ETV Bharat / science-and-technology

Accenture Company Layoffs : मेटा पाठोपाठ एक्सेंचर देणार १९ हजार कर्मचाऱ्यांना नारळ - संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी

मेटाने आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर आता संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या एक्सेंचरने आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची घोषणा केली आहे. एक्सेंचरने आपल्या १९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.

Accenture Company Layoffs Of
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 24, 2023, 2:15 PM IST

नवी दिल्ली : जागतिक मंदिचा फटका जगभरातील उद्योगांना बसत आहे. त्यामुळे मेटा पाठोपाठ आता मोठमोठ्या उद्योग समुहातील कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येत आहे. संगणक क्षेत्रातील अग्रगण्य असलेली एक्सेंचर ही कंपनीही आता आपल्या १९ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. त्यामुळे उद्योग जगतात खळबळ उडाली आहे.

एक्सेंचरचे सीईओ ज्युली स्वीट यांनी केली घोषणा : एक्सेंचर या कंपनीच्या महसुलात २०२३ च्या तिमाहीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युली स्वीट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कंपनीचा महसूल कमी झाल्यामुळे कंपनीने आपल्या १९ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वर्ष २०२३ च्या दुसर्‍या तिमाहीत कंपनीने वार्षिक महसूल वाढ आणि नफ्याचा अंदाज देखील कमी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खर्च कमी करण्यासाठी नोकरकपात : जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी आम्हाला नोकर कपात करणे भाग असल्याचे कंपनीचे सीईओ ज्युली स्वीट यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही आर्थिक वर्ष 2024 आणि त्यापुढील खर्च कमी करण्यासाठी पावले उचलत आहोत. आम्ही व्यवसायात गुंतवणूक करणे सुरू ठेवत असलो, तरी जागतिक मंदीमुळे काही निर्णय घेणे भाग पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीची वार्षीक कमाई 15.8 अब्ज डॉलर होती, त्यामध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन बुकिंग 22.1 अब्ज डॉलर होती, त्यामध्ये 13 टक्के वाढ झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कर्मचाऱ्यांसह कार्यालयाचेही करणार समायोजन : एक्सेंचरने आपल्या १९ हजार करमाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कंपनीने या कर्मचाऱ्यांसह कार्यालयही कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युली स्वीट यांनी स्पष्ट केले आहे. कार्यालयातील काम सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कंपनीने बिल न करता येणाऱ्या कॉर्पोरेट फंक्शन्सचा खर्च करण्यावर भर दिला आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत व्यवसाय ऑप्टिमायझेशन खर्चामध्ये 244 दशलक्ष डॉलर नोंदवले आहेत. 2024 पर्यंत अंदाजे 1.5 अब्ज डॉलर एकूण खर्च नोंदवण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Google Messages New Feature : Google Messages ला लवकरच मिळेल पुन्हा डिझाइन केलेला व्हॉइस रेकॉर्डर UI

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.