ETV Bharat / science-and-technology

GoDaddy Hacked : गोडॅडीची यंत्रणा हॅक! सायबर हल्लेखोराने इनस्टॉल केले मालवेअर - गोडॅडीची सिस्टम हॅक

ग्लोबल वेब होस्टिंग प्लॅटफॉर्म गोडॅडीची सिस्टम सायबर गुन्हेगारांनी हॅक केली आहे. त्यांच्या सिस्टीममध्ये हॅकर्सने मालवेअर बसविले आहेत. या आधी 2020 मध्येही असे प्रकरण समोर आले होते.

GoDaddy Hacked
गोडॅडीची सिस्टम हॅक
author img

By

Published : Feb 20, 2023, 10:52 AM IST

नवी दिल्ली : वेब होस्टिंग प्लॅटफॉर्म गोडॅडी (GoDaddy) ने उघड केले आहे की, सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या सिस्टममध्ये प्रवेश मिळवला आहे. कंपनीने म्हटले आहे की, हॅकर्सने त्यांच्या नेटवर्कवर मालवेअर स्थापित केले आणि त्यांच्या स्त्रोत कोडचे काही भाग चोरले. गोडॅडी या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांव्यतिरिक्त जगभरातील अनेक कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत काम करत आहेत. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'आमच्याकडे पुरावे आहेत आणि कायद्याच्या अंमलबजावणीने पुष्टी केली आहे की गोडॅडी सारख्या होस्टिंग सेवांना लक्ष्य करणार्‍या एका संघटित गटाद्वारे ही घटना घडवली गेली आहे'.

2020 मध्ये देखील झाले होते हॅक : हॅकर्सचे लक्ष्य वेबसाइट्स आणि सर्व्हरला फिशिंग कँपेन, मालवेअर वितरण आणि इतर क्रियांसाठी मालवेअरसह लिंक करणे हे होते. गोडॅडी ने यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) फाइलिंगमध्ये खुलासा केला आहे की, हा तोच हॅकर्सचा ग्रुप आहे जो मार्च 2020 मध्ये कंपनीच्या नेटवर्कमध्ये सापडला होता. डिसेंबर 2022 मध्ये देखील अशीच एक समस्या समोर आली होती जेव्हा गोडॅडीला ग्राहकांकडून त्यांच्या वेबसाइटवर अधूनमधून रीडायरेक्ट करण्याबद्दल तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या.

गोडॅडीची युजर्सला चेतावणी : कंपनीने ताबडतोब परिस्थिती सुधारली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाय लागू केले आहेत. कंपनीने म्हटले आहे की, या घटनेतून मिळालेल्या धड्यांचा आम्ही आमच्या सिस्टमची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांचे आणि त्यांच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी करत आहोत. नोव्हेंबर 2021 मध्ये, ग्लोबल वेब होस्टिंग प्लॅटफॉर्म गोडॅडी ने उघड केले होते की, त्यांच्या सुमारे 1.2 दशलक्ष वर्डप्रेस ग्राहकांच्या संवेदनशील माहितीशी तडजोड करण्यात आली आहे. गोडॅडीने वापरकर्त्यांना चेतावणी दिली आहे की, याने युजर्सवरील फिशिंग हल्ल्यांचा धोखा आणखी वाढू शकतो.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे डोळ्यांची तपासणी : मोतीबिंदूच्या समस्येने त्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. स्टार्टअप कंपनी 'लागी'ने व्हॉट्सअ‍ॅप आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) सहकार्याने एक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या मदतीने आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनच मोतीबिंदू ओळखता येणार आहे. 2021 मध्ये बनवले गेलेले हे सॉफ्टवेअर सध्या प्रदेशच्या विदिशामध्ये अ‍ॅक्टीव आहे. या सॉफ्टवेअर द्वारे आतापर्यंत सुमारे 1100 लोकांची तपासणी झाली आहे.

हेही वाचा : Eye Test Through WhatsApp : आता व्हॉट्सअ‍ॅपवरून करता येणार डोळ्यांची तपासणी!, जाणून घ्या कशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.