ETV Bharat / opinion

झोनोटिक्स, पर्यावरण संरक्षणापासून साथीच्या रोगांच्या धोक्यापर्यंत विविध घटकांवर काम करण्यासाठी सरसावले यूएनईपी - यूएनईपी

कोविड-१९च्या लढाईत लोकांच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करण्यासंबंधी यूएनईपीने आज प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. पून्हा एकदा पर्यावरणाला मजबूत बनवण्यासाठी सहकारी राष्ट्रे आणि इतर भागीदारांच्या मदत घेणे. आणि सोबतच सशक्त विज्ञान, ठोस धोरणांचा अवलंब करुन पृथ्वीला पून्हा एकदा निरोगी ग्रह बनवण्यासाठी काम करण्याचे यूएनईपीने ठरवले आहे.

UNEP steps up work on zoonotics, protecting environment to reduce pandemic risks
झोनोटीक्स, पर्यावरण संरक्षणापासून साथीच्या रोगांच्या धोक्यापर्यंत विविध घटकांवर काम करण्यासाठी सरसावले यूएनईपी..
author img

By

Published : May 13, 2020, 8:37 PM IST

हैदराबाद : कोविड-१९ हा साथीचा रोग सध्या जगभर व्यापक स्वरुपात पसरत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील साथीच्या रोगाचा पर्यावरणावर होणारा धोका कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमने (यूएनईपी) झोनोटिक (प्राण्यांपासून पसरणारा साथीचा रोग) संकटाचे मोजमाप करण्याच्या कामाचा वेग वाढवला आहे.

कोविड-१९च्या लढाईत लोकांच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करण्यासंबंधी यूएनईपीने आज प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. पून्हा एकदा पर्यावरणाला मजबूत बनवण्यासाठी सहकारी राष्ट्रे आणि इतर भागीदारांच्या मदत घेणे. आणि सोबतच सशक्त विज्ञान, ठोस धोरणांचा अवलंब करुन पृथ्वीला पून्हा एकदा निरोगी ग्रह बनवण्यासाठी काम करण्याचे यूएनईपीने ठरवले आहे.

त्यासाठी यूएनईपी चार प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये कोवीड-१९च्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास विविध राष्ट्रांना मदत करणे, निसर्ग आणि लोकांमध्ये पर्यावरणपूरक बदल घडवणे, भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी आर्थिक पुनर्प्राप्ती निधीची तरतूद करणे आणि जागतिक पर्यावरणीय कारभाराचे अत्याधुनिकीकरण करणे या चार घटकांचा समावेश आहे.

“कोरोनाच्या रुपात निसर्गाने मानवाला त्याच्या पर्यावरणीय दृष्टीकोनात बदल घडवून आणण्यासाठी आजपर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला आहे,” असे मत यूएनईपीचे कार्यकारी संचालक इंगर अँडरसन यांनी व्यक्त केले. “अर्थव्यवस्था बंद करणे हे या इशाऱ्यास दिलेला अल्पकालीन प्रतिसाद आहे. मात्र हा पर्याय असू शकत नाही. निसर्गासोबत काम करणारी अर्थव्यवस्था जगातील अनेक राष्ट्रांची भरभराट सुनिश्चित करण्याच्या बाबतीत चिंताजनक आहे.” असेही अँडरसन म्हणाले.

कोवीड-१९च्या सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने देशांना पाठिंबा देण्यासाठी यूएनईपी काम करणार आहे. त्यासाठी यूएनईपी आपले कार्य संयुक्त राष्ट्रसंघाच्या उर्वरित संस्थांशी समन्वय साधणार आहे. यामध्ये खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहेः

  • धोकादायक कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेणार्‍यांचे समर्थन करणे. ज्यामुळे भविष्यात मानवी आरोग्यास किंवा पर्यावरणाला आणखी हानी पोहचणार नाही.
  • निसर्गाकडून धोकादायक ठरणाऱ्या झोनोटीक सारख्या संकटाशी लढण्यासाठी इतर राष्ट्रांची क्षमता वाढवणे.
  • कोविड-१९ संकटाशी दोन हात करण्याचा भाग म्हणून निसर्ग आणि पर्यावरणामध्ये गुंतवणूकीच्या व्यापक संधींना चालना देणे.
  • उत्पादन आणि खपाच्या वाढीसोबतच त्याची गती वाढवण्यासाठी आणि नवीन हरित नोकऱ्या तयार करण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या खऱ्या घटकापर्यंत पोहोचणे.
  • पर्यावरणीय कारभाराचा आढावा घेणे. त्याचबरोबर कनिष्ठ पर्यावरणीय धोरणे, बैठक मंच यामध्ये बहुपक्षीयता प्रस्थापित करणे.

अँडरसन यांनी सांगितले की, “जगाला सर्वसंपन्न बनवण्यासाठी मानवी आरोग्य, समाज आणि अर्थव्यवस्था हे घटक महत्त्वपूर्ण असतात. याच घटकांना केंद्रस्थानी ठेवून यूएनईपी कार्य करते.” “परंतु आता भविष्यातील संकटे कमी करण्याच्या हेतुने बदलते हवामान, प्रदुषणावर मात देवून पृथ्वीची हरवलेली जैव-विविधतेची पुरर्स्थापित करुन अनेक राष्ट्रांना यूएनईपी पूर्वीपेक्षा अधिक मदत करत आहे.”

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.