नवी दिल्ली : स्किझोफ्रेनिया रुग्णांच्या झोपेचे वारंवार खोबरे होऊन अनेकांना यामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागतो. याबाबत स्किझोफ्रेनिया स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा (एसएसडी) हा त्रास निवासी आणि बाह्यरुग्ण अशा दोन्ही रुग्णांमध्ये होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. अनियंत्रित संक्रमणांसह रूग्णांमध्ये कठोर दिनचर्येमुळे हा त्रास होत असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. पिट्सबर्ग आणि इटली विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
एसएसडीने ग्रस्त नागरिकांना झोपेचा होतो त्रास : स्किझोफ्रेनिया स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या नागरिकांना योग्य विश्रांती आणि अनियंत्रित संक्रमणांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या नागरिकांमध्ये झोप वारंवार खंडीत होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. हे संशोधन मॉलिक्युलर सायकियाट्री जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनात एसएसडी असलेल्या रुग्णांमध्ये विश्रांती आणि दैनंदिन कामात व्यत्यय आणि अनियमिततेचे नमुने वर्णन केले आहेत. एसएसडीने ग्रस्त असलेल्या लोकांना झोप येण्यास त्रास होतो. त्यांच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीशिवाय इतर नागरिकांपेक्षा कमी विश्रांती मिळत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
औषधे झोपेमध्ये करतात बदल : स्किझोफ्रेनिया स्पेक्ट्रम डिसऑर्डरची SSD लक्षणांसाठी देण्यात आलेली औषधे झोपेमध्ये बदल करतात. हे रुग्ण दररोज 15 तास विश्रांती घेतात. जास्त झोपेमुळे रुग्णांच्या एसएसडी SSD लक्षणांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे मानसोपचार विभागाचे प्राध्यापक संशोधक फॅबियो फेरारेली यांनी स्पष्ट केले. आम्ही रुग्णांना लिहून दिलेली औषधे त्यांच्या आरोग्यावर अधिक व्यापकपणे कसा परिणाम करतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 12 ते 15 तासांची झोप हानिकारक असू शकते. अतिऔषधांचा वापर टाळणे आणि शक्य तितक्या कमी डोस वापरणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे. संशोधकांनी 250 रुग्णांवर संशोधन केले असून यातील 150 रुग्ण निवासी होते. मात्र निवासी रुग्णांचा दिनक्रम अधिक सुरळीत पार पडत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
हेही वाचा - AI Based Smartphone App : एआय स्मार्टफोन अॅप तुम्हाला धूम्रपान सोडण्यास करू शकते मदत, जाणून घ्या कसे करते काम