ETV Bharat / science-and-technology

McDonalds Layoff News : मॅकडोनाल्ड्सचे यूएस कार्यालय तात्पुरते बंद; मोठ्या प्रमाणावर केली टाळेबंदीची तयारी - LAYOFF

मॅकडोनाल्ड मोठ्या प्रमाणावर टाळेबंदीची तयारी करत आहे. यासाठी कंपनीने यूएस कार्यालय तात्पुरते बंद केले आहे. ज्याचा परिणाम शेकडो भारतीय कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अधिक माहितीसाठी संपूर्ण बातमी वाचा.

McDonalds Layoff News
मॅकडोनाल्ड्सने यूएस कार्यालय तात्पुरते बंद
author img

By

Published : Apr 3, 2023, 5:28 PM IST

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या फास्ट-फूड चेन कंपनीपैकी एक असलेली मॅकडोनाल्ड्स कामगार छाटणीच्या टप्प्यात सामील होणार आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. मॅकडोनाल्ड या आठवड्यात अमेरिकेतील सर्व कार्यालये तात्पुरती बंद करणार आहे.

कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना टाळेबंदी : मॅकडोनाल्डने गेल्या आठवड्यात आपल्या कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला होता. ज्यामध्ये सोमवार ते बुधवारपर्यंत त्यांना घरून काम करावे लागेल, असे सांगण्यात आले होते. अहवालानुसार कंपनीने हा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ती आपल्या कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना टाळेबंदीच्या नवीन फेरीबद्दल सूचित करू शकेल. मात्र, किती कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र बुधवारपर्यंत कपातीची घोषणा होणे अपेक्षित आहे.

मॅकडोनाल्ड्सने मेलमध्ये काय लिहिले : मॅकडोनाल्डने मेलमध्ये लिहिले आहे की, '3 एप्रिलच्या आठवड्यात, आम्ही संपूर्ण संस्थेतील कर्मचारी स्तरांशी संबंधित प्रमुख धोरणात्मक निर्णयांबद्दल माहिती देऊ. कर्मचार्‍यांना या आठवड्यात नियोजित सर्व वैयक्तिक बैठका रद्द करण्यास देखील सांगण्यात आले आहे.

'या' कंपन्यांमध्ये करण्यात आली टाळेबंदी : टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत. यामध्ये गुगल, अ‍ॅमेझॉन, फेसबुकसह अनेक मोठ्या टेक कंपन्यांचा समावेश आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, जागतिक आर्थिक मंदी आणि वाढत्या महागाईमुळे कंपन्या टाळेबंदीचा निर्णय घेत आहेत. या छाटणीच्या युगात, त्यामध्ये खंड पडण्याची शक्यता फारच कमी आहे.

छाटणीचा भारतीयांवर परिणाम होत आहे : अमेरिकेतील छाटणीचा परिणाम केवळ अमेरिकन नागरिकांवर होत नाही. भारतीयांवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर राहणारे शेकडो भारतीय कामगार बेरोजगार झाले आहेत. नवीन व्हिसा मिळविण्यासाठी त्यांच्याकडे फारच कमी वेळ शिल्लक आहे. लक्षात घ्या की H-1B व्हिसा धारक जे आपली नोकरी गमावतात (बेरोजगार) त्यांना प्रायोजित करण्यासाठी नवीन नियोक्ते न शोधता कायदेशीररित्या केवळ 60 दिवस यूएसमध्ये राहू शकतात.

हेही वाचा : Twitter's verified checkmark : ट्विटर सत्यापित चेकमार्क 'या' संस्थेसाठी असू शकतो विनामूल्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.