ETV Bharat / science-and-technology

Auto expo 2023 : ग्रेटर नोएडामध्ये ऑटो एक्स्पो २०२३ चे आयोजन, आजपासून भरणार कारचे प्रदर्शन - टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार सादर करणार

11 ते 18 जानेवारी दरम्यान होणाऱ्या ऑटो एक्स्पो 2023 (auto expo 2023) मध्ये अनेक कार निर्माते सहभागी होणार आहेत. यामध्ये मारुती सुझुकी, बीवायडी, महिंद्रा ऑटो, एमजी, टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर्स इंडिया आणि किया यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश असेल. दुसरीकडे, बीएमडब्ल्यू (BMW), मर्सिडीज (Mercedes), वोल्क्सवॅगन (Volkswagen), स्कोडा (Skoda) यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्या एक्सपोमध्ये सहभागी होणार नाहीत

Auto expo 2023
ऑटो एक्स्पो २०२३
author img

By

Published : Jan 11, 2023, 10:04 AM IST

Updated : Jan 13, 2023, 5:12 PM IST

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडा येथे 11 ते 18 जानेवारी दरम्यान एक्सपो सेंटरमध्ये ऑटो एक्सपो 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 50 हून अधिक नवीन वाहने दाखल होणार आहेत. एक्स्पोच्या माध्यमातून देशी विदेशी कंपन्या आपली नवीन वाहने लोकांसमोर ठेवणार आहेत. ऑटो एक्स्पोला अनेक व्हीव्हीआयपीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर गौतम बुद्ध नगर पोलिस आयुक्तालयाने वाहतूक सूचना जारी केली आहे. यासोबतच 11 ते 18 जानेवारीपर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि लोकांना गर्दीचा सामना करावा लागू नये, यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

मारुती 3 नवीन कार सादर करणार : ऑटो एक्सपो 2023 मध्ये, देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती आपल्या 3 नवीन सादर करणार आहे. 2 कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक आणि 1 असेल. याशिवाय मारुती एक्स्पोमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्याही सादर केल्या जाणार आहेत. त्याच वेळी, एक्सपोमध्ये 2023 एमजी हेक्टर फेसलिफ्ट देखील लॉन्च केली जाऊ शकते. भारतीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे 14 ते 20 लाख असू शकते.

टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार सादर करणार : भारताची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स ऑटो एक्सपो 2023 मध्ये 3 नवीन ईव्ही लॉन्च करणार आहे. यामध्ये हॅरियर, सफारी एसयूव्ही आणि अल्ट्रोजच्या इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. टाटा मोटर्स एक्स्पोमध्ये नुकत्याच लाँच झालेल्या नेक्सॉन ईव्ही, टायगर ईव्ही सोबत टियागो ईव्ही देखील लॉन्च करू शकते. सहा दिवसांच्या ऑटो एक्स्पोमध्ये सर्व आघाडीच्या वाहन कंपन्यांनी एसयूव्हीमधील इलेक्ट्रिक वाहनांचे लाँचिंग केले आहे. घरासारख्या विविध सुविधा असलेल्या मर्सिडिजचे मॉडेल वाहन प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

ऑटो एक्स्पो 2023 ची वेळ आणि शुल्क : ऑटो एक्स्पो 11 ते 18 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. मात्र, 11 आणि 12 जानेवारी माध्यमांसाठी राखीव असतील. यानंतर 13 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व्यावसायिकांसाठी खुले राहणार आहे. तर 14 ते 18 जानेवारीपर्यंत सर्वसामान्यांना वाहने पाहता येणार आहेत. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत एक्स्पोला प्रवेश मिळेल. यासाठी तुम्हाला काही किंमतही मोजावी लागेल. जिथे व्यावसायिकांसाठी तिकीट दर 475 रुपये ठेवण्यात आले आहेत, तर सर्वसामान्यांसाठी 350 रुपये ठेवण्यात आले आहेत. तुम्ही (bookmyshow.COM) वर तिकीट ऑनलाइन खरेदी करू शकता.

Last Updated : Jan 13, 2023, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.