कॅलिफोर्निया : मेटा युक्रेनच्या आक्रमणाला प्रतिसाद म्हणून रशियन लोकांविरुद्ध हिंसाचाराच्या कॉलसंबंधित पोस्ट प्रकाशित करण्याला परवानगी देण्याचा विचार करत आहे, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. रशियाने युक्रेनवरील केलेल्या आक्रमणामुळे पोलंड, युक्रेन आणि रशिया या देशातून व्लादिमीर पुतिन आणि अलेंक्झाडर झेलेंस्की यांना कॉल फॉर डेथचे मेसेज येत आहेत. आम्ही अजूनही रशियन नागरिकांविरुद्ध हिंसाचारासाठी विश्वासार्ह कॉलला परवानगी देणार नाही, असे मेटाचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
स्पुटनिकच्या वृत्तानुसार, रशिया, युक्रेन आणि पोलंडसह अनेक देशांमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना मृत्यूची धमकी देणाऱ्या पोस्टला परवानगी देण्यात येणार आहे. रशियाने फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश बंद केल्यावर काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाने बीबीसी आणि डॉयचे वेले, ट्विटर आणि अॅपल आणि गुगलच्या अॅप स्टोअरच्या रशियन वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. मेटा अध्यक्ष निक क्लेग म्हणाले की कंपनी "आमच्या सेवा व्यवस्थित करण्यासाठी सर्व काही करत आहे."
युक्रेनमध्ये रशियाचे लष्करी ऑपरेशन
रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये "लष्करी ऑपरेशन" सुरू केले आहे. युक्रेनियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी डोनेस्तक आणि लुहान्स्क संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, हे ऑपरेशन युक्रेनियन लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. यामुळे नागरी लोकसंख्येला धोका नाही. यूएस, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी रशियाविरुद्ध सर्वसमावेशक निर्बंध मोहीम राबविली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी रशियातील व्यवसाय बंद केले आहेत.
हेही वाचा - Google Play Store : गूगलने भारतात प्ले पास सुरु केले, जाहिरातीशिवाय 1,000 हून अधिक अॅप्स केले ऑफर