ETV Bharat / science-and-technology

Chandrayaan 3 : प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केले लँडर मॉड्यूल, चंद्रयान 3 पोहोचले चंद्राच्या अगदी जवळ - प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर

इस्रोने सांगितले आहे की आता चंद्रयान प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे करण्याची तयारी करेल. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की लँडिंगचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लँडरचा वेग 30 किमी उंचीवरून अंतिम लँडिंगपर्यंत आणण्याची प्रक्रिया आहे.

Chandrayaan 3
चंद्रयान 3
author img

By

Published : Aug 17, 2023, 4:01 PM IST

बेंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोने गुरुवारी सांगितले की चंद्रयान 3 चे लँडर मॉड्यूल आणि प्रोपल्शन मॉड्यूल यशस्वीरित्या वेगळे केले गेले आहेत. आता लँडर मॉड्यूल शुक्रवारी चंद्राभोवती थोड्या जवळच्या कक्षेत उतरेल. लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हर असतात. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, "लँडर मॉड्यूलने प्रोपल्शन मॉड्यूलचे मानले आभार. लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाले आहे. उद्या, लँडर मॉड्युल सुमारे 04:00 IST वाजता डीबूस्टिंग (प्रक्रिया मंद होत) करून थोड्या जवळच्या चंद्राच्या कक्षेत उतरणे अपेक्षित आहे.

चंद्राच्या ध्रुव बिंदूंवर यान स्थिरावण्याची प्रक्रिया : चंद्रयान-3 ने 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यानंतर, यानाने 6, 9 आणि 14 ऑगस्ट रोजी चंद्राच्या जवळच्या कक्षेत प्रवेश केला आणि त्याच्या जवळ येत राहिला. मोहिमेची प्रगती होत असताना, इस्रोने चंद्रयान 3 ची कक्षा हळूहळू कमी करून चंद्राच्या ध्रुव बिंदूंवर आणण्याची प्रक्रिया पार पाडली. हे यान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट-लँड करणे अपेक्षित आहे.

प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्याची योजना : यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी इस्रोने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले होते, आजची यशस्वी प्रक्रिया थोड्या काळासाठी आवश्यक होती. या अंतर्गत चंद्रयान-3 चंद्राभोवती 153 किमी x 163 किमी कक्षेत ठेवण्यात आले होते, ज्याचा आम्ही अंदाज केला होता. यासह चंद्राच्या सीमेत प्रवेश करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर वेगळे होण्यासाठी तयार आहेत. इस्रोने सांगितले की 17 ऑगस्ट रोजी लँडर मॉड्यूल चंद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्याची योजना आहे. चंद्रयान-3 ने 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यानंतर, तो 6, 9 आणि 14 ऑगस्ट रोजी चंद्राच्या आतील कक्षेत प्रवेश केला आणि त्याच्या जवळ येत राहिला.

लँडिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग : विभक्त झाल्यानंतर, लँडरला एका कक्षेत ठेवण्यासाठी "डीबूस्ट" (मंद होण्याची प्रक्रिया) होणे अपेक्षित आहे जेथे पेरील्युन (चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू) 30 किमी आहे आणि अपोलून (चंद्राचा सर्वात दूरचा बिंदू) 100 किमी दूर आहे. इस्रोने सांगितले की येथून 23 ऑगस्टपासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर यानाचे सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी अलीकडेच सांगितले होते की लँडिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लँडरचा वेग 30 किमी उंचीवरून अंतिम लँडिंगपर्यंत आणण्याची प्रक्रिया आणि यान आडव्या स्थितीपासून उभ्या स्थितीकडे नेण्याची प्रक्रिया करण्यात येईल. यासंदर्भातील आमची क्षमता दाखवायची आहे असे ते म्हणाले.

इस्रो मिशन मून : सोमनाथ म्हणाले, "लँडिंग प्रक्रियेच्या सुरूवातीस वेग सुमारे 1.68 किलोमीटर प्रति सेकंद आहे, परंतु हा वेग चंद्राच्या पृष्ठभागाच्या क्षैतिज आहे. येथे चंद्रयान-3 सुमारे 90 अंश झुकले आहे. दिशा बदलण्यासाठी क्षैतिज ते उभे करणे ही संपूर्ण प्रक्रिया गणितीयदृष्ट्या एक अतिशय मनोरंजक आहे. आम्ही ही प्रक्रिया अनेकवेळा करुन पाहिली आहे. येथेच आम्हाला गेल्यावेळी (चंद्रयान-2) समस्या आली होती. ते म्हणाले की याशिवाय इंधनाचा वापर कमी आहे, अंतराची गणना योग्य आहे आणि सर्व गणिती मापदंड बरोबर आहेत याची खात्री करावी लागेल. सोमनाथ म्हणाले की व्यापक सिम्युलेशन अर्थात सराव केला आहे, त्यानुसार मार्गदर्शन डिझाइन बदलले आहेत. आवश्यक प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी आणि योग्य लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यासाठी या सर्व टप्प्यांवर बरेच अल्गोरिदम ठेवले आहेत. इस्रोने 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यापासून तीन आठवड्यात टप्प्याटप्प्याने चंद्रयान-3 चंद्राच्या पाचपेक्षा जास्त कक्षांमध्ये ठेवले आहे.

स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल : 1 ऑगस्ट रोजी एका महत्त्वाच्या प्रक्रियेत हे वाहन पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या पाठवण्यात आले. चंद्रयान-3 हे चंद्रयान-2 (2019) चे फॉलो-ऑन मिशन आहे जे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरण्याची आणि भोवती फिरण्याची एंड-टू-एंड क्षमता प्रदर्शित करते. त्यात स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि आंतर-ग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित आणि प्रात्यक्षिक करण्याच्या उद्देशाने रोव्हरचा समावेश आहे. प्रोपल्शन मॉड्यूल व्यतिरिक्त लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशन चंद्राच्या कक्षेपासून 100 किमी अंतरावर आहे. चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मोजमापांचा अभ्यास करण्यासाठी त्यात 'स्पेक्ट्रो-पोलारिमीटर ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ' (SHAP) पेलोड आहे. चंद्रयान-३ मोहिमेच्या आतापर्यंतच्या प्रक्रिया यशस्वी पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन म्हणाले की 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे लँडिंग होण्याची आम्ही वाट पाहत आहोत तो एक मोठा क्षण असेल.

लँडिंग प्रक्रियेबद्दल अधिक चिंता : दुसऱ्या चंद्र मोहिमेदरम्यान सिवन हे अंतराळ संस्थेचे प्रमुख होते. ते म्हणाले की चंद्रयान 2 देखील या सर्व टप्प्यांमधून यशस्वीरित्या पार पडले आणि लँडिंगच्या दुसऱ्या टप्प्यात एक समस्या समोर आली आणि लक्ष्यानुसार मोहीम यशस्वी झाली नाही. ते म्हणाले, आता लँडिंग प्रक्रियेबद्दल नक्कीच अधिक चिंता नसेल. गेल्यावेळी ते यशस्वी होऊ शकले नाही. यावेळी सर्वजण त्या महान क्षणाची वाट पाहत आहेत. मला खात्री आहे की ते यशस्वी होईल.

मिशन यशस्वी होईल : सिवन म्हणाले यावेळी आम्हाला आशा आहे की मिशन यशस्वी होईल. आम्हाला याबद्दल खूप विश्वास आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करणे, चंद्रावर रोव्हर चालवणे आणि चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करणे हे चंद्रयान-3 मोहिमेचे उद्दिष्ट आहे. कालच्या लँडर आणि प्रोपल्शन मॉड्युलच्या पृथक्करणाबाबत, सिवन म्हणाले, कालची प्रक्रिया खूप महत्त्वाची होती. कारण अंतराळातील कोणतीही कामगिरी ही एक महत्त्वाची क्रिया आहे. कालच्या अंतराळातील क्रियाकलापाने चंद्रयान-3 चे दोन भाग केले आहेत. एक म्हणजे प्रोपल्शन आणि लँडर हे खूप महत्वाचे आहे आणि कोणत्याही समस्यांशिवाय यशस्वीरित्या पुढे जाईल.

चंद्र साइटवर सॉफ्ट लँडिंग करण्याची क्षमता : चंद्रावर भारताची पहिली मोहीम असलेल्या चंद्रयान-1 चे प्रकल्प संचालक डॉ. एम. अन्नादुराई यांनी सांगितले की, प्रोपल्शन मॉड्यूलने लँडरला निरोप दिल्यानंतर, लँडरची प्राथमिक तपासणी केली जाईल. चार मुख्य थ्रस्टर्स, जे लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्टलँड करण्यास सक्षम करतील. तसेच इतर सेन्सर्सची चाचणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर ते (लँडर) 100 किमी x 30 किमी कक्षेत (पेरील्युन) ठेवले जाईल, असे ते म्हणाले. चंद्राच्या सर्वात जवळचा बिंदू 30 किमी आणि Apollune - चंद्रापासून सर्वात दूरचा बिंदू 100 किमी) आणि तेथून चंद्राचा प्रवास 23 ऑगस्ट रोजी पहाटे सुरू होईल. लँडरमध्ये विशिष्ट चंद्र साइटवर सॉफ्ट लँडिंग करण्याची क्षमता असेल. त्यानंतर रोव्हरद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक विश्लेषण केले जाईल. लँडर आणि रोव्हरमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यासाठी सर्व सामुग्री तैनात करण्यात आली आहे.

  • Chandrayaan-3 Mission:

    ‘Thanks for the ride, mate! 👋’
    said the Lander Module (LM).

    LM is successfully separated from the Propulsion Module (PM)

    LM is set to descend to a slightly lower orbit upon a deboosting planned for tomorrow around 1600 Hrs., IST.

    Now, 🇮🇳 has3⃣ 🛰️🛰️🛰️… pic.twitter.com/rJKkPSr6Ct

    — ISRO (@isro) August 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Lunar landing : रशियाने लुना-25 लाँच केले; 50 वर्षांनंतर त्यांची पहिली चंद्र मोहीम...
  2. ISRO Moon Mission : चंद्रयान 3 अंतराळयान चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेच्या जवळ गेले...
  3. Chandrayaan 3 Mission : चंद्राच्या जवळ पोहोचले चंद्रयान ३, चौथ्यांदा बदलली कक्षा, १७ ऑगस्टची मोहिम महत्त्वाची...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.