ETV Bharat / opinion

बर्ड फ्ल्यूच्या आपत्तीने पसरले 'पंख'

सध्या देशात कोरोनानंतर 'बर्ड फ्ल्यू' धुमाकूळ घालत आहे. देशात अनेक ठिकाणी बर्ड फ्ल्यूचा प्रसार झाला असून लाखो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. प्रशासन देखील युद्धपातळीवर कामाला लागले आहे. एकूणच देशात 'बर्ड फ्ल्यू'च्या आपत्तीने आपले 'पंख' पसरले आहेत.

bird flu outbreak
बर्ड फ्ल्यू प्रसार
author img

By

Published : Jan 16, 2021, 7:49 AM IST

हैदराबाद - अगोदरच सार्वजनिक आरोग्याची अवस्था वाईट असताना, कोरोना विषाणुच्या महामारीने ती आणखीच खराब केली. आणि आता देश जेव्हा कोविड-१९ महामारीविरोधात लढण्यासाठी आपली सर्व ताकद लावत असतानाच पक्ष्यांना एव्हियन फ्ल्यूची लागण होण्याचे भयावह प्रकार देशातील दहा राज्यांमध्ये समोर आले आहेत. स्थलांतर पक्ष्यांनी आणलेल्या एव्हियन फ्ल्यूच्या विषाणुमुळे राजस्थानात कावळे आणि गरूडांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत.

३१ डिसेंबर, २०२० रोजी, भोपाळ येथील राष्ट्रीय पशु प्रयोगशाळेने आमच्याकडे पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी पक्ष्यांचे मृतदेह सोपवण्यात आले, त्यातून एव्हियन इन्फ्ल्युएंझाचे विषाणू सापडल्याचे ठामपणे सांगितले आहे. बर्ड फ्ल्यू जराही वेळ न दवडता. इंदूर, गुजरात, दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि हरियाणात पसरला. एव्हियन फ्ल्यू विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी ज्या क्षेत्रांमध्ये एव्हियन बर्ड फ्ल्यूची प्रकरणे आढळली आहेत, तिथपासून एक किलोमीटर परिसरात पोल्ट्रीमधील पक्ष्यांना नष्ट करून वैज्ञानिक पद्धतीने पुरण्याचे प्रयत्न संबंधित राज्य सरकारे युद्धपातळीवर करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना याबाबतीत सतर्क करताना म्हटले होते की, ज्या राज्यांमध्ये आतापर्यंत बर्ड फ्ल्यूची लक्षणे आढळली नाहित, त्यांनीही सतर्कता पाळली पाहिजे. एव्हियन बर्ड फ्ल्यूमुळे २००६ आणि २०१८ या कालावधीत जवळपास ८३ लाख पोल्ट्री पक्ष्यांना(कोंबड्या) ठार मारण्यात आले किंवा पुरण्यात आले आहे. यावेळीही सरकारी यंत्रणा हेच धोरण अनुसरत आहे. मात्र पोल्ट्री उद्योगाचे कमीत कमी नुकसान होईल, याची सुनिश्चिती करण्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. कोविड-१९ ने उत्पादन आणि सेवा क्षेत्र दोघांनाही जोरदार तडाखा दिला आहे. प्रचलित महामारी असूनही, कृषी क्षेत्र हेच असे होते की ज्याची प्रगति अबाधितपणे झाली. परंतु एव्हियन बर्ड फ्ल्यूच्या आगमनामुळे या क्षेत्रालाही प्रभावित केले आहे. कृषि मंत्रालयाच्या अंदाजानुसार, देशात ७३ कोटी कोंबड्या आहेत.

ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी भयानक विषाणुपासून त्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. आपल्या १२८ प्रकारच्या विविध विषाणुंसह, एव्हियन बर्ड फ्ल्यू विषाणुने यापूर्वी अनेक देशांमध्ये घबराट पसरवली होती. जागतिक पशु आरोग्य संघटनेने अलिकडेच असे म्हटले होते की, गेल्या वर्षी ४ ते २४ डिसेंबरदरम्यान, एव्हियन बर्ड फ्ल्यूने १४ देशांमधील ७४ ठिकाणांना तडाखा दिला होता. बर्ड फ्ल्यूचा विषाणु मानवांना संसर्गित करत नसला तरीही, विषाणुचा एच ५ एन १ हा बदललेला प्रकार मानवांमध्ये संसर्गजन्य रोग होऊन बसू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. बर्ड फ्ल्यूच्या विरोधातील लढ्याचा भाग म्हणून, मृत कोंबड्या आणि इतर संसर्ग झालेल्या पक्ष्यांना हातमोजे असल्याशिवाय स्पर्ष करू नये. जेव्हा पक्षी रहस्यमय कारणांमुळे मरण पावतात, तेव्हा सरकारी यंत्रणेला ताब़डतोब कळवले पाहिजे.

आजाराचा प्रसार होणे रोखायचे असेल तर प्रत्येकाला या खबरदारीबद्दल शिक्षित केले पाहिजे. केंद्र सरकारने एव्हियन बर्ड फ्ल्यूच्या नियंत्रण आणि निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृति योजनेचे कठोरपणे पालन केले पाहिजे, यावर जोर दिला आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार,२००३ पासून बर्ड फ्ल्यूमुळे १७ देशांमधील ८६२ मानव संसर्गित झाले आहेत. तर ४५५ संसर्गित मानवांचा मृत्युही झाला आहे. कोविड-१९ साठी जनजागृती कार्यक्रमासोबतच बर्ड फ्ल्यूबाबत राज्य सरकारांनी जनजागृती केली पाहिजे. असे केल्याने, विषाणुच्या बदलत्या प्रकारांपासून ते लोकांचे संरक्षण करू शकतील आणि प्रचंड म्हणजे तब्बल ८० हजार कोटी रूपयांचे मूल्य असलेले पोल्ट्री क्षेत्रही वाचवता येईल. अफवांनी पोल्ट्री क्षेत्राचे साडेसात हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. पोल्ट्री क्षेत्राला अद्यापही त्या नुकसानातून सावरता आलेले नाही. भारतीय खाद्यपदार्थ हे ७० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तपमानात शिजवले जात असल्याने या उष्णतेत विषाणु जिवंत राहू शकत नाहि, याबाबत ग्राहकामध्ये जागृती केली पाहिजे. शाकाहारी पदार्थाचे सेवन करण्याच्या सुरक्षित पद्धतींमुळे आजारासाठी आवश्यक प्रतिकारशक्ति निर्माण होते, त्यामुळे स्वतःला सुसज्ज करून लोकांनी एव्हियन बर्ड फ्ल्यूच्या उच्चाटनात सहभाग घेतला पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.