ETV Bharat / opinion

देशाची वाढती तहान : जुन्या होत चाललेल्या धरणांची डोकेदुखी

'जुनी होत असलेली धरणे : एक जागतिक संकट' असे या अहवालाचे शीर्षक आहे. या अहवालानुसार 2050 पर्यंत जगभरातील लाखो नागरिक हे 20 व्या शतकात उभारलेल्या धरणांच्या खाली म्हणजेच प्रवाह क्षेत्रात राहत असतील. यापैकी अनेक धरणांचे त्यांच्या संरचनात्मक आयुष्य तोपर्यंत संपलेले असेल.

देशाची वाढती तहान : जुन्या होत चाललेल्या धरणांची डोकेदुखी
देशाची वाढती तहान : जुन्या होत चाललेल्या धरणांची डोकेदुखी
author img

By

Published : Jan 31, 2021, 3:28 PM IST

देशातील अनेक धरणांना 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली असून अशा जुन्या धरणांचा लक्षावधी नागरिकांच्या जीवितास धोका असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात म्हटले आहे. 'जुनी होत असलेली धरणे : एक जागतिक संकट' असे या अहवालाचे शीर्षक आहे. या अहवालानुसार 2050 पर्यंत जगभरातील लाखो नागरिक हे 20 व्या शतकात उभारलेल्या धरणांच्या खाली म्हणजेच प्रवाह क्षेत्रात राहत असतील. यापैकी अनेक धरणांचे त्यांच्या संरचनात्मक आयुष्य तोपर्यंत संपलेले असेल.

मुल्लापेरियार धरणाची केस स्टडी

तामिळनाडूतील मुल्लापेरियार धरणाचा या अहवालातील केस स्टडीत समावेश होता. केरळमधील पेरियार नदीवरील मुल्लापेरियार धरण 125 वर्षे जुने असून हे धरण फुटले तर केरळातील 35 लाख लोकांना याचा फटका बसेल असे यात म्हटले आहे.

  • मुल्लापेरियार धरणाची उंची 53.6 मीटर इतकी आहे.
  • तर धरणाची क्षमता 44.3 कोटी क्युबिक मीटर इतकी आहे.
  • हे धरण केरळमधील पेरियार नदीवर असून तामिळनाडूत धरणाचे पाटक्षेत्र आहे.
  • बांधकामाच्या वेळेस धरणाचे आयुष्य 50 वर्षे इतके निर्धारित होते. मात्र बांधकामाच्या शंभर वर्षांनंतरही धरण सेवेत आहे.
  • सध्या धरणाला काही ठिकाणी तडे गेल्याचे दिसत असून यामुळे धोका संभवतो असे यात म्हटले आहे.
  • 2009 मध्ये केरळ सरकारने नवे धरण बांधण्याची विनंती केली होती. मात्र तामिळनाडूने याला विरोध दर्शविला.
  • जुन्या होत असलेल्या मुल्लापेरियार धरणाच्या व्यवस्थापनाचा मुद्दा सध्या दोन्ही राज्यांत चर्चिला जात आहे.
  • जर हे धरण फुटले तर किमान 35 लाख लोकांना याचा फटका बसू शकतो.
    प्रातिनिधिक छायाचित्र
    प्रातिनिधिक छायाचित्र

लोकसभेत धरण सुरक्षा विधेयक मंजूर

धरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लोकसभेतही उपस्थित करण्यात आला. या अनुषंगाने ऑगस्ट 2019 मध्ये लोकसभेत धरण सुरक्षा विधेयक पारित करण्यात आले. धरणांची निगराणी, पाहणी, संचालन आणि देखभालीसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणीची शिफारस विधेयकात करण्यात आली आहे. 15 मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या किंवा 10 ते 15 मीटरदरम्यान उंची असलेल्या देशातील सर्व धरणांना विधेयकातील तरतुदी लागू असतील. दोन राज्यांमध्ये असलेल्या धरणांसंबंधीचे मुद्दे सोडविण्याची शिफारसही यात आहे. देशातील सुमारे 92 टक्के धरणे दोन राज्यांमधील नदीखोऱ्यात आहेत.

20 व्या शतकात धरणांचे बांधकाम वाढले

20 व्या शतकाच्या मध्यावर जगभरात मोठी धरणे उभारण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले. 1960-70 मध्ये तर आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत असे धरण उभारणीची सर्वाधिक कामे करण्यात आली. त्यानंतर नवी धरणे बांधण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले.

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

चीनमध्ये जगात सर्वाधिक मोठी धरणे, भारत तिसरा

जगातील मोठ्या धरणांच्या संख्येच्या बाबतीत चीन अग्रक्रमावर आहे. चीनमध्ये जगातील सर्वाधिक 23841 मोठी धरणे आहेत. त्यानंतर अमेरिकेत 9263, भारतात 4407, जपानमध्ये 3130 तर ब्राझीलमध्ये 1365 धरणे आहेत. जपान आणि ब्रिटनमधील मोठ्या धरणांचे सरासरी आयुष्य 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. या दोन्ही देशांमधील बहुतेक धरणे 20 व्या शतकाच्या पूर्वीच बांधलेली आहेत.

चीनमध्ये सर्वाधिक जुनी धरणे

आशियातील अनेक देशांतील धरणेही जुनी झालेली आहेत. चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरियातील अनेक धरणे जुनी झाली आहेत. 50 वर्षांपूर्वी उभारलेली जगातील 40 टक्के धरणे एकट्या चीनमध्ये आहेत. भारतात सध्या धरणे उभारणीचा दर जगात सर्वाधिक आहे. तर जपान आणि दक्षिण कोरियाने मात्र पृष्ठभागावर पाणी साठविण्याचे प्रमाण नियंत्रित केले आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

1965 मध्ये 200 धरणे फुटली

  • जगात 1965 मध्ये धरणफुटीच्या सर्वाधिक 200 घटना घडल्या होत्या.
  • 1950 पूर्वी उभारलेली जगभरातील 2.2 टक्के धरणे फुटल्याची आकडेवारी आहे. 1951 नंतर बांधलेल्या धरणांच्या बाबतीत हा दर 0.5 टक्क्यांपर्यंत घसरला.
  • भारतात 1917 मध्ये सर्वात प्रथम मध्य प्रदेशात धरणफुटीची घटना घडली होती. मध्य प्रदेशातील तिगरा धरण तेव्हा फुटले होते.
  • 1979 मध्ये गुजरातमधील माचू धरणफुटीची घटना ही सर्वाधिक भीषण दुर्घटना समजली जाते. या दुर्घटनेत 2000 जणांचा मृत्यू झाला होता.
  • भारतात आतापर्यंत धरणफुटीच्या 36 घटनांची नोंद आहे.
  • धरणफुटीच्या 36 घटनांपैकी 30 धरणे मातीची होती.

एकूणच जुन्या होत चाललेल्या धरणांचा नागरी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेता अशा धरणांच्या देखभाल-दुरूस्तीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.