श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश): Gaganyaan इस्रोच्या गगनयान मानव अंतराळ उड्डाण कार्यक्रमांतर्गत पहिली क्रू मॉड्यूल चाचणी उद्या आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्राच्या प्रक्षेपण पॅडवर होणार आहे. सिंगल-स्टेज लिक्विड रॉकेट, TV-D1 साठी सर्व काही तयार आहे. शनिवारी चाचणी लॉन्च केली जाईल. चाचणी उड्डाण उद्या सकाळी 7.30 वाजल्यापासून थेट पाहता येईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) सांगितलं.
-
Mission Gaganyaan:
— ISRO (@isro) October 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
TV-D1 Test Flight
The test flight can be watched LIVE
from 0730 Hrs. IST
on October 21, 2023
at https://t.co/MX54CwO4IUhttps://t.co/zugXQAYy1y
YouTube: https://t.co/75VtErpm0H
DD National TV@DDNational#Gaganyaan pic.twitter.com/ktomWs2TvN
">Mission Gaganyaan:
— ISRO (@isro) October 19, 2023
TV-D1 Test Flight
The test flight can be watched LIVE
from 0730 Hrs. IST
on October 21, 2023
at https://t.co/MX54CwO4IUhttps://t.co/zugXQAYy1y
YouTube: https://t.co/75VtErpm0H
DD National TV@DDNational#Gaganyaan pic.twitter.com/ktomWs2TvNMission Gaganyaan:
— ISRO (@isro) October 19, 2023
TV-D1 Test Flight
The test flight can be watched LIVE
from 0730 Hrs. IST
on October 21, 2023
at https://t.co/MX54CwO4IUhttps://t.co/zugXQAYy1y
YouTube: https://t.co/75VtErpm0H
DD National TV@DDNational#Gaganyaan pic.twitter.com/ktomWs2TvN
क्रू मॉड्यूल सिस्टम : त अंतराळ संस्थेचे उद्दिष्ट आहे की, तीन दिवसांसाठी मानवांना 400 किमीच्या पृथ्वीच्या कक्षेत अंतराळात पाठवायचे म्हणजे ते पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येतील. चाचणी वाहन (TV-D1) शनिवारी सकाळी 8 वाजता श्रीहरिकोटा येथील पहिल्या लॉन्च पॅडवरून निघेल. क्रू मॉड्यूल सिस्टम ही मानवी राहण्यायोग्य जागा आहे. जी क्रूच्या सुरक्षिततेसाठी आणि जगण्यासाठी अंतराळात पृथ्वीसारख्या वातावरणासह तयार केली जाते. या क्रू मॉड्यूलसह चाचणी वाहन मोहीम संपूर्ण गगनयान कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण जवळजवळ संपूर्ण यंत्रणा उड्डाण चाचणीसाठी एकत्रित केलेली आहे. क्रू मॉड्यूल (सीएम) हे गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना पृथ्वीसारख्या दबावाखाली असलेल्या वातावरणात ठेवले जाते, असे इस्रोनं म्हटलं आहे.
परतताना हे मॉड्यूल बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल : ही चाचणी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून घेतली जाईल. यामध्ये क्रू मॉड्यूलचे उड्डाण, त्याचे लँडिंग आणि समुद्रातून पुनर्प्राप्ती यांचा समावेश असेल. हे क्रू परतताना बंगालच्या उपसागरात उतरवले जाणार आहे. यासाठी नौदल जवानांची डायव्हिंग टीम तयार करण्यात आली आहे. याशिवाय या मोहिमेसाठी एक जहाजही तयार करण्यात येणार आहे. आदित्य-L1 चे सूर्याकडे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर भारताचा जगभरातील आघाडीच्या देशांमध्ये समावेश होणार आहे.
क्रू एस्केप जीव वाचवेल : इस्रोच्या म्हणण्यानुसार, फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन 1 ची तयारी पूर्ण झाली आहे. मिशनमध्ये कोणतीही अनुचित घटना घडल्यास अंतराळवीरांना वाचवण्यासाठी ही क्रू-एस्केप प्रणाली उपयुक्त ठरेल. टेक-ऑफ दरम्यान मिशन एरर असल्यास यंत्रणा क्रू मॉड्यूलसह वाहनापासून वेगळी होईल. काही काळ उड्डाण करून श्रीहरिकोटापासून 10 किमी अंतरावर समुद्रात उतरेल. त्यात उपस्थित असलेल्या अंतराळवीरांना नौदलाकडून समुद्रातून सुखरूप परत आणले जाईल.
हेही वाचा :