ETV Bharat / opinion

मानवी तस्करीचा क्रूर राक्षस.. - मानवी तस्करी राक्षस

ऑगस्ट १९९१ मध्ये मानवी तस्करी चर्चेत आली. हैदराबाद ते दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील एका १० वर्षांची मुलगी सातत्याने विव्हळत असल्याचे एअर होस्टेस अमृता अहलुवालिया यांच्या लक्षात आले. अमृता यांनी त्या मुलीला याबाबत विचारले असता त्यांना समजले की तिचे लग्न एका ६० ते ७० वर्षे वयाच्या व्यक्तीशी झाले आहे आणि तो तिला आखाती देशात घेऊन जात आहे. एअर होस्टेसने प्रयत्न करून त्या मुलीला देशातून बाहेर जाण्यापासून रोखले आणि तिच्या तथाकथित पतीवर कायदेशीर कारवाई व्हावी हे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली....

The evil of human trafficking
मानवी तस्करीचा क्रूर राक्षस..
author img

By

Published : Aug 6, 2020, 8:01 PM IST

हैदराबाद : ऑगस्ट १९९१ मध्ये मानवी तस्करी चर्चेत आली. हैदराबाद ते दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील एका १० वर्षांची मुलगी सातत्याने विव्हळत असल्याचे एअर होस्टेस अमृता अहलुवालिया यांच्या लक्षात आले. अमृता यांनी त्या मुलीला याबाबत विचारले असता त्यांना समजले की तिचे लग्न एका ६० ते ७० वर्षे वयाच्या व्यक्तीशी झाले आहे आणि तो तिला आखाती देशात घेऊन जात आहे. एअर होस्टेसने प्रयत्न करून त्या मुलीला देशातून बाहेर जाण्यापासून रोखले आणि तिच्या तथाकथित पतीवर कायदेशीर कारवाई व्हावी हे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थात नंतर त्याला जामीन मिळाला आणि तो बनावट पासपोर्टवर देश सोडून गेला देखील. पण ती एक वेगळी घटना आहे.

त्यानंतर, उंटांच्या शर्यतीसाठी ४ ते १० वर्षे वयोगटातील तरुण मुलांची आखाती लक्षाधीशांना विकल्याची उदाहरणे समोर येऊ लागल्याने मानवी तस्करी आणि शोषणाची चर्चा कायम राहिली. या मुलांना उंटाच्या पाठीवर जॉकी म्हणून बांधण्यात येई. मुलांच्या किंचाळण्यावर उंटांच्या धावण्याची गती अवलंबून होती. त्यापैकी ज्या मुलांना व्यवस्थित बांधले जात नसे अशी मुले खाली पडून उंटांच्या पायदळी तुडवली जात. जे त्या जीवघेण्या शर्यतीतून बचावत त्यांना आपल्या कष्टमय आणि अनिश्चित आयुष्याचा सामना करावा लागत. तर, अनेक जण लैंगिक शोषणाला देखील बळी पडत.

अलीकडेच, वीटभट्ट्यांमधील कामगारांचे कंत्राटदारांकडून शोषण होत असल्याचे आढळले आहे. महिला व मुलांचा समावेश असलेल्या कामगारांना अक्षरशः गुलामाप्रमाणे वागणूक दिली जात आणि त्यांनी तासन तास काम करावे अशी अमानुष अपेक्षा या कंत्राटदारांची असत. बदल्यात त्यांना चांगला मोबदला देखील जात नसत. २०१३ मध्ये काही वीटभट्टी कामगार ठेकेदारांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाले परंतु दुर्दैवाने ते पकडले गेले आणि त्यांना आपले हात किंवा पाय गमवावे लागले.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राने मानसी बारीहा या एका आदिवासी मुलीच्या शौर्याची घटना समोर आणली होती. वीटभट्टीवर काम करण्याच्या बदल्यात मानसीला आठवड्यातून २५० रुपये मिळत. जेव्हा तिला व इतरांना तिथून निघून जावेसे वाटले तेंव्हा कंत्राटदाराने आणि त्याच्या गुंडांनी त्यांना निर्दयीपणे मारहाण केली. मानसीने या घटनेला सोशल मीडियावर शेयर केले आणि जेव्हा हे रेकॉर्डिंग व्हायरल झाले तेव्हा प्रशासनाला खडबडून जाग आली आणि तामिळनाडूमधील तब्बल ६००० हून अधिक वीटभट्टी कामगारांचे प्राण वाचले.

मानवी तस्करीला बळी पडलेल्या अनेक पीडितांचे लैंगिक शोषण होत असल्याचे काही उदाहरणावरून स्पष्ट झाले. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जगभरात होत असलेल्या एकूण मानवी तस्करीपैकी सुमारे ७० टक्के तस्करी महिला आणि मुलींची होते. लैंगिक शोषण करण्याचा हेतू नसेल तर त्यांची तस्करी का केली जाईल?भारतात महिला आणि मुलांची तस्करी कमी होत असल्याचे मानण्याचे कोणतेही कारण नाही. परंतु, अर्थातच ही टक्केवारी कितीही असली तरी ती स्वीकारार्ह असू शकत नाही. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांपैकी बरेच लोक अत्यंत गरीब आहेत आणि त्यांनी घेतलेल्या कर्जाची त्यांना परतफेड करता येत नसल्याने हे शोषण केले जाते. हालाखीच्या परिस्थितीमुळे पालकांनी आपली लहान मुले विकल्याची अनेक उदाहरणे आहेत. तरूण मुला-मुलींचे अपहरण करुन त्यांना तस्करी माफियांना विकल्याची देखील उदाहरणे आहेत.

