ETV Bharat / opinion

New Marriage Bill 2021 : विचार मंथन : विवाहाचे वय नेमके किती असावे? - नवीन विवाह कायदा 2021

सुरुवातीच्या काळात जगभरामध्ये कोणत्याही समाजात विवाहाकरता वयाचे कोणतेही नियम ( Age for Marriage ) नव्हते. म्हणजे अगदी एखादी स्त्री गरोदर राहिल्यापासूनच तिच्या पोटातील बाळाचे लग्न ठरवण्यापासून पाळण्याला बाशिंग बांधून लग्न करायची प्रथाही ( traditions of Marriages in History ) प्रचलित होती. अर्थात त्या काळात कोणतेही वयाचे बंधन नव्हते. नंतर समाज विकसित होत गेला आणि विवाहाची संकल्पना जन्माला आली. त्यातून विवाहाचे वय निश्चित करण्यापर्यंतचा प्रवास सुरू झाला. भारताने याबाबत नुकताच एक निर्णय घेतला आहे. मुलींच्या विवाहाचे वय २१ असावे असा निर्णय घेण्याता आला. त्याअनुषंगाने हा लेखाजोखा...

New Marriage Bill 2021
New Marriage Bill 2021
author img

By

Published : Jan 1, 2022, 10:19 PM IST

Updated : Jan 3, 2022, 10:59 PM IST

जेव्हा एक समाज म्हणून मानव विकसित झाला. त्यावेळी अनेक संकल्पना सामाजिक जाणिवेतून आकाराला आल्या. त्यापैकी एक म्हणजे विवाह संकल्पना आहेत. यामध्ये दोन जीवांच्या मानसिक मीलनाबरोबरच शारीरिक मिलनाचा विचार हाच गाभा होता. त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य जपणे ही त्यामागची भूमिका होती. त्यानुसार जगभरात विविध प्रथांच्या नुसार विवाह व्यवस्था जन्माला आली. नुकतेच विवाहाचे वय काय असावे याबाबत एक विधेयक संसदेत मांडण्यात आले. या विधेयकाला आधी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. त्यामध्ये मुलींचे विवाहाचे वय 21 असावे असा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने मुलींच्या विवाहाचे वय नेमके किती असावे, यासंदर्भातील उहापोह करणारा हा लेख.

मुली सज्ञान झाल्यावर विवाहयोग्य झाली, असा होता अलिखित विचार ( Age for girls marriage )

सुरुवातीच्या जगभरामध्ये कोणत्याही समाजात विवाहाकरता वयाचे कोणतेही नियम नव्हते. म्हणजे अगदी एखादी स्त्री गरोदर राहिल्यापासूनच तिच्या पोटातील बाळाचे लग्न ठरवण्यापासून पाळण्याला बाशिंग बांधून लग्न करायची प्रथाही प्रचलित होती. अर्थात त्या काळात कोणतेही वयाचे बंधन नव्हते. लग्न कोणत्याही वयात झाले, तरी सर्वसाधारणपणे मुले आणि मुली सज्ञान झाल्यावर विवाहयोग्य झाली, असा एक अलिखित विचार होता. मुले आणि मुली सज्ञान होणे याबाबत शारीरिक जडणघडणीचा मुद्दा महत्वाचा होता. म्हणजेच मुलगी रजस्वला झाली की ती वयात आली. तिचे लग्न आधी पाळण्यात जरी लावले असले तरी यानंतरच योग्य विचार करुन तिचे खरे वैवाहिक आयुष्य सुरू होत असे. या वयापर्यंत सर्वसाधारणपणे मुली माहेरीच राहात असत, बहुतांश समाजांमध्ये तसा रिवाजच होता. यानंतरच साखर वाटून त्यांची सासरी पाठवणी करण्यात येत असे. उत्तर भारतात याचा संदर्भ गौना प्रथेमध्ये दिसून येतो.

हेही वाचा-Ankita Lokhande Marriage Photos : अंकिता विकी लग्नबंधनात, पाहा लग्नसोहळ्यातील काही खास फोटो

हा सर्वसामान्य विचार पुढे आला ( various opinions about of girls Marriage )

विवाहाचा विचार करताना जगभरामध्ये जे काही नियम-कायदे करण्यात आले आहेत, त्यामध्ये पुनरुत्पादन, संतती, वंश सातत्य अशा शारीरिक संबंधाच्या अनुषंगाने विविध मतांची मांडणी करण्यात आल्याचे दिसते. विवाहानंतर सर्वात महत्वाचा प्रमुख घटक शरीर संबंध हाच मानण्यात आलेला आहे. भारतासह जगभरामधील कायद्यांमध्येही याचा संदर्भ दिसून येतो. विवाह संस्काराने एकप्रकारे दोन जीवांच्या शारीरिक संबंधाला समाजमान्यता देण्यात येते. तेच विवाहाचे मूळ आहे. यामुळेच जेव्हा लग्नाचे वय ठरवण्याचा विचार पहिल्यांदा समोर आला. त्यावेळी शरीरसंबंधासाठी योग्य शारीरिक तयारीचा मुद्दा चर्चिला गेला. त्यामध्ये मुलींच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट होत गेली ती म्हणजे मुलगी रजस्वला होणे किंवा ती वयात येणे. त्यानंतर ती लग्नास योग्य, असा सर्वसामान्य विचार पुढे आला. त्याला सुरुवातीच्या काळात बहुतांश समाजांमध्ये मान्यता देण्यात आल्याचे दिसते.

हेही वाचा-Year End 2021 : कॅटरिना कैफसह या 5 अभिनेत्रींनी बांधली लग्नगाठ

विवाह कायद्यात झाला बदल ( Change in girls marriage age by India law )

पुढे वैद्यकशास्त्र प्रगत होत गेले. त्यानंतर पुनरुत्पादनासाठी मुलीचे शरीर तयार होण्यास प्रथम रजस्वला झाल्यानंतर काही काळ जाणे गरजेचे असल्याचे अभ्यास तसेच निरीक्षणावरुन लक्षात आले. त्यामुळे मुलगी रजस्वला झाली की लगेच ती लग्नाला किंवा शरीरसंबंधासाठी योग्य वयात आली असा रुढ असलेला समज हळू-हळू मागे पडत गेला. त्यामुळे मुलीचा गर्भाशय परिपक्व झाल्यानंतरच तिचे लग्न करावे आणि तिला शरीरसंबंधासाठी मान्यता देण्यात यावी याचा विचार विवाहाबाबतच्या नियम आणि कायद्याच्या अनुषंगाने पुढे आला. त्यानुसार भारतातही मुलीचे लग्नाचे किमान वय १८ ठरविण्यात आले. तर मुलाचे लग्नाचे वय २१ ठरवण्यात आले. त्यानुसार विवाह कायद्यात बदल करण्यात आला.

हेही वाचा-Bollywood couples : रणबीर आलियासह बॉलिवूडच्या चार लग्नाळू जोडप्यांनी टाळले 2021 मध्ये लग्न

आवाजी मतदानाने नवीन विवाह कायदा मंजूर ( new marriage bill India )

आता नव्याने याही विषयावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. खासदार जया जेटली यांच्या नेतृत्वात याविषयावर अभ्यास करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने यासंदर्भात अनेकांची मते, विचार घेऊन आपला अहवाल तयार केला. त्यानंतर मुलींचे लग्नाचे वय २१ असावे याबाबत त्यांनी शिफारस सरकारला केली. त्या शिफारसीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. अखेर आवाजी मतदानाने याबाबतचे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले.

विवाहाच्या वयासंदर्भात मत-मतांतरे

या सर्व कायदेशीर बाबी होत असताना आणखीही काही बाबी समोर येत आहेत. तसेच विवाहाच्या वयासंदर्भात मत-मतांतरे आजही दिसत आहेत. विवाह जरी शरीरसंबंधाला समाजमान्यता देणारा संस्कार असला तरी दोघांचीही मानसिक तयारी त्यासाठी झाली आहे का, हे पाहणे अधिक महत्वाचे ठरते. त्याही पुढील बाब म्हणजे फक्त मानसिक तयारी असणेही योग्य नाही, तर शरीरसंबंधासाठीची मानसिक परिपक्वताही आलेली आहे का हे अधिक महत्वाचे ठरते. त्याचाही विचार यामध्ये केलेला दिसतो.

नवीन विवाह कायद्याचे फायदे ( New marriage law benefits for girls )

मुलींचे लग्न लावून द्यायचे म्हटल्यानंतर त्यांना अर्धवट शिक्षण सोडण्याची वेळ १८ वर्षे किमान वय ठेवल्याने बहुतांश मुलींवर येत होती. आता विवाहाचे वय २१ वर्षे झाल्यावर किमान पदवीपर्यंतचे शिक्षण तरी मुलींना घेता येईल. नवीन कायद्यामुळे मुलींना आणखी तीन वर्षे शिकण्यासाठी पालकांच्याकडे आग्रह धरता येईल. ही मुलींच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणता येईल. लग्नापूर्वीच मुलींना यामुळे शिक्षण पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. लग्नामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले ही सल मुलींच्या मनात राहणार नाही.

अंतिम कायदा अस्तित्वात येईल त्यावेळी नेमक्या काय तरतुदी आहेत. तसेच त्यामध्ये नेमके कोणते संदर्भ आणि विचार यांचा आढावा घेतला आहे, ते स्पष्ट होईलच. सध्या तरी विवाहाच्या बाबतीतही आता स्त्री-पुरुष समानता यानिमित्ताने येणार आहे असेच म्हणावे लागेल.

अभ्युदय रेळेकर, aprelekar@gmail.com

हेही वाचा-Difficulty in marriage Corona new restrictions : कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे वधू-वर कुटुंबांची धावपळ

Last Updated : Jan 3, 2022, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.