ETV Bharat / science-and-technology

Public Wifi Hacking Alert : सावधान.. सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय- फाय नेटवर्क वापरत आहात, तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे - Play Store Apple Store

राजधानी जयपूरसह अनेक ठिकाणी सार्वजनिक वाय-फाय (Open Wifi Network) बसवण्यात आले आहे. पण तुम्हाला वाटते तितके ते सुरक्षित नाही. कारण अनेक हॅकर्स त्यांचा गैरवापर करतात आणि तुमचा वैयक्तिक डेटा हॅक करू (Public Wifi Hacking Alert) शकतात. वाचा संपूर्ण बातमी...

Cyber Crime
Cyber Crime
author img

By

Published : Dec 12, 2021, 11:47 AM IST

जयपूर- 21व्या शतकाच्या युगात मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉप, संगणक (Mobile Tablet Laptop Computer) आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स (Electronic Gadgets) वापरण्यासाठी आपण पूर्णपणे इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर (Internet Connectivity) अवलंबून आहोत. कार्यालयीन काम असो, विद्यार्थ्यांचा अभ्यास असो किंवा इतर इंटरनेट सर्फिंग (Internet Surfing) असो, या सर्व गोष्टींसाठी आपण वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी (Fast Internet) वेगवेगळे पर्याय शोधत असतो. यामध्ये सर्वात सहज उपलब्ध असलेला पर्याय म्हणजे फ्री ओपन वायफाय नेटवर्क(Free Open Wifi Network), जे विविध कंपन्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. त्याचा सर्वाधिक फायदा सायबर हॅकर्स घेत आहेत. आपण इलेक्ट्रॉनिक गॅझेट कोणत्याही विनामूल्य ओपन वायफाय नेटवर्कशी पडताळणी न करता थेट कनेक्ट करतो. ज्यासाठी आपल्याला आपली खासगी माहिती भरावी लागते.

खासगी माहिती पोहोचते हॅकरपर्यंत

सायबर सुरक्षा तज्ञ आयुष भारद्वाज (Cyber Security Expert Ayush Bharadwaj) यांनी सांगितले की, जयपूरसह सर्व मोठ्या शहरांमध्ये फायबर कनेक्टिव्हिटी चांगली असल्याने इंटरनेटचा वेग पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे खुल्या वायफाय नेटवर्कची संख्या लक्षणीय वाढली आहे. ज्यामुळे वापरकर्ता त्याचे डिव्हाइस कनेक्ट करू शकतो आणि अतिशय जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळवू शकतो. अशा परिस्थितीत, सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या शहरांतील पॉश भागात जाऊन वापरकर्त्याला मोफत ओपन वायफाय नेटवर्क देतात. वापरकर्त्याने आपले डिव्हाइस त्या ओपन नेटवर्कशी जोडताच, त्याचा सर्व खासगी डेटा आपोआप सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचू लागतो. ज्याचा सायबर गुन्हेगार कोणत्याही प्रकारे गैरवापर करू शकतो आणि वापरकर्त्याला त्याची माहितीही नसते.

यासह, सायबर गुन्हेगार वापरकर्त्याच्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर ट्रोजन (Electronic Trojan) पाठवतात, जे वापरकर्त्याच्या उपकरणात बॉट (Cyber Bots) म्हणून काम करतात. अशा प्रकारे, सायबर गुन्हेगार (Cyber criminals) शेकडो वेगवेगळ्या उपकरणांवर बॉट्स पाठवतात, ज्याचा वापर कोणत्याही वेबसाइटची बँडविड्थ भरून डाऊन आणि हॅक करण्यासाठी केला जातो. यामुळे जेव्हा कोणत्याही व्यक्तीला संबंधित वेबसाइटला भेट देऊन त्याचे महत्त्वाचे काम करायचे असते, तेव्हा तो ते करू शकत नाही.

पॅकेट्स कॅप्चर करून चोरतात गोपनीय पासवर्ड

सायबर सुरक्षा तज्ज्ञ आयुष भारद्वाज यांनी सांगितले की, युजरला मोफत ओपन वायफाय नेटवर्क दिल्यानंतर युजरचे उपकरण पूर्णपणे सायबर गुन्हेगाराच्या हातातील खेळणी बनवतात. त्यानंतर सायबर गुन्हेगार वापरकर्त्याच्या उपकरणातील कीलॉगरद्वारे पॅकेट ताब्यात घेतो. ज्याद्वारे विविध सोशल नेटवर्किंग साइट्स (Social Networking Sites), इंटरनेट बँकिंग (Internet Banking) आणि वापरकर्त्याच्या इतर महत्त्वाच्या सेवांशी संबंधित युजर आयडी आणि पासवर्ड चोरीला जातो. त्याद्वारे सायबर गुन्हेगार हे वापरकर्त्याच्या बँक खात्यातून (Bank Account Hacked) लाखो रुपयांचे व्यवहार करतात आणि वापरकर्त्याच्या वैयक्तिक माहितीचा चुकीचा वापर करून फसवणूक करतात.

या गोष्टींचा अवलंब करून स्वतःचे रक्षण करा

भारद्वाज म्हणाले की, सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवण्यासाठी वापरकर्त्याने खरेदी केलेला अँटीव्हायरस (Install Antivirus) त्याच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये इंस्टॉल करणे सर्वात महत्त्वाचे आहे. अँटीव्हायरस वेळोवेळी अपडेट (Antivirus Update) करा आणि त्याचे लॉग नियमितपणे तपासा. यासह, वापरकर्त्याने त्याच्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये फायर वॉल नेहमी सक्रिय ठेवली पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये कोणतेही बाहेरचे ऍप डाउनलोड करणे टाळावे. तसेच, प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर (Play Store Apple Store) व्यतिरिक्त कोणत्याही वेबसाइटवरून किंवा लिंकवरून कोणतेही अॅप्लिकेशन डाउनलोड करू नका. यासोबतच इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे सर्व अॅप्लिकेशन वेळोवेळी अपडेट करत राहा आणि त्यांची फक्त नवीन आवृत्ती वापरा. यासोबतच, मोफत ओपन वायफाय नेटवर्क वापरताना, वापरकर्त्याने त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणावर अँटीव्हायरस सक्रिय ठेवावे आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना फ्री ओपन वायफाय नेटवर्क कधीही वापरू नये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.