ETV Bharat / opinion

इंटरनेटवर गोपनियतेचा पंचनामा सुरूच, हमाम में सब नंगे

सध्या सोशल मीडिया किंवा समाजमाध्यमांचे युग सुरू आहे असे म्हणता येईल. त्याचबरोबर आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक अशा सर्वच प्रकारचे व्यवहार आता-आतापर्यंत संस्थांच्या माध्यमातून इंटरनेटच्या महाजालामध्ये सुरू होते. आता हे व्यवहार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सुरू झाले आहेत. फोन पे, गुगल पे, पेटीएम बरोबरच आता विविध कंपन्या तसेच व्हॉट्स अपसारख्या समाज माध्यमातूनही पैशांचा व्यवहार आपण करू शकतो. जगभरात अशा कंपन्यांचा सुळसुळाट झालेला दिसतो.

author img

By

Published : Sep 3, 2021, 6:10 PM IST

Updated : Sep 4, 2021, 10:14 AM IST

सोशल मीडियाचा प्रतिकात्मक फोटो
सोशल मीडियाचा प्रतिकात्मक फोटो

इंटरनेटचे युग सुरू होऊन आता जमाना झाला. त्याच्याच आधारे सध्या सोशल मीडिया किंवा समाजमाध्यमांचे युग सुरू आहे असे म्हणता येईल. त्याचबरोबर आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक अशा सर्वच प्रकारचे व्यवहार आता-आतापर्यंत संस्थांच्या माध्यमातून इंटरनेटच्या महाजालामध्ये सुरू होते. आता हे व्यवहार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सुरू झाले आहेत. फोन पे, गुगल पे, पेटीएम बरोबरच आता विविध कंपन्या तसेच व्हॉट्स अपसारख्या समाज माध्यमातूनही पैशांचा व्यवहार आपण करू शकतो. जगभरात अशा कंपन्यांचा सुळसुळाट झालेला दिसतो.

'फोननंबरच्या सुतावरुन स्वर्ग गाठता येऊ शकतो अशी परिस्थिती आहे'

कोणत्याही पैशाचा व्यवहार करण्यात येणाऱ्या अॅपमध्ये किमान काही माहिती देणे बंधनकारक असते. यामध्ये नोंद करण्यासाठी आपला फोन नंबर तर अत्यावश्यक असतोच, त्याचबरोबर आपली इतरही माहिती तसेच आपल्या खात्याची माहिती घेण्यात येते. तांत्रिक माहिती असेल तर इंटरनेटच्या महाजालात एवढी जोडाजोडी आहे की, फक्त फोननंबरच्या सुतावरुन स्वर्ग गाठता येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. यातून आर्थिक गैरव्यहार, आर्थिक चोरी या गोष्टी तर आता सरावलेल्या आहेतच. त्याचबरोबर प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि खासगी गोष्टी यावरही नजर ठेवली जात आहे हे आज त्रिकालाबाधित वास्तव आहे.

'डाटाची चोरी करुन त्याचा व्यावसायिक वापर सर्रास होताना दिसतो'

डाटा हा आज परवलीचा शब्द झालेला आहे. मात्र याच डाटाची चोरी करुन त्याचा व्यावसायिक वापर सर्रास होताना दिसतो. तसेच बदनामी आणि खंडणी वसुलीसाठीही याचा उपयोग होत असल्याची उदाहरणे आहेत. हे सगळे आपल्या नकळत घडत असते असे म्हटले तर तांत्रिक दृष्ट्या सर्वसाधारणपणे ते योग्य ठरणार नाही. कारण आपण कोणतीही माहिती देताना, तसेच देण्यापूर्वी आपल्याला सर्व संबंधित अटी आणि शर्थी सांगितलेल्या असतात. आपण त्या सर्व अनाहुतपणे मान्य केलेल्या असतात. त्यामुळे एकप्रकारे आपणच स्वतःचे कपडे काढून त्यांच्या हाती दिलेले असतात असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

'सोशल मीडिया हँडल तसेच इतर माध्यमातून आपला नंबर आणि आपली माहिती संबंधित कंपन्यांकडे पोहोचलेली असते'

एकदा का आपल्या माहितीची दोरी संबंधित कंपन्यांच्या हाती गेली की त्यांचा खेळ सुरू होतो. याची सुरुवात आपणच करतो. यासाठी साधं उदाहरण देता येईल. आपण एखाद्या पॉश मॉल किंवा साखळी दुकानात जातो. त्यावेळी बिल करताना आपल्याला फोन नंबर विचारला जातो. आपण सहजच आपला फोननंबर तिथे काउंटरला देतो. तो नंबर सिस्टिममध्ये टिपून घेण्यात येतो. त्यानंतर आपल्यामागे मेसेजचा ससेमिरा... अधून-मधून कॉल येणे सुरू होते. अनेकदा असे अनुभवास येते की, आपला नंबर या कंपनीला मिळालाच कसा असा प्रश्न पडेल अशा प्रकारच्या कंपन्यांकडूनही आपल्याला फोन यायला लागतात, मेसेज यायला लागतात. वास्तविक सोशल मीडिया हँडल तसेच इतर माध्यमातून आपला नंबर आणि आपली माहिती संबंधित कंपन्यांकडे पोहोचलेली असते. आपल्या नंबर तसेच सोशल मीडिया हँडलवरील आपल्या हालचालीवरुन आपली आवड-निवड निश्चित होत असते. त्यावर ज्यांच्या-ज्यांच्याकडे आपला नंबर असतो, त्यांची नजर असते. मग आपल्याला फोन येणे, मेसेज येणे सुरू होते. हे एकप्रकारचे जाळे असते. या जाळ्यात आपण जर बेसावध राहिलो तर अलगदपणे अडकतो. मग ते क्रेडिट कार्डचे मेसेज असो किंवा विम्याचे किंवा समाज माध्यमावर फ्रेंडरिक्वेस्टचे...