मानवी तस्करीचे इतर अनेक प्रकार बाल विवाह किंवा बालमजुरी किंवा जबरदस्तीने मजुरी करून घेणे अशा काही अत्याधुनिक शीर्षकाखाली येतात. माझ्या मते हे गुलामगिरीचेच क्रूर प्रकार आहेत. मानवी तस्करीचे सर्वात नवीन रूप म्हणजे सायबर ट्रॅफिकिंग. यात तरूण मुलींना इंटरनेटवर तस्करी करणाऱ्या व त्यांच्या एजंट्सकडून आकर्षित केले जाते आणि शेवटी त्यांना देह व्यापारात ढकलले जाते. यापैकी बहुतेक संवाद किंवा व्यवहार इंटरनेटवर होत असल्याने बऱ्याच पीडितांना हे माफिया ओळखणे अवघड असते. यामुळे तस्करांना पकडणे कठीण होते आणि त्याच्यावर किंवा तिच्याविरुद्ध खटला चालवणे कठीण होते.

दिल्लीत नुकतेच तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली तेंव्हा या माफियांचे समाजातील तथाकथित प्रभावशाली व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांसोबत असलेले संबंध उघड झाले. असे मानले जाते की २००० सालापासून म्हणजेच मागील २० वर्षांपासून ही महिला दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात कार्यरत होती आणि २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत देखील तिची अमानवी कृत्ये कोणाच्या लक्षात आली नाहीत किंवा काही कारणास्तव ती थांबिली गेली नाहीत.

मानवी तस्करीविरूद्ध लढा देण्याच्या हेतूने आणि त्यांचा समाजावर होणार दुष्परिणाम रोखण्यासाठी जागतिक जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने ब्लू हार्ट मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक मानवी तस्करी दिन साजरा केला गेला त्यावेळी मला हैदराबादची प्रख्यात स्वयंसेवी संस्था 'प्रज्वला"ने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. मानवी तस्करीच्या संकटातून बाहेर पडलेल्या तीन व्यक्तींचे विचार आणि अनुभव या वेबिनार मध्ये प्रसारित केले गेले, हे व्यक्ती 'अपराजिता' नावाच्या मानवी तस्करीतून सुटका करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या फोरमचे प्रतिनिधित्व करतात. त्यापैकी एकाला तिच्या आईने वेश्याव्यवसायात विकले होते तर दुसरीला 'मित्राने' फसवले होते. तिसऱ्या व्यक्तीला ती ज्या शाळेत शिकत होती तेथील कर्मचाऱ्याने तिला हैदराबादहून दिल्लीला आणत रेड-लाइट क्षेत्रात विकले होते. त्यांनी कथन केलेले अनुभव एकूण या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना हादरवून टाकले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देशातील अन्य १४ राज्यांमधील सहभागींचे अनुभव देखील अशाच प्रकारचे होते.

मानवी तस्करी रोखण्यासाठी समाज म्हणून आपण काय करू शकतो? सद्यस्थिती पाहता मानवी तस्करीच्या भयानक राक्षसाला आपण पूर्णपणे रोखू शकत नसलो तरी निश्चितपणे बर्‍याच अंशी नियंत्रित केले जाऊ शकते. लैंगिक हेतूने किंवा अन्य कारणामुळे मुलांचे आणि स्त्रियांची होणारी तस्करी किंवा शोषण थांबवून त्यांना योग्य आणि सन्मानपूर्वक जीवन जगता यावे असे वातावरण निर्माण करणे हे आपल्यासारख्या कल्याणकारी राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना अधिक सतर्क असले पाहिजे जेणेकरुन ते तस्कर आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींचे असलेले संबंध उजेडात आणू शकतील. यासाठी सकारात्मक किंवा चांगले बदल घडवून आणण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. वरील तीन व्यक्तींनी सुचविल्याप्रमाणे मानवी तस्करीपासून बचावलेल्यांसाठी निवारा घरे स्थापन करणे आवश्यक आहे. परंतु मुझफ्फरपूर येथील राजकीय आश्रयाखाली आणि राज्याने दिलेल्या निधीने चालणाऱ्या एका निवारा गृहात घडलेल्या सामूहिक बलात्कारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांची प्रभावी देखरेख झाली पाहिजे.

या सर्वांमध्ये समाजाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. समाजात घडणाऱ्या बालकामगार, जबरदस्तीचे काम करून घेणे किंवा लैंगिक शोषणाशी संबंधित नसलेल्या इतर कोणत्याही प्रकारच्या अन्यायाबाबत आपण सावध राहत आणि कर्तव्य पार पाडत या घटना संबंधित विभागाच्या किंवा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या पहिजेत. जोपर्यंत आपण समाज म्हणून सामूहिक पातळीवर काम करत नाही तोपर्यंत हा राक्षस आपल्या मुलांना आणि स्त्रियांना मोठ्या प्रमाणात गिळंकृत करत राहील. आपण ते होऊ देता कामा नये.

- मदन बी. लोकूर, (माजी न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.