ETV Bharat / science-and-technology

गुगल आता ओपनआयला देणार टक्कर, जगातील सर्वात स्मार्ट एआय टूल जेमिनी केले लाँच - माणसांप्रमाणे विचार

Google Gemini AI : गुगलने आपले नवीन एआय टूल जेमिनी लाँच केले आहे. या टूलनंतर गुगलने एआयचे नवे पर्व सुरू केले आहे. त्यामुळे ओपनआयला गुगल स्पर्धा करण्यासाठी सज्ज होणार आहे.

Gemini GenAI model
नवीन AI टूल जेमिनी केले लाँच
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 1:39 PM IST

हैदराबाद : गुगलच्या एआय टूल जेमिनीमुळे कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आणखी तीव्र स्पर्धा होणार आहे. ओपन एआयच्या(OpenAI) चॅटजीपीटीनंतर (ChatGPT) गुगलने या वर्षाच्या सुरुवातीला एआय टूल बार्ड (Bard)लाँच केले. आता कंपनीने आपले नवीन एआय टूल 'जेमिनी' लाँच केले आहे. जेमिनी LLM म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉड्यूलवर काम करते. गुगलने जूनमध्ये झालेल्या I/O डेव्हलपर्स कॉन्फरन्स इव्हेंटमध्ये ह्या टूलची जगाला ओळख करून दिली होती. जेमिनी हे AI मॉडेल्सच्या विकासातील हे एक मोठे पाऊल आहे. त्याचा परिणाम सर्व गुगल उत्पादनांवर होईल. म्हणजे गुगलच्या सर्व उत्पादनांमध्ये 'जेमिनी'चा प्रभाव दिसेल असं नवीन टूल लाँच करताना गुगल डिपमाइंडचे सीईओ डेमिस हसाबिस म्हणाले.

तीन प्रकारात लाँच केले : कंपनीने गुगल जेमिनी तीन व्हर्जनमध्ये लॉन्च केले आहे. त्याची सर्वात लहान आवृत्ती नॅनो आहे. त्यामध्ये Android डिव्हाइसवर ऑफलाइनदेखील कार्य करण्याची क्षमता आहे. त्याचे जेमिनी प्रो असे व्हर्जनदेखील आहे. तुम्ही लवकरच हे गुगलच्या सर्व AI सेवांमध्ये पाहू शकाल. तुम्ही ते बार्डवर वापरू शकता. या सगळ्याच्यावर गुगल जेमिनी अल्ट्रा आहे. हे गुगलचे सर्वात शक्तिशाली AI टूल आहे. त्यात मानवासारख्या बुद्धिमत्तेच्या काही क्षमता आहेत. हे डेटा सेंटर आणि एंटरप्राइझ अनुप्रयोगांसाठी डिझाइन केले आहे.

ही वैशिष्ट्ये कोण वापरू शकतील? गुगलने हे फिचर जारी करण्यास सुरुवात केली आहे. जेमिनी अल्ट्रा सध्या मर्यादित लोकांसाठी उपलब्ध आहे. कारण त्याची सुरक्षा तपासणी अद्याप पूर्ण झालेली नाही. तर तुम्ही बार्डवर जेमिनी प्रो (Gemini Pro)वापरू शकता. हे बार्डसह एकत्रित केले आहे. गुगल Pixel 8 Pro वर नॅनो आवृत्तीचे काही फीचर्स रिलीज करण्यात आले आहेत. जेमिनी प्रो वापरण्यासाठी तुम्हाला बार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या गुगल खात्यानं लॉग इन करावे लागेल. तुम्ही तुमच्या गुगल खात्यासह लॉग इन केल्याशिवाय ते वापरू शकत नाही. लॉग इन केल्यानंतर, तुम्ही जेमिनी प्रोची वैशिष्ट्ये वापरण्यास सक्षम असाल.

  • जेमिनीमध्ये काही विशेष आहे का? जेमिनी हे बहुविध साधन आहे. म्हणजे ते फक्त माहिती देण्यापुरते मर्यादित नाही. ते मजकूर, कोड, ऑडिओ, प्रतिमा आणि व्हिडिओ समजू आणि ऑपरेट करू शकते. गुगलने याचा एक व्हिडिओदेखील जारी केला आहे. यामध्ये जेमिनी एका कागदावर सतत होत असलेली सर्जनशीलता पाहून प्रतिसाद देत आहे.

हेही वाचा :

  1. व्हॉट्सअ‍ॅप मेसेज शेड्यूल : ठरलेल्या वेळेनुसार जातील पाठवलेले मेसेज
  2. पुढील आठवड्यापासून 'ही' लाखो गुगल अकाऊंट हटवली जातील, गुगलनं दिला इशारा
  3. चांद्रयान 3 मोहिमेत इस्त्रोनं अनोखा प्रयोग करून मिळविलं यश, जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.