'आपल्यापुढे 'अपडेट'चा पर्याय ठेवला जातो'

या विषचक्रात एकदा अडकले की आर्थिक अपव्यय होतो. वेळेचा अपव्यय होतो. फसवणूक होते. बहुतांशवेळा या गोष्टी अनेकजण विकतचा अनुभव घेतला असे म्हणून गप्प बसतात. काहीजणांना मोठा फटका बसतो. ते पोलिस यंत्रणेला कळवून त्याचा बंदोबस्त करण्याची पावले उचलतात. मात्र अशा लोकांची संख्या खूपच कमी असते. अशाप्रकारे फसवणूक करणे, त्रास देणे यावर नियंत्रण आणण्यासाठी आता जगभर सरकारे कडक कायदे आणत आहेत. भारतातही सायबर कायदे अस्तित्वात आहेत. वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा केल्या जात आहेत. त्यामुळे या गोष्टींना काहीसा चाप बसला असला तरी, त्यातून सहजच पळवाट काढताना या कंपन्या दिसतात. एखादा कायदा किंवा निर्बंध आला की, लगेच त्यांच्या नियम, शर्थीमध्ये त्यानुसार बदल करुन आपल्यापुढे 'अपडेट'चा पर्याय ठेवला जातो. आपण या गोष्टींना एवढे सरावलेले असतो, की त्यातील अटी आणि शर्थी वाचण्यास आपल्याला जराही वेळ नसतो. आपण डोळे झाकून त्या मान्य करतो आणि बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे आपल्या भोवतीचे जाळे अधिकच मजबूत करत जातो.

'गोपनीयतेच्या धोरणावरून आयरर्लंडच्या डाटा संरक्षण आयोगाने व्हॉट्सअपला 26.7 कोटी डॉलरचा दंड ठोठावला आहे'

अलिकडच्या काळात कंपन्यांच्या गैरप्रकारांवर कठोर उपाययोजना करण्याबरोबरच माहितीच्या गोपनियतेचा भंग केल्यास भयंकर दंड या कंपन्यांवर ठोठावण्यात येताना दिसते. नुकतेच असे प्रकरण घडले आहे. गोपनीयतेच्या धोरणावरून आयरर्लंडच्या डाटा संरक्षण आयोगाने व्हॉट्सअपला 26.7 कोटी डॉलरचा दंड ठोठावला आहे. लोकांचा डाटा फेसबुक आणि इतर कंपन्यांशी शेअर करताना पारदर्शकता दाखविली नसल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.

'युरोपियन कायदा जीडीपीआरनुसार अॅमेझॉनला जुलैमध्ये 74.7 कोटी युरोचा दंड ठोठावला होता'

आयरर्लंडच्या डाटा संरक्षण आयोगाने निकालात म्हटले, की व्हॉट्सअपने तत्काळ उपाय योजना कराव्यात. जेणेकरून युरोपीयन युनियनच्या कायद्याप्रमाणे वापरकर्त्यांच्या हक्कांचे संरक्षण होईल. गतवर्षी सुरक्षेचा भंग केल्याने आयर्लंडच्या वॉचडॉगने ट्विटरला 45 हजार युरोचा दंड ठोठावला होता. डाटा गोपनीयतेवरून आयर्लंडच्या वॉचडॉगने युरोपियन कायदा जीडीपीआरनुसार अॅमेझॉनला जुलैमध्ये 74.7 कोटी युरोचा दंड ठोठावला होता. व्हॉट्सअप ही सुरक्षित आणि खासगी सेवेकरिता बांधील असल्याचे व्हॉट्सअपने म्हटले आहे. पारदर्शकता आणि सर्वसमावेशकतेसाठी बांधील असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. याबाबत व्हॉट्सअपने त्यांना ठोठावलेला दंड हा योग्य नसल्याचे सांगत अपील दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

'सगळ्यांचीच अवस्था हमाम में सब नंगे अशीच झालेली आहे'

हे एक उदाहरण झाले. मात्र अशी उदाहरणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच दिसतील. आपणच विविध माध्यमातून इंटरनेटच्या महाजालात एखाद्या हमामखान्यात प्रवेश केल्यासारखा 'सर्व सोडून' प्रवेश केला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच अवस्था हमाम में सब नंगे अशीच झालेली आहे. एकूणच हे सर्व पाहता 'उपरवाला सब देखता है' असे म्हणतात तसेच आपल्यावर 'त्याची' नजर आहे. असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

- अभ्युदय रेळेकर

aprelekar@gmail.com

Last Updated : Sep 4, 2021, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.