ETV Bharat / opinion

व्हिएतनाम : कोरोना युद्धातील खरा विजेता! - व्हिएतनाम कोरोना लढाई

८ मेपर्यंत जर्मनीत ७३९२, सिंगापूरमध्ये 20, तैवानमध्ये 6 आणि दक्षिण कोरियामध्ये 256 मृत्यू झाले. मात्र व्हिएतनाममध्ये कोरोनामुळे एक मृत्यू न होण्याचे कारण म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी आणि देशाची विवेकबुद्धी आणि दूरदृष्टी.

Vietnam a clear winner in COVID-19 war
व्हिएतनाम : कोरोना युद्धातील खरा विजेता!
author img

By

Published : May 12, 2020, 5:57 PM IST

हैदराबाद : कोरोनावर मात केलेल्या तैवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि जर्मनीच्या यशोगाथा आपण ऐकल्या आहेत. या सर्व देशांनी कोविड-१९चा यशस्वीरीत्या सामना केला. परिणामी हे देश आता लॉकडाउन संपविण्याच्या तयारीत आहेत. परंतु या सगळ्यात कोरोना विषाणूविरोधातील लढाई खऱ्या अर्थाने जिंकलेल्या व्हिएतनामने ही किमया कशी साधली याकडे कोणाचे लक्षच गेले नाही. महत्त्वाचे म्हणजे अगोदर नमूद केलेल्या देशांमध्ये काही प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे मात्र व्हिएतनाममध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. परंतु, जग आपल्याच समस्येत इतके व्यस्त होते की त्यांना व्हिएतनामकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही. ८ मेपर्यंत जर्मनीत ७३९२, सिंगापूरमध्ये 20, तैवानमध्ये 6 आणि दक्षिण कोरियामध्ये 256 मृत्यू झाले. मात्र व्हिएतनाममध्ये कोरोनामुळे एक मृत्यू न होण्याचे कारण म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी आणि देशाची विवेकबुद्धी आणि दूरदृष्टी.

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाला चीनी विषाणू म्हणून संबोधत आहेत. मात्र व्हिएतनाम चीनला सुरुवातीपासूनच चांगला ओळखत आहे. चीन आणि व्हिएतनाम युद्धातून व्हिएतनामने मोठा धडा घेतला आहे. व्हिएतनाममधील सायबरसुरक्षा एजन्सी 'एपीटी ३२'ला चीनमध्ये एक नवीन विषाणू पसरत असल्याचे आढळून आले. त्यावर वेळ न दवडता व्हिएतनामी सरकारने चीनच्या आपत्कालीन नियमन व वुहान महानगरपालिकेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सायबरसुरक्षा एजन्सींना नियुक्त केले.

अमेरिकन सायबर सिक्युरिटी कंपनी 'फायर आय'च्या म्हणण्यानुसार व्हिएतनाममधील सायबरसुरक्षा एजन्सी 'एपीटी ३२' ही २०१२ पासून चीन, जर्मनी आणि अमेरिकेस्थित कंपन्यांवर सायबर हल्ले करून गुपिते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. नोव्हेंबर - डिसेंबर 2019 दरम्यान सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून चीनमध्ये नवीन विषाणू मूळ धरत असल्याचे लक्षात येताच अमेरिकेप्रमाणेच व्हिएतनाम देखील या विषाणूबद्दल जाणून घेण्यास उत्सुक झाला. त्यानंतर चीनमधील व्हिएतनामी विद्यार्थी, मुत्सद्दी आणि व्यावसायिकांकडून अधिक माहिती गोळा करून वेळ न दवडता व्हिएतनामी सरकारने कृती योजना तयार केली. व्हिएतनामची चीनबरोबबर तब्बल १२८१ किमीची सीमा लागून असल्यामुळे त्यांना विषाणूचा धोका लक्षात आला आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन फेब्रुवारी २०२० मध्ये एक रणनीती आखण्यात आली. कम्युनिस्ट देश असूनही सरकारने नागरी हक्कांच्या स्वातंत्र्याचा भंग करून या उपाययोजना आखल्या.

दुसरे देश या विषयी अनभिज्ञ असतानाच फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच व्हिएतनामने विमानतळ टर्मिनल्सवर थर्मल स्क्रिनिंग करण्यास सुरुवात केली. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचा मार्ग, भेटी दिलेली शहरे आणि कोणाशी संपर्क आला याविषयीची सखोल माहिती विमानतळ अधिकाऱ्यांना द्यावी लागत असे. 38 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त शरीराचे तापमान आढळलेल्या लोकांना जवळच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये हलविले गेले. महत्त्वाचे म्हणजे त्याही पुढे जात व्हिएतनाम सरकारने रेस्टॉरंट्स, बँका, कंपन्या आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये देखील थर्मल स्क्रिनिंग सुरू केली. ८ मे पर्यंत व्हिएतनामने २ लाख ६१ हजार १०४ कोविड १९च्या चाचण्या घेतल्या आहेत. या चाचणीमध्ये कोणी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ती व्यक्ती वास्तव्यास असलेला संपूर्ण रस्ता बंद करून त्या भागाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले जाते.

या कठोर अंमलबजावणीमुळे ९ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आतापर्यंत कोविड १९च्या फक्त 288 घटना नोंदल्या गेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे टेस्टिंग किट्ससाठी चीन किंवा इतर देशांवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर त्याचे उत्पादन करण्यात येत आहे. हे किट्स बनविण्यासाठी 25 डॉलर्सचा खर्च येत असून दीड तासाच्या आत चाचणीचे निदान स्पष्ट होत आहे. देशांतर्गत पातळीवर तयार करण्यात आलेल्या कीट्सने कोरोना विषाणूच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच परदेशातून परतलेल्या व्हिएतनामी नागरिकांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत असे. ज्या देशांनी विलगीकरणाची प्रक्रिया अवलंबण्यास उशीर केला त्या देशांना आज त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. व्हिएतनामने मार्चपासूनच काही निवडक शहरांमध्ये लॉकडाउन करण्यास सुरुवात केली. बाधितांचा शोध घेऊन चाचणी घेण्यास सुरवात करण्यात आली. ज्या गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असे त्या गावाला संपूर्णपणे बंद करण्यात येई.

वर्षाच्या सुरूवातीपासूनच नागरिकांमध्ये कोरोना विषाणू विषयी जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली होती. तसेच कोरोना हा आजार सामान्य फ्लूसारखा नाही हे नागरिकांना सांगण्यात आले. पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि स्थानिक नेत्यांनी या आजाराबद्दल जनजागृती करण्यास सुरुवात केली. कोविड १९ बाधितांविषयी आणि विलगीकरण करण्यात आलेल्यांविषयीची माहिती सातत्याने देण्यात येत. हे करत असताना रुग्णाचे नाव जाहीर करण्याऐवजी त्यांचा ओळख क्रमांक देण्यात येत असत.

वास्तविक जगभरातील सर्व देश जे आज करत आहेत तेच व्हिएतनामने केले. परंतु इतर कोणाच्याही लक्षात येण्याअगोदर त्यांनी ज्या पद्धतीने कोरोना साथीच्या प्रादुर्भावाचा अगदी वेळेवर अंदाज घेत पावले उचलली ते वाखाणण्याजोगे आहे.

हेही वाचा : कोरोनावरील लसी कशा काम करतात..?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.