ETV Bharat / opinion

आंतरराष्ट्रीय डाळ दिनानिमित्त जाणून घ्या डाळींचे महात्म्य - nutrition value

'शाश्वत भविष्यासाठी पोषक बी' ही यंदाच्या डाळ दिनाची थीम आहे. आरोग्याच्या दृष्टीने डाळ हा उच्च पोषणयुक्त आहार आहे. असे असूनही अनेकजण डाळींच्या पोषणमूल्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रत्येकाच्याच आहारात डाळींचा समावेश नाही हे वास्तव आहे.

आंतरराष्ट्रीय डाळ दिनानिमित्त जाणून घ्या डाळींचे महात्म्य

author img

By

Published : Feb 14, 2021, 12:47 PM IST

10 फेब्रुवारी हा दिवस जागतिक डाळ दिन म्हणून साजरा केला जातो. 'शाश्वत भविष्यासाठी पोषक बी' ही यंदाच्या डाळ दिनाची थीम आहे. आरोग्याच्या दृष्टीने डाळ हा उच्च पोषणयुक्त आहार आहे. असे असूनही अनेकजण डाळींच्या पोषणमूल्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रत्येकाच्याच आहारात डाळींचा समावेश नाही हे वास्तव आहे. हीच बाब लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्राने 2018 मध्ये डाळींचे महत्व अधोरेखित करण्यासाठी एक दिवस निश्चित करण्याचा निर्णय घेतला.

2019 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय डाळ दिन साजरा

अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने 10 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय डाळ दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानुसार 10 फेब्रुवारी 2019 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय डाळ दिन साजरा करण्यात आला. अलिकडील काळात भारतात डाळींच्या सेवनाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हा दिवस आणखीनच महत्वाचा ठरत आहे.

डाळीसंदर्भातील महत्वाची तत्थ्ये

⦁ लॅटीन भाषेतील पल्स या शब्दापासून डाळींना इंग्रजीत पल्स असे संबोधले जाते. कठोर किंवा भरीव असा या शब्दाचा अर्थ आहे.

⦁ अनेक शतकांपासून मानव डाळींचे सेवन करीत असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. इसवी सन पूर्व 7 हजार ते 8 हजार वर्षांपूर्वी तुर्कीतील माणूस हरभरा आणि मसूरची शेती करत असल्याचे पुरावे पुरातत्व अवशेषांतून मिळाले आहे.

⦁ 1 पौंड डाळीच्या उत्पादनासाठी 43 गॅलन पाणी लागते. तर तेवढ्याच सोयाबीनच्या उत्पादनासाठी 216 गॅलन आणि शेंगदाण्याच्या उत्पादनासाठी 368 गॅलन पाणी लागते.

⦁ बहुतांश डाळपिके ही मुख्यत्वे नत्र स्थिरीकरणाचे काम करतात. त्यामुळे जमीनीची सुपिकता वाढविण्यासाठीही डाळपिके सहाय्यभूत ठरतात.

⦁ डाळ हे सुकलेल्या बियांच्या स्वरुपात असल्याने ते दीर्घकाळ चांगले राहते. तसेच त्यांच्या पोषणमूल्यातही घट होत नाही. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या दृष्टीकोनातून डाळ अतिशय महत्वाची ठरते.

⦁ बहुतांश डाळपिके कमी पाण्यावरही तग धरतात. दुष्काळ स्थिती सहन करण्याची क्षमता असल्याने वेगवेगळ्या ऋतुत आणि पर्यावरणात याचे उत्पादन घेणे शक्य होते.

⦁ डाळींमध्ये प्रथिने, तंतूमय पदार्थ, कॅल्शियम, लोह, आम्ल, क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.

⦁ कमी उत्पन्न असलेल्या देशांत प्रथिन सेवनात डाळींचा 10 टक्के वाटा आहे. तर शरीराला ऊर्जा पुरविणाऱ्या घटकांमध्ये 5 टक्के वाटा डाळींचा आहे.

भारतात डाळींच्या सेवनाचे प्रमाण घटले

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने 2017-18 मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार भारतात डाळींच्या सेवनाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले आहे. 2013 ते 2018 या कालावधीत डाळींच्या सेवनाचे प्रमाण 18.6 दशलक्ष टनांवरून वाढून 22.5 दशलक्ष टनांवर गेले. मात्र 2019 मध्ये हे प्रमाण 22.1 दशलक्ष टनांपर्यंत घटले. 2020 मध्ये हे प्रमाण 20.7 दशलक्ष टनांपर्यंत घटले. देशात डाळींच्या सेवनात सातत्याने घट होत असल्याचेच यावरून दिसून येत आहे.

डाळ महात्म्य

बहुतांश शेंगवर्गीय पिकाच्या सुकलेल्या बियांपासून डाळ तयार केली जाते. सुकलेले बीन्स, मसूर, वाटाणे या सामान्यपणे खाल्ल्या जाणाऱ्या डाळी आहेत. जगभरातील अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये डाळींचा वापर केला जातो. मध्य पूर्वेतील लोकांच्या आहारात हरभरा, भारतीयांच्या आहारात मसूर, वाटाणे यांचा समावेश आहे. जी पिके हिरवी असतानाच कापली जातात त्यांचा डाळीत समावेश होत नाही. जसे की हिरवे वाटाणे. त्यांचा भाजीपाल्यातच समावेश केला जातो. तर सोयाबीन, शेंगदाणे अशा पिकांचा खाद्यतेलासाठी वापर केला जातो.

डाळींचे पोषणातील महत्व

⦁ शाकाहारी व्यक्तींसाठी डाळी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. स्नायू मजबूत होण्यासोबतच वजन घटविण्