हैदराबाद : पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या पेरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनने नवीन संशोधनासाठी आतापर्यंतच्या वापरण्यात आलेल्या कागदपत्रांच्या तपशीलाचा वैद्यकीय साहित्यात समावेश केला आहे. अलिकडेच या माहितीचा ऑफ-लेबल आणि प्रयोगिक उपचारासाठी १०० पेक्षा अधिक वेळा वापर केल्याचा अहवाल संबंधित डॉक्टरांनी दिला आहे.
कोविड-१९ रेजिस्ट्री ऑफ ऑफ-लेबल अँड न्यू एजंट्स (कोरोना) नावाचा हा उपक्रम आहे. ज्याद्वारे कोरोना उपचारासंबंधी काय नवीन संशोधन झाले? कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची उपचार पद्धती वापरली? अशा प्रकारच्या माहितीची यादी तयार केली जाते. ज्याचा वापर यादृच्छिक क्लिनिकल चाचणीत पुढील संशोधनासाठी उपचार पद्धती शोधण्यासाठी केला जाईल.
“आपण आधीपासून वापरलेली साधने साठवली नाहीत आणि प्रभावी ठरतील अशा नवीन साधनांचा शोध घेतला नाही तर, आपण ही लढाई जिंकू शकत नाही. जगभरात सध्या ऑफ-लेबलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र याचा पाठपुरावा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे आम्हाला वाटलं की, अशाप्रकारची एखादी यंत्रणा असायला हवी.” असे या अभ्यासाचे अग्रणी लेखक आणि ट्रान्सलेशनल मेडिसिन अॅन्ड ह्युमन जेनेटिक्सचे सहाय्यक प्राध्यापक डेव्हिड सी. फाजेनबाउम म्हणाले.
फाजेनबाउमच्या टीमने आतापर्यंत कोविड-१९ च्या उपचारासंबंधी तपशीलात माहिती देणाऱ्या जगभरातील सुमारे २ हजार ७०० प्रकाशित कागदपत्रांचा आढावा घेतला आहे. त्या तपशीलाच्या अधारे त्यांनी एकूण ९ हजार १५२ रूग्णांची तपशीलवार माहिती गोळा केली आहे. त्यांना या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांनी तब्बल ११५ वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर केल्याचे आढळले. त्यांनी या उपचारांची वर्गवारी करुन त्यांचे वेगवेगळ्या गटात विभाजन केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये वापरलेले अँटीव्हायरल सर्वसामान्य होते. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि कोर्टिकोस्टेरॉइड्सचा सर्वाधिक वापर केला आहे. इतर उपचार पर्यायांमध्ये इम्युनोसप्रेसन्ट्स आणि रक्ताच्या पर्यायांचा वापर केल्याचे या विश्लेषणात समोर आले आहे.
“आमच्या ग्रुपने गेल्या काही वर्षांमध्ये कॅसलमॅन रोगामुळे रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या सायटोकीन हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांचा अभ्यास केला आहे. म्हणून मला आनंद आहे की, आम्ही हीच तत्त्वे कोविड-१९ वर लागू करण्यात सक्षम आहोत. आमचे हे कार्य आजतागायत सुरूच आहे. त्याचबरोबर आम्ही वैद्यकीय साहित्यात नोंदवल्या जाणार्या इतर उपचारांची माहिती संकलित करत असल्याने आम्ही या औषधाची यादी दररोज अद्ययावत करीत आहोत.” अशी माहिती सीएसटीएलच्या क्लिनिकल रिसर्चच्या सहयोगी संचालक शैला पिअर्सन यांनी दिली.