सॅन फ्रान्सिस्को- गुगल क्रोमच्या नव्या फीचरची कंपनीकडून चाचणी घेण्यात येत आहे. डेस्कटॉप शेअरिंग हब अथवा क्रोम शेअरिंग मेन्यू असे या नवीन फीचरचे नाव आहे.
डेस्कटॉपवरील मेन्यू हा अनेक पद्धतीने शेअर करण्यावर गुगल कंपनी काम करत आहे. त्यासाठी सोप्या पद्धतीने इंटरफेस आणण्यात येणार असल्याचे एका टेक माध्यमाने म्हटले आहे.
क्रोम शेअरिंगचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर वापरकर्त्याला क्यूआर कोड मिळविणे, डिव्हाईस शेअर करणे आणि कास्टिंग टॅब असे पर्याय उपलब्ध होणार आहेत. तसेच पेज हे दुसऱ्या डिव्हाईसवरील व्यक्तीला शेअर करता येणार आहे. सध्या क्रोम कॅनरीमध्ये शेअरिंग हब डेस्कटॉप ओम्नीबॉक्स आणि क्रोम ९२ मध्ये केवळ क्रोम शेअरिंगचा पर्याय उपबब्ध आहे.
हेही वाचा-नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश
गुगल क्रोमची उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न-
गुगल क्रोममधील फीचरची उत्पादकता वाढविण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. विंडोजचे नाव बदलणे, टॅब ग्रुप्स हे यापूर्वी क्रोममध्ये बदल करण्यात आले होते. गुगलकडून क्रोमबुकमधील वैशिष्ट्यातही भर टाकण्यात येत आहे.
हेही वाचा-तामिळनाडू : स्टरलाईट कॉपर कंपनीमधून ऑक्सिजनचे उत्पादन सुरू
गुगलकडून भारतीय एसएमई उद्योगांना १०९ कोटींची मदत जाहीर
दरम्यान, कोरोनाच्या काळात लघू आणि सूक्ष्म उद्योगांना मदतीचा हात देण्यासाठी गुगल कंपनी पुन्हा पुढे आली आहे. गुगलने भारतामधील सूक्ष्म आणि लघू उद्योगांना १५ दशलक्ष डॉलरची (१०९ कोटी रुपये) मदत करण्याचे फेब्रुवारी २०२१ मध्ये जाहीर केले आहे.