हैदराबाद( तेलंगणा): आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये मायक्रोसॉफ्टने आणलेल्या चॅटबॉटला टक्कर देत गुगलने आता आपली नवीन सेवा आणण्याची घोषणा केली आहे. गुगलने 'गुगल बार्ड' नावाने नवीन चॅटबॉट आणला असून, गुगल सर्चमध्येच ही सुविधा सर्वांना उपलब्ध होणार असल्याची घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये केली आहे. गुगलच्या या घोषणेमुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रांतील स्पर्धा अधिकच तीव्र होणार आहे.
काय आहे गुगल बार्ड?: गुगल नव्याने सुरु करत असलेले गुगल बार्ड हे LaMDA आणि Google च्या स्वतःच्या संभाषणात्मक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चॅटबॉटवर आधारित आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगल बार्डला प्रायोगिक संभाषणात्मक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेवा असे म्हटले आहे. Google येत्या आठवड्यात सर्व लोकांसाठी अधिक व्यापकपणे ही गुगल बार्डची सेवा उपलब्ध करून देणार असल्याचेही पिचाई यांनी सांगितले आहे.
-
Bard is an experimental conversational AI service, powered by LaMDA. Built using our large language models and drawing on information from the web, it’s a launchpad for curiosity and can help simplify complex topics → https://t.co/fSp531xKy3 pic.twitter.com/JecHXVmt8l
— Google (@Google) February 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bard is an experimental conversational AI service, powered by LaMDA. Built using our large language models and drawing on information from the web, it’s a launchpad for curiosity and can help simplify complex topics → https://t.co/fSp531xKy3 pic.twitter.com/JecHXVmt8l
— Google (@Google) February 6, 2023Bard is an experimental conversational AI service, powered by LaMDA. Built using our large language models and drawing on information from the web, it’s a launchpad for curiosity and can help simplify complex topics → https://t.co/fSp531xKy3 pic.twitter.com/JecHXVmt8l
— Google (@Google) February 6, 2023
गुगल बार्डचा वापर कसा करायचा?: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केलेल्या ब्लॉग पोस्टनुसार सध्या, Google Bard सर्व लोकांना चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. परंतु निवडक वापरकर्त्यांना टेस्टिंगसाठी याचा वापर करता येत आहे. Google लवकरच LAMDA ची लाइटवेट मॉडेल आवृत्ती जारी करणार आहे. या सुविधेसाठी कॉम्प्युटरची पॉवर अत्यंत कमी लागणार आहे. या लाइटवेट मॉडेल आवृत्तीत या सुविधेचा वापर करणारे गुगलला त्यांचे फीडबॅक देऊ शकतील.
गुगल बार्डविषयी काय म्हणाले सुंदर पिचाई?: पिचाई म्हणाले की, आम्ही LaMDA द्वारे समर्थित प्रायोगिक संभाषणात्मक AI सेवेवर काम करत आहोत. ज्याला आम्ही Bard म्हणत आहोत. येत्या काही आठवड्यांमध्ये ही सेवा अधिक व्यापकपणे लोकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत. बार्ड आपल्या मोठ्या भाषेच्या मॉडेल्सच्या सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेसह जगाच्या ज्ञानाची व्याप्ती एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मायक्रोसॉफ्ट विरुद्ध गुगल सामना रंगणार: चॅटजीटीपी हे एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉक्स आहे. जे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे काही सेकंदात देते. या चॅट जीपीटीवर आपल्याला गुगलसारखेच सगळ्या प्रशनांची उत्तरे मिळतात. त्यामुळे गुगलसारखेच ते एक सर्च इंजिन म्हणूनही काम करते. विशेष म्हणजे चॅटजीपीटी हे गुगलपेक्षाही दोन पावले पुढ असलेले सर्च इंजिन असल्याचेही बोलले जाते. त्यामुळेच ते सध्या ट्रेंड करत आहे. आता गुगलने गुगल बार्ड सेवा सुरु केल्याने मायक्रोसॉफ्ट विरुद्ध गुगल असा सामना पाहावयास मिळू शकतो.
हेही वाचा: ChatGPT Plus चॅटजीपीटी प्लसची नवीन सबस्क्रिप्शन सेवा सुरू चॅटजीपीटीमध्ये असा मिळेल प्रवेश