लसीहून स्वस्त असणार आहे. ही माहिती रशियन सरकारच्या विभागाने ट्विट करून दिली आहे.
फायझरच्या कोरोनावरील लसची किंमत १९.५० डॉलर आहे. तर मॉर्डना लसची किंमत २५ ते ३७ डॉलर आहे. मात्र फायझरच्या लसीची एका व्यक्तीसाठी ३९ डॉलर किंमत आहे. तर मॉर्डना लसीची किंमत एका व्यक्तीसाठी ५० ते ७४ डॉलर आहे. कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी फायझर, स्पूटनिक व्ही आणि मॉर्डना लसीचे प्रत्येकी दोन डोस घ्यावे लागतात. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडच्या (आरडीआयएफ) प्रवक्त्याने स्पूटनिक व्हीच्या किमतीबाबत ट्विट केले आहे. आरडीआयएफ ही रशियाचा सार्वजनिक संपत्ती निधी संस्था आहे. पुढील आठवड्यात स्पूटनिक व्हीच्या लसीची किंमत जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा-सिरमची कोरोनावरील लस 'या' वर्षापर्यंत सर्व भारतीयांना मिळणार
दरम्यान, कोरोनाच्या लसीला जगात पहिल्यांदा रशियन सरकारने ऑगस्टमध्ये मंजुरी दिली आहे. या लसीची मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्यासाठी रशियन सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडिमॉलॉजी आणि रशियाच्या जैवविज्ञान मंत्रालयाने विकसित केली आहे.
हेही वाचा-आपत्कालीन स्थितीत लसीच्या वापराकरता परवानगी द्यावी; 'या' कंपनीची अमेरिकन सरकारकडे मागणी
कोरोनाच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी २५ ऑगस्टला सुरू करण्यात आल्या आहेत. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार स्पूटनिक व्हीमधून कोरोनाबरोबर लढण्यासाठी दोन वर्षांपर्यत प्रतिकारक्षमता तयार होत असल्याचे सिद्ध झाले आहे. या लसीच्या उत्पादनाची पहिली बॅच १२ सप्टेंबरला तयार झाल्याचे रशियातील स्थानिक वृत्तसंस्थेने म्हटले आहे.