ETV Bharat / science-and-technology

FLYING CAR चे यशस्वी उड्डाण; ३५ मिनिटात दोन शहरातील प्रवास पूर्ण - aircar prototype

एअरकार या हायब्रीड विमानाचे दोन विमानतळादरम्यान आज पहिले यशस्वी उड्डाण झाले आहे. एअरकारच्या निर्मितीसाठी तब्बल २.३ दशलक्ष डॉलर खर्च झाले आहेत. ही एअरकार तयार होण्यासाठी दोन वर्षे लागले आहेत.

flying car
फ्लाईंग कार
author img

By

Published : Jul 1, 2021, 9:34 PM IST

हैदराबाद - ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक कार हे उद्याचे भविष्य मानले जात होते. मात्र, ऑटोमोबाईल क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट होण्याची चिन्हे आहेत. कारण, इलेक्ट्रिक कारची गोष्ट सोडा, आता चर्चा आहे, उडणाऱ्या कारेची!

एअरकार या हायब्रीड विमानाचे दोन विमानतळादरम्यान आज पहिले यशस्वी उड्डाण झाले आहे. एअरकारचे डिझाइनर स्टीफन क्लेन म्हणाले, की स्लोवाकियामध्ये नायट्रा आणि ब्रातिस्लावा या दोन शहरांमधील अंतर हायब्रीड विमानाने ३५ मिनिटांमध्ये पूर्ण केले.

flying car
फ्लाईंग कार

हेही वाचा-Ashadhi Ekadashi 2021 : नाथांच्या पालखीचे पैठणहून प्रस्थान, 19 जुलैला एसटीतून जाणार पंढरपूरला

कारसारखी रचना असलेले हायब्रीड विमानाने उड्डाण घेणे सोपे नव्हते. हे हायब्रीड विमान किंवा एअरकार रस्त्यावरही चालू शकते. हे तयार करण्यासाठी तंत्रज्ञांनी खूप परिश्रम घेतले आहे. या उडत्या कारमध्ये लावण्यात आलेली मोटर पंख्यांना बाहेर काढते. त्यानंतर ही कार उडण्यासाठी तयार होते. या प्रक्रियेला केवळ १५ मिनिटांचा अवधी लागतो. तसेच तेवढाच वेळ हा पंखे बंद करण्यासाठी लागतो.

फ्लाईंग कार
फ्लाईंग कार

हेही वाचा-उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त; ईडीची कारवाई

एअरकार प्रति तास १७० किमी वेगाने उडू शकते!

कारचे डिझाईनर क्लेन यांच्या माहितीनुसार एअरकार सामान्य गॅसोलीनच्या एका टँकमध्ये १६०० किलोमीटर अंतर पूर्ण करू शकते. एअरकार उड्डाणानंतर प्रति तास १७० किमी वेगाने उडू शकते. ही एअरकार २०० किलोग्रामहून अधिक वजन नेऊ शकत नाही.

एअरकारच्या निर्मितीसाठी तब्बल २.३ दशलक्ष डॉलर खर्च

एअरकारच्या निर्मितीसाठी तब्बल २.३ दशलक्ष डॉलर खर्च झाले आहेत. ही एअरकार तयार होण्यासाठी दोन वर्षे लागले आहेत. उडती कार विकसित करणारी कंपनी क्लेन विजनने ही कार कधी लाँच होणार व किती किंमत असेल याची माहिती जाहीर केलेली नाही. खासगी विमानात रस असलेल्या लोकांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.