वॉशिंग्टन : चंद्र ते मंगळ कार्यक्रम कार्यालयाचे पहिले प्रमुख म्हणून भारतीय वंशाच्या रोबोटिक्स अभियंत्याची नासाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. अमित क्षत्रिय असे त्या भारतीय वंशाच्या रोबोटिक्स अभियंत्याचे नाव आहे. भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय हे मंगळ आणि चंद्रावर करण्यात येणाऱ्या मोहिमांचे नेतृत्व करणार असल्याने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मानवतेच्या फायद्यासाठी चंद्र आणि मंगळावर नासाचे मानवी शोध उपक्रम राबवण्याचे नवीन कार्यालयाचे उद्दिष्ट असल्याचे नासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मंगळावर आखणार धाडसी मोहीम : चंद्र ते मंगळ कार्यक्रम कार्यालय चंद्रावर आमची धाडसी मोहीम पार पाडण्यासाठी नियोजन करणार असल्याची माहिती नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. मंगळावर पहिले मानव उतरवण्यासाठी हे नासाला हे कार्यालय मदत करेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हे नवीन कार्यालय मंगळ ग्रहावर नासाची मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी योग्य ते नियोजन करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वैज्ञानिक शोधाचे नवीन युग : नासाने 2020 मध्ये चंद्र ते मंगळ कार्यक्रम योजना आखली आहे. हे कार्यालय वैज्ञानिक शोधाचे नवीन युग उघडण्यासाठी चंद्रावरील आर्टेमिस मोहिमेसाठी काम करणार आहे. या मोहिमेच्या प्रोग्रामसाठी हे कार्यालय हार्डवेअर विकास, मिशन एकत्रीकरण आणि जोखीम व्यवस्थापन कार्यांवर लक्ष केंद्रित करते. मंगळावरील मानवी मोहिमांसाठी तयारी करण्याची जबाबदारी या कार्यालयाची असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यामध्ये स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेट, ओरियन स्पेसक्राफ्ट, सपोर्टिंग ग्राउंड सिस्टम, मानवी लँडिंग सिस्टम, स्पेससूट्स, गेटवे आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित अधिक गोष्टींचा समावेश असल्याचेही नासाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मंगळावर मानवी मोहिमांना यशस्वी करण्याचे नियोजन : नवीन कार्यालय मंगळावर मानवी मोहिमांचे नियोजन आणि विश्लेषणाचे नेतृत्व करेल. हे कार्यालय एक्सप्लोरेशन सिस्टम्स डेव्हलपमेंट मिशन डायरेक्टरेट (ESDMD) च्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. या कार्यालयाचे उपसहकारी प्रशासक म्हणून नियुक्त अमित क्षत्रिय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या सहयोगी प्रशासक जिम फ्रीला आपल्या कामाचा अहवाल देतील.
अमित क्षत्रिय यांचा यशस्वी प्रवास : अमित क्षत्रिय यांनी यापूर्वी कॉमन एक्सप्लोरेशन सिस्टीम डेव्हलपमेंटसाठी उपसहयोगी प्रशासक म्हणून काम केले आहे. अमित क्षत्रिय हे आता नवीन कार्यालयात येणार्या अनेक कार्यक्रमांमध्ये नेतृत्व करणार आहेत. चंद्र आणि मंगळावरील मानवी मोहिमांसाठी कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी अमित क्षत्रिय हे जबाबदार असणार आहेत. मोहिमांचे नियोजन, विकास आणि ऑपरेशन्स ( ESDMD ) सुसंगत असल्याची खात्री करण्यासाठी ते कार्यक्रमांचे नेतृत्व करतील. अमित क्षत्रिय यांनी 2003 मध्ये स्पेस प्रोग्राममध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी सॉफ्टवेअर अभियंता, रोबोटिक्स अभियंता आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेटर म्हणूनही काम केले आहे. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या रोबोटिक असेंब्लीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. 2014 ते 2017 पर्यंत त्यांनी स्पेस स्टेशन फ्लाइट डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. त्यांनी उड्डाणाच्या सर्व टप्प्यांमध्ये स्पेस स्टेशनच्या ऑपरेशन्स आणि अंमलबजावणीमध्ये जागतिक संघांचे नेतृत्व केले. 2017 ते 2021 पर्यंत ते आयएसएसच्या वाहन कार्यालयाचे कार्यवाहक व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. 2021 मध्ये त्यांना एक्सप्लोरेशन सिस्टम्स डेव्हलपमेंट मिशन डायरेक्टोरेटमधील नासाच्या मुख्यालयात सहाय्यक प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
हेही वाचा - Water Found on Moon : चंद्रावर पाण्याचा सापडला नवीन स्रोत; चांद्र मोहिमेवरील संशोधकांचा दावा