हैदराबाद Aditya L1 mission : सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली अंतराळ मोहीम आदित्य एल 1 नं शुक्रवारी पहाटे चौथ्या कक्षेत प्रवेश केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) ही माहिती दिली आहे. स्पेस एजन्सीनं 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'पृथ्वी कक्षा बदलण्याची प्रक्रिया (EBN-4) यशस्वीरित्या पार पडली. मिशन दरम्यान इस्रोच्या मॉरिशस, बेंगळुरू, SDSC-SHAR आणि पोर्ट ब्लेअर येथील 'ग्राउंड स्टेशन्स' यांनी उपग्रहाचं निरीक्षण केलं.
-
Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) September 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The fourth Earth-bound maneuvre (EBN#4) is performed successfully.
ISRO's ground stations at Mauritius, Bengaluru, SDSC-SHAR and Port Blair tracked the satellite during this operation, while a transportable terminal currently stationed in the Fiji islands for… pic.twitter.com/cPfsF5GIk5
">Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) September 14, 2023
The fourth Earth-bound maneuvre (EBN#4) is performed successfully.
ISRO's ground stations at Mauritius, Bengaluru, SDSC-SHAR and Port Blair tracked the satellite during this operation, while a transportable terminal currently stationed in the Fiji islands for… pic.twitter.com/cPfsF5GIk5Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) September 14, 2023
The fourth Earth-bound maneuvre (EBN#4) is performed successfully.
ISRO's ground stations at Mauritius, Bengaluru, SDSC-SHAR and Port Blair tracked the satellite during this operation, while a transportable terminal currently stationed in the Fiji islands for… pic.twitter.com/cPfsF5GIk5
कक्षा बदल आता 19 सप्टेंबर रोजी होईल : इस्रोनं सांगितलं की 'पुढील कक्षा बदल 19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता होईल.' आदित्य-L1 ही पहिली भारतीय अंतराळ-आधारित प्रयोगशाळा आहे जी पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या पहिल्या सूर्य-पृथ्वी Lagrangian पॉइंट (L1)भोवती प्रभामंडल कक्षेतून सूर्याचा अभ्यास करणार आहे. पृथ्वीच्या कक्षेतील बदलाची पहिली, दुसरी आणि तिसरी प्रक्रिया अनुक्रमे 3, 5 आणि 10 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पार पडली.
16 दिवसांचा प्रवास : आदित्य-L1च्या पृथ्वीभोवती 16 दिवसांच्या प्रवासादरम्यान ही प्रक्रिया पूर्ण होत असते. यादरम्यान आदित्य-L1 त्याच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक गती प्राप्त करते. आता या चौथ्या कक्षेतील भ्रमण पूर्ण झाल्यावर आदित्य-L1 ला पृथ्वीच्या कक्षेतून निरोप देण्याची वेळ येईल. त्यावेळी आदित्य-L1 पुढे ट्रान्स-लॅग्रांगियन 1 इन्सर्ट ऑर्बिटल इन्सर्शन प्रक्रियेतून जाईल. म्हणजेच अंतराळात ही प्रयोगशाळा विशिष्ठ बिंदूवर स्थिरावेल.
या महिन्यात झाले होते लाँच : भारतीय अंतराळ संस्था ISROनं 2 सप्टेंबर रोजी भारताची पहिली सौर मोहीम आदित्य-L1 लाँच केली. ISRO नं PSLV C57 प्रक्षेपण वाहनातून आदित्य L1 चं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण झालं.
आदित्य-एल वन चा प्रवास उत्तम सुरू : इस्रोची सूर्य मोहीम आदित्य-एल वन चा प्रवास (आदित्य-एल1) उत्तम सुरू आहे. याची माहिती देण्यासाठी त्याने आपला सेल्फी आपल्यासाठी पाठवला आहे. त्याचे सर्व कॅमेरे व्यवस्थित काम करत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्याने पृथ्वी आणि चंद्राची छायाचित्रेही घेतली आहेत. तसंच व्हिडिओ बनवला आहे. इस्रोनं एक्सवर त्याच्या पोस्ट टाकल्या आहेत. आदित्य-एल1 18 सप्टेंबरपर्यंत पृथ्वीभोवती चौथ्या कक्षेतील भ्रमण पूर्ण करुन आपली कक्षा बदलेल. एकदा आदित्य L1 त्याच्या उद्देश स्थळी पोहोचले की ते दररोज 1440 फोटो पाठवेल. जेणेकरून सूर्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करता येईल. आदित्यमध्ये स्थापित कोरोनाग्राफ (VELC)द्वारे ही छायाचित्रे घेतली जातील.
हेही वाचा :