ETV Bharat / science-and-technology

Facebook Coo Sheryl Sandberg : फेसबुकच्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांचा राजीनामा, सोशल मीडियावर सांगितली मोठी गोष्ट - फेसबुकचे नवे सीओओ जेवियर ऑलिव्हन

फेसबुकच्या सीओओ शेरिल सँडबर्गने ( Facebook Coo Sheryl Sandberg ) फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे की, ती आता समाजाच्या हितासाठी काम करणार आहे.

Facebook Coo Sheryl Sandberg
Facebook Coo Sheryl Sandberg
author img

By

Published : Jun 2, 2022, 7:28 PM IST

नवी दिल्ली : फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाच्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी राजीनामा दिला ( Coo Sheryl Sandberg Resign From Meta ) आहे. फेसबुक सीओओ शेरिल सँडबर्गने जाहीर केले की, ती तिची पोस्ट सोडणार आहे. फेसबुकवरूनच ही माहिती समोर आली आहे. मात्र शेरिल तिची पोस्ट का सोडत आहे, हे सांगण्यात आले नाही. मात्र, त्यांच्या एका पोस्टद्वारे त्यांनी निश्चितपणे सांगितले आहे की, त्यांचा पुढे काय प्लॅन आहे.

शेरिलने लिहिली फेसबुक पोस्ट -

फेसबुकच्या सीओओ शेरिल सँडबर्गने तिच्या एका फेसबुक पोस्टमध्ये ( Sheryl Sandberg Facebook post ) सांगितले आहे की, ती आता समाजाच्या हितासाठी काम करणार आहे. इतकेच नाही, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा संदर्भ देत शेरिल म्हणाले की, पूर्वीच्या तुलनेत आता खूप बदल झाले आहेत. आपण कोणतेही उत्पादन बनवतो, त्याचा लोकांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी बनते. शेरिल गेल्या 14 वर्षांपासून या कंपनीशी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून संबंधित होते. ती म्हणाली की, 2008 मध्ये जेव्हा मी कंपनीत रुजू झाली, तेव्हा मला वाटले होते की पुढची पाच वर्षे इथेच राहीन, पण 14 वर्षे उलटून गेली. ज्यानंतर आयुष्याचा नवा अध्याय लिहिण्याची वेळ आली आहे.

सीईओने दिले हे उत्तर -

मात्र, फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्गने ( Facebook CEO Mark Zuckerberg ) आपल्या एका पोस्टमध्ये शेरिल सँडबर्ग फेसबुकशी संबंधित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की शेरिल फेसबुकच्या संचालक मंडळाचा एक भाग असेल. यासोबतच फेसबुकचा पुढचा सीओओ कोण असेल हेही झुकरबर्गने सांगितले. फेसबुकचे नवे सीओओ म्हणून जेवियर ऑलिव्हन ( Facebook's new COO Javier Oliven ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा - अॅमेझॉन भारतातील ग्राहकांसाठी रोबोट्स सॉफ्टवेअर विकसित करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.