ETV Bharat / science-and-technology

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन 2023; जाणून घ्या इतिहास आणि उद्देश - ध्वज दिन 2023

Armed Forces Flag Day : ध्वज दिन निधीची स्थापना 1949 मध्ये भारतीय संरक्षण मंत्री समितीनं केली होती. राष्ट्राच्या अखंडतेचं आणि सुरक्षेचं रक्षण करणाऱ्या हुतात्म्यांच्या कल्याणासाठी जनतेला ध्वज वितरित करणं आणि सशस्त्र दलांच्या विकासासाठी निधी उभारणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Indian Armed Forces Flag Day 2023
भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 1:57 PM IST

हैदराबाद : भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन भारतात दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे रक्षण तीन सैन्य (नौदल, लष्कर आणि हवाई दल) करतात. भारतीय लष्कर ध्वज दिन प्रत्यक्षात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो. या दिवशी त्या शहीद आणि शूर सैनिकांचा सन्मान केला जातो ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी शत्रूंशी लढा दिला आणि देशाच्या नावावर सर्वस्व अर्पण केले.

या दिवसाचा इतिहास काय आहे? भारतावर अनेक दशके ब्रिटीशांची राजवट होती. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यानंतर भारताची स्वतःची राज्यघटना तयार करण्यात आली. भारताला लोकशाही देश म्हणून नियुक्त करण्यात आलं. मग देशाची सीमा हे सर्वात मोठं आव्हान म्हणून आपल्यासमोर आलं. त्यासाठी लष्कराची निर्मिती झाली, ती सातत्यानं बळकट करण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी भारत सरकारनं भारतीय लष्करातील सैनिकांच्या कल्याणासाठी एक समिती स्थापन केली. जेणेकरुन देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी आपण काही खास करू शकू. या समितीनं लोकांमध्ये छोटे झेंडे वाटून पैसे गोळा केले. या ध्वजांना तीन रंग होते (लाल, हिरवा आणि निळा). हे रंग तिन्ही सैन्यांचे प्रतीक आहेत.

सशस्त्र ध्वज दिन फक्त ७ डिसेंबरलाच का साजरा केला जातो? ध्वज दिन निधीची स्थापना 1949 मध्ये भारतीय संरक्षण मंत्री समितीनं केली होती. राष्ट्राच्या अखंडतेचं आणि सुरक्षेचं रक्षण करणाऱ्या हुतात्म्यांच्या कल्याणासाठी जनतेला ध्वज वितरित करणं आणि सशस्त्र दलांच्या विकासासाठी निधी उभारणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. या विश्वासानं, सशस्त्र सेना ध्वज दिन प्रथमच 7 डिसेंबर 1949 रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो. 1993 मध्ये, भारतीय संरक्षण मंत्रालयानं सर्व संबंधित कल्याण निधी एकाच सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये विलीन केला.

समिती पैसे का गोळा करत होती? ध्वजांच्या माध्यमातून देणगी गोळा करण्यामागे समितीचे तीन मुख्य उद्देश होते. प्रथम, युद्धादरम्यान झालेल्या जीवितहानीवर सहकार्य करणे. दुसरे म्हणजे, लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण आणि समर्थन करणे आणि तिसरे म्हणजे, सेवानिवृत्त जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण करणे.

हेही वाचा :

  1. 'जागतिक दिव्यांग दिन' 2023; जाणून घ्या इतिहास, थीम आणि महत्त्व
  2. भारतीय नौदल दिन 2023; सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी नौदल सज्ज
  3. जागतिक मृदा दिवस 2023; जाणून घ्या का साजरा केला जातो, महत्त्व काय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.