सॅन फ्रांन्सिस्को : अॅपलने आपले विविध लॅपटॉप लाँच करुन ग्राहकांना आकर्षित केले आहे. आता अॅपल पुन्हा एकदा बाजारात आपला लंबी बॅटरी लाईफ असलेला लॅपटॉप आगामी काळात लाँच करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अॅपलच्या ब्रँडवरही लंबी बॅटरी लाईफ असलेल्या लॅटपटॉपचा अनुभव घेता येईल. या लॅपटॉपमध्ये एम २ चिप समाविष्ट करण्यात आल्याची माहितीही कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
काय असतील या लॅपटॉपची वैशिष्टे : अॅपल मॅकबुक एअर एप्रिल 2023 मध्ये मोठ्या 15 इंच डिस्प्लेसह नवीन मॅकबुक एअर रिलीज करणार आहे. या मॅकबुकचा डिस्प्ले विश्लेषक रॉस यंग यांनी लॅपटॉप M2 चिप या मॅकबुकमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यात वाय-फाय 6A आणि ब्लूटूथ 5.3 ला सपोर्ट करेल अशी सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती मॅकरुमर्सच्या अहवालात देण्यात आली आहे. या मॅकबुकमध्ये ओएलईडी १३ इंच डिस्प्लेसह हा लॅपटॉप मॅकबुक एअर २०२३ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. तर 15 इंच मॉडेलमध्ये एलसीडी डिस्प्ले असल्याची माहितीही या अहवालातून देण्यात आली आहे.
अठरा तासांपर्यंत चालेल बॅटरी : मॅकबुक एअर लॅपटॉप १३ इंचाच्या प्रमाणेच १५ इंचाच्या डिस्प्ले मॉडेलमध्ये एम2 चिपसह उपलब्ध असल्याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे. एम १ ( M1 ) च्या चिपच्या तुलनेत एम २ ( M2 ) चिपमध्ये 18 टक्के वेगवान जीपीयू असणार आहे. तर 35 टक्क्यांपर्यंत वेगवान सीपीयूची सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. 40 टक्क्यांपर्यंत वेगवान न्यूरल इंजिन असल्याचेही यावेळी अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय नवीन मॅकबुक एअर ( MacBook Air ) अधिक बॅटरी लाइफ हा लॅपटॉप देऊ शकते. अॅपलच्या कंपनीने एम2 चिपसह 13 इंच मॅकबुक एअर एकावेळी चार्ज केल्यास 18 तासांपर्यंत चालत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे 15 इंच मॉडेल 20 तासांची बॅटरी लाईफ एकदा चार्ज केल्यानंतर देऊ शकत असल्याचेही कंपनीच्या दावा करण्यात आला आहे.
वायफायसह असेल ब्लू टूथ सपोर्ट : अॅपलच्या मॅकबुक एअर या लॅपटॉपमध्ये एम २ चीपसह १३ इंच मॅकबुक एअर वाय-फाय 6 पर्यंत मर्यादित असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर 15 इंच मॅकबुक एअरला वायफाय 6 ई मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. टेक जायंटने मागील महिन्यात एम2 चिप आणि वायफाय 6ई सह मॅक मिनी अद्ययावत केले होते. कंपनीने त्यांच्या अनेक उपकरणांमध्ये ब्लूटूथ 5.3 सपोर्ट देखील जोडला आहे. तर 15 इंच मॅकबुक एअरमध्ये त्याच्या पुढचे व्हर्जनही समाविष्ट करण्यात येऊ शकते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - WhatsApp New Feature : यूजर्सचे मेसेज गायब होण्यापासून वाचवेल व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर्स