हैदराबाद : आपल्या मोबाईलवर येणाऱ्या अनवॉन्टेड सिग्लनमुळे मोबाईलची बॅटरी लवकर उतरुन जाते. मोठ्या गर्दीत कॉल करताना मोबाईल धारकांना कॉल करने सगळ्यात डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता मोबाईलवर येणार अनवॉन्टेड सिग्नलपासून सुटका होणार आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ( MIT ) संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
गर्दीत कॉल केल्याने काय होतो फोनवर परिणाम : आपण एखाद्या क्रिकेट मॅचचा आनंद घेण्यासाठी भरगच्च गर्दी असलेल्या क्रिकेचटच्या मैदानावर बसलो आहे. अशावेळी अनेक जण आपल्या फोनद्वारे कुटूंबियांशी संपर्क करतात. त्यांना आपल्या कुटूंबियांना मैदावर होणाऱ्या सामन्याबाबत बोलायचे असते. तर काहीजणांना आपल्या फोनवर कुटूंबियांसह मित्रांना होणारा सामना दाखवायचा असतो. अशावेळी आपल्या मोबाईलवर अनेक अनवॉन्टेड सिग्नल येऊन आदळतात. त्यामुळे मोबाईलचा बॅटरी लवकरच उतरते. मोबाईलही चांगला चालत नसल्याचे दिसून येते. आवाज नीट ऐकायला येत नाही. आपल्या फोनवर अनवॉन्टेड सिग्नल येऊन आल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येते.
काय काम करते चीप : मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (MIT) संशोधकांनी यासाठी एक चीप शोधून काढली आहे. या चीपमध्ये एक सर्किट आर्किटेक्चर विकसित केले आहे. ते मोबाईल डिव्हाइसच्या कार्यक्षमतेशी तडजोड न करता रिसीव्हरच्या इनपूटवर येणारे अनवॉन्टेड सिग्नलला लक्ष्य करते. त्यांना रोखण्याचे काम करते. या संशोधकांनी डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगचे तंत्र विकसित केले. या तंत्राच्या माध्यमातून चिपला रेडिओ फ्रिक्वेन्सी सिस्टीममध्ये विस्तृत वारंवारता श्रेणीमध्ये प्रभावीपणे कार्य करण्यास सक्षम केल्याचे या संशोधकांनी यावेळी स्पष्ट केले.
हाय पॉवर अनवाॉन्टेड सिग्नललाही रोखण्याची शक्यता : एमआयटीच्या संशोधकांनी शोधलेली ही चीप रिसीव्हर सिग्नल प्रोसेसिंग ऑपरेशन्समध्ये हाय पॉवर अनवाॉन्टेड सिग्नललाही रोखू शकतो. विशेष प्रकारचा हस्तक्षेप रोखण्यासाठी वापरल्या जाणार्या इतर वाइडबँड रिसीव्हर्सपेक्षा एमआयटीच्या संशोधकांनी बनवलेल्या चिपने सुमारे 40 पट चांगली कामगिरी केल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. चिपला कोणत्याही अतिरिक्त हार्डवेअर किंवा सर्किटरीची आवश्यकता नसल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही चीप मोठ्या प्रमाणात उपयोगाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या चीपच्या संशोधक नेगर रेस्कारिमीयन यांनी आम्हाला ५जी आणि भविष्यातील वायरलेस पद्धतीच्या संभाषणासाठी अशी चीप बनवण्यात रस होता. त्यामुळे आम्ही असे सर्किट विकसित केल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - National Science Day 2023 : राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो, जाणून घ्या सी व्ही रामन यांच्या संशोधनाविषयी!