सेऊल - एलजी इलेक्ट्रॉिनिक्सने इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वायरलेस चार्जिंग सोल्यूशन्स दिले आहेत. या चार्जिंग सोल्यूशन्सचा मोबिलिटी क्षेत्रात विस्तार करण्याची एलजीची योजना आहे.
दक्षिण सेऊलमधील बशेऑनमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वायरलेस चार्जिंग स्टेशन बसविण्यात आली आहेत. त्यासाठी कंपनीने स्थानिक इलेक्ट्रिक स्कूटर पुरवठादार किकगोईंगबरोबर भागीदारी केली आहे.
हेही वाचा-चांदी महागली! दोन दिवसांत प्रति किलो ३ हजारांनी वाढले दर
२० वायरलेस चार्जिंग 'किक स्पॉट्स' सुरू-
दोन्ही कंपन्यांकडून इलेक्ट्रिक स्कूटर वायरलेस चार्जिंग सोल्यूशन्सची सुरक्षितता आणि उपयुक्तता यावर पुढील सहा महिन्यांसाठी पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सेऊल आणि इतर भागांमध्ये सोल्यूशन्सचा विस्तार करणार आहे. एलजीच्या माहितीनुसार २० वायरलेस चार्जिंग 'किक स्पॉट्स' हे बशेऑनमधील पाच पार्किंग झोनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यांनी वायरलेस रिसिव्हर पॅड्सही बसविण्यात आल्याचे स्थानिक माध्यमाने म्हटले आहे.
हेही वाचा-संपूर्ण देशात लसीकरण होण्याकरिता दोन-तीन वर्षे लागणार-अदर पुनावाला
वायरेस चार्जिंग सोल्यूशन्समुळे इलेक्ट्रिक स्कूटर शेअरिंग सर्व्हिसची क्षमता वाढेल, अशी दोन्ही कंपन्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच वापरकर्त्यांची संख्या वाढेल, असेही कंपन्यांनी म्हटले आहे. वायरलेस चार्जिंग स्टेशन वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना सवलत दिली जाणार आहे.
किकगोईंगचे १.२ दशलक्ष सभासद-
एलजी ही वायरलेस पॉवर कॉन्सोर्टियम बोर्डाची सदस्य आहे. हा बोर्ड वायरलेस पॉवर ट्रान्सफर टेक्नॉलॉजीसाठी काम करतो. पर्सनल मोबिलिटीसाठी किकगोईंगबरोबर अधिक उर्जेने काम करणार असल्याचे एलजीने म्हटले आहे.
किकगोईंग ही ओलूलो या स्टार्टअपद्वारे चालविण्यात येते. या कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर शेअरिंग सेवा सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या कंपनीचे सध्या १.२ दशलक्ष सभासद आहेत.