ETV Bharat / science-and-technology

नासाच्या रोवरने मंगळावरून सेल्फीसह पाठविले रंगीत फोटो

नासाने म्हटले आहे की, क्यूरोसिटी रोवरने मंगळ ग्रहावर उतरताना स्टॉम मोशन फिल्म पाठविली आहे. तर पर्सेव्हिरेन्स रोवरच्या कॅमेराने टचडाऊनचा व्हिडिओ कैद केला आहे. यावरून काही छायाचित्रे काढण्यात आली आहेत. ही छायाचित्रे पृथ्वीवर पाठविण्यात आली आहेत.

मंगळ मोहिम
मंगळ मोहिम
author img

By

Published : Feb 20, 2021, 3:53 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेची अंतराळ कंपनी नासाच्या पर्सेविरेन्स रोवरने मंगळ ग्रहावरून काही आश्चर्यजनक छायाचित्रे पाठविली आहेत. हे यान मंगळावर उतरताना हायरिझोल्यूशनचे रंगीत फोटोही पाठविले आहेत. हा सेल्फी अनेक कॅमेरांमधून काढलेल्या व्हिडिओचा भाग आहे. नासाचे पर्सेव्हिरेन्स रोवर १८ फेब्रुवारीला मंगळावर उतरले आहे.

नासाने म्हटले आहे की, क्यूरोसिटी रोवरने मंगळ ग्रहावर उतरताना स्टॉम मोशन फिल्म पाठविली आहे. तर पर्सेव्हिरेन्स रोवरच्या कॅमेराने टचडाऊनचा व्हिडिओ कैद केला आहे. यावरून काही छायाचित्रे काढण्यात आली आहेत. ही छायाचित्रे पृथ्वीवर पाठविण्यात आली आहेत.

rover laning on mars
रोवर मंगळावर उतरताना

पर्सेव्हिरेन्स रोवरने बहुतांश रंगीत छायाचित्रे पाठविले आहेत. यापूर्वी रोवरने पाठविलेली छायाचित्रे कृष्णधवल होती. एका फोटोमध्ये रोव्हरचे चाक मंगळावरील माती साफ करत असल्याचे दृश्य आहे. मंगळावर पर्सेव्हिरेन्स रोवर मोहिमेमागे अंतराळ विज्ञानाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. त्यामध्ये प्राचीन सूक्ष्मजंतुच्या जीवनाचा शोध घेणे हा उद्देश आहे.

Rover cleaning Mars surface
रोव्हर मंगळावरील माती स्वच्छ करताना

रोवरमधून मंगळ ग्रहावरील वातावरण आणि भूविज्ञानाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न आहे. तसेच नवीन मानवी संशोधनाच्या वाटा शोधल्या जाणार आहेत. त्यासाठी मंगळावरील डोंगरावरून माती आणि धूळ गोळा केली जाणार आहे.

Nasa scientists
मंगळावरील मोहिमेची संशोधकाकडून देखरेख

नासा, युरोपियन अंतराळ संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून मंगळावरील नमुने हे पृथ्वीवर आणले जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये अभियंते रोवरमधील सिस्टिम डाटा अपडेट करणार आहेत. त्याशिवाय विविध सॉफ्टवेअर आणि विविध उपकरण अपडेट करणार आहेत. येत्या काही महिन्यांत पर्सेव्हेरिन्स रोवर रोबोटिक हातांमधून परीक्षण करण्यात येणार आहे. रोवर यान हे कमीत कमी दोन महिने त्याठिकाणी राहणार आहे. त्यानंतर विज्ञानाची नवीन मोहीम सुरू होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मंगळाच्या डोंगरावरील मातीचे नमुने घेतले जाणार आहेत.

मंगळावरील -दृश्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.