लंडन : चहाच्या सवयीमुळे अनेकांना विविध त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तरुण कॉफीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. कॉफी पिल्याने अनेक फायदे असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. कॉफीमुळे पोटोतील अतिरिक्त चरबी कमी होत असल्याचाही दावा लंडन येथील इम्पीरियल महाविद्यालयाच्या संशोधकांनी केला आहे.
मधुमेहाचा धोका होतो कमी : कॉफिच्या सवयीमुळे अनेकजणांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. लंडन येथील इम्पीरियल महाविद्यालयाच्या संशोधकांनी कॉफी पिल्याने मधुमेहाचा धोका कमी होत असल्याचा दावा केला आहे. काही नागरिक कमी कॉफी पितात, मात्र तरीही त्यांच्या रक्तात कॅफीनचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. त्यामुळे व्यक्तीचे वजन कमी होण्यास मदत होत असल्याचेही संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दहा हजार नागरिकांवर संशोधन : कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील चयापचयाची क्रिया ही योग्य पद्धतीने होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. कॉफीचे शरीर ज्या वेगाने चयापचय करते, त्यामुळे व्यक्तीच्या वजनावर परिणाम करते, असा दावाही या संशोधकांनी केला आहे. या संशोधकांनी यासाठी तब्बल दहा हजार युरोपियन वंशाच्या नागरिकांवर संशोधन केले. या नागरिकांच्या सीवायपी १ ए २ एएचआर या जनुकांच्या दोन सामान्य अनुवांशिक रूपांची भूमिका तपासून पाहिली. यामध्ये सीवायपी १ ए २ एएचआर या जनुकांच्या शरीरातील कॅफीन चयापचय गतीशी संबंधित असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. याबाबतचे संशोधन बीएमजे मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
शरीरातील चरबीवर परिणाम : कॉपी पिणाऱ्या बहुतेक नागरिकांच्या शरीरातील चरबीवर कॉफीचा परिणाम झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. कॅफीनमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी झाल्याचे इम्पीरियलचे महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ दीपेंद्र गिल यांनी यावेळी स्पष्ट केले. उच्च प्लाझ्मा कॅफीन पातळी असलेल्या नागरिकांमध्ये कमी बॉडी मास इंडेक्स (BMI) आणि शरीरातील चरबी कमी असल्याचे विश्लेषण नोंदवण्यात आल्याचेही गिल यांनी यावेळी सांगितले. त्यासह या व्यक्तीना मधुमेहाचा कमी धोका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - NASA Captures Star On Cusp Of Death : मृत्यूच्या उंबरठ्यावरील तारा नासाच्या दुर्बिणीत झाला कैद