ETV Bharat / science-and-technology

Omicron Sub Variants : ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीतून कसा पडतो बाहेर, जाणून घ्या सविस्तर माहिती

ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक पेशींना टाळून बाहेर पडण्यासाठी अधिक चांगले असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंटचा जास्त त्रास झाला आहे.

Omicron Sub Variants
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 13, 2023, 12:32 PM IST

न्यूयॉर्क : कोरोना विषाणूमुळे अनेक भारतीयांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर ओमिक्रॉनच्या संसर्गाने धुमाकूळ घातला. त्यामुळे नागरिकांना ओमिक्रॉनसह त्याच्या सबव्हेरियंटचाही सामना करावा लागला. मात्र नागरिकांनी लसीकरण केल्यानंतरही ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंटच्या संसर्गाने आजार वाढवला. याबाबत संशोधकांनी ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट अँटीबॉडीजमध्ये असलेल्या किलर टी पेशी टाळून नागरिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. टी पेशी या रोगप्रतिकारक पेशी असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट टी पेशींना करतात लक्ष्य : कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन घेतले होते. काही नागरिकांनी तर बुस्टर डोसही घेतले आहेत. मात्र त्यानंतरही ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंटने त्यांना बाधित केले. त्यामुळे ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट कसे काम करतात, याबाबत अमेरिकेच्या याले विद्यापीठातील संशोधकांनी आपल्या संशोधनात याबाबत विश्लेषण केले आहे. या संशोधकांनी व्हायरसचे तुकडे सादर करणाऱ्या एमएचसी ( Major Histocompatibility Complex ) रेणूंची हालचाल मोजली. हे एमएचसी रेणू टी पेशींना सतर्क करतात. त्यानंतर ते रोगप्रतिकार शक्ती असलेल्या या टी पेशींना लक्ष्य करतात, असा दावा या संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी एमएचसी रेणूंची क्रिया SARS CoV 2 च्या पाच ओमिक्रॉन सबव्हेरियंट विषाणूच्या पूर्वीच्या आवृत्त्यांच्या संपर्कात असलेल्या पेशींमध्ये लक्षणीयरित्या कमी होत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.

टी पेशी विषाणू शोधण्याची शक्यता कमी : कोरोनाच्या अगोदरचे व्हेरियंट कमी कमकुवत होते. मात्र ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट वातावरणाशी जुळवून घेण्यात पटाईत आहेत. संशोधकांना आढळलेले ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट कोविड-19 विषाणूच्या पूर्वीच्या आवृत्त्यांच्या तुलनेत एमएचसीची प्रक्रिया बंद करण्यात विशेष पारंगत होते. फ्लू विषाणूने संक्रमित पेशींमध्ये एमएचसीची क्रिया या संशोधकांना जास्त असल्याचे आढळून आले. या एमएचसी रेणूंमधील क्रिया कमी केल्याने टी पेशी कोविड विषाणूचे लक्ष्य शोधण्याची शक्यता कमी करू शकतात असा दावाही या संशोधकांनी केला आहे.

अँटीबॉडी प्रतिसादात ठरू शकतात मार्गदर्शक : व्हायरल इन्फेक्शनद्वारे एमएचसी रेणू विषाणूवर मात करण्याच्या संभाव्य मार्गांचा शोध घेताना हे निष्कर्ष संशोधकांना मार्गदर्शन करण्यास मदत करतील. टी पेशींना एकत्रित करणार्‍या लसींच्या विकासासह विषाणूंविरूद्ध अँटीबॉडी प्रतिसादातही ते मदत करू शकतात असा दावा याले विद्यापीठातील संशोधक मियू मोरियामा यांनी केला आहे.

हेवी वाचा - China First Death From H3N8 Virus : चीनमध्ये एच३एन८ विषाणूने वाढवले टेन्शन, पहिला बळी, महिलेचा झाला मृत्यू, कोंबड्यांपासून धोका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.