ETV Bharat / science-and-technology

Human Avian Influenza : 'या' आजारापासून रहा सावधान, देश विदेशात वाढले रुग्ण - H5N1 इन्फ्लूएंझाची लक्षणे

मानवी एव्हीयन इन्फ्लूएंझा ( H5N1 ) या आजाराचा प्रसार पोल्ट्री फार्ममधील आजारी कोंबड्यापासून मानवी वस्तीत होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. सध्या साथरोग आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

Human Avian Influenza
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 23, 2023, 1:04 PM IST

नोम पेन्ह : इन्फ्लूएंझा हा साथरोग असलेला फ्लू असून तो जगभरात कुठेही आढळून येतो. मात्र त्याचा प्रसार हा पोल्ट्री फार्ममधील आजारी कोंबड्यापासून मानवी वस्तीत होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. कंबोडीयातील प्री वेंग या परिसरातील एक ११ वर्षाच्या बालिकेला ताप आणि फ्लूची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र या मुलीचा मृत्यू मानवी एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे ( H5N1 ) झाल्याची आरोग्य मंत्रालयाच्या संसर्गजन्य रोग ( कम्युनिकेबल डिसीज ) नियंत्रण विभागाने माहिती दिली आहे.

H5N1 इन्फ्लूएंझाची लक्षणे : या बालिकेला ताप, खोकला आणि घसादुखीमुळे ही मुलगी 16 फेब्रुवारीला आजारी पडली होती. तिला 39 अंश सेल्सिअस ताप होती. तर खोकला आणि घसादुखीमुळे तिला खूपच त्रास होत असल्याची माहिती विभागाने बुधवारी एका निवेदनात दिली आहे. या बालिकेवर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. मात्र जलद श्वासोच्छवासामुळे तिची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे तिला नोम पेन्ह येथील राष्ट्रीय बालरोग रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.

मृत कोंबडी पासून दुर रहा : बालिकेला पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ येथे दाखल केल्यानंतरही तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र या बालिकेचा मृत्यू कशाने झाला याबाबतचे निदान करण्यासाठी २१ फेब्रुवारीला डॉक्टरांनी तिचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. याबाबतचा अहवाल २२ फेब्रुवारीला डॉक्टरांना मिळाला. यावेळी सदर बालिका H5N1 इन्फ्लूएंझाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. यानंतर वैद्यकीय विभाग खडबडून जागा झाला. त्यांनी नागरिकांसाठी निदेदन सादर करत आजारी किवा मृत कोंबडीला हात न लावण्याचे आवाहन केले. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेण्याचेही सूचवण्यात आले. विषाणूची लागण झाल्याचा संशय आल्यास लगेच ११५ वर कॉल करण्याचे सूचवल्याची वृत्त शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

धक्कादायक आकडेवारी : कंबोडीयामध्ये मृत बालिकेला H5N1 इन्फ्लूएंझाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही याची दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००३ ते २०१४ पर्यंतची कंबोडीयामधील धक्कादायक आकडेवारी जाहीर केला. या आकडेवारीनुसार कंबोडीयात H5N1 इन्फ्लूएंझाची ५६ प्रकरणे आढळून आली आहेत. त्यात H5N1 इन्फ्लूएंझाची लागण झालेल्या ३७ जणांचा मृत्यू झाल्याचेही उघड झाले. मात्र 2015 ते 2022 या काळात देशातील एकाही माणसाला या विषाणूची लागण झाली नसल्याचे जागतिक आरोग्य संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा - Salt Could Play A Key Role : मीठाबाबत माहिती नसलेली गोष्ट प्रथमच आली समोर, टेक्सासच्या अभ्यासकांनी केला 'हा' दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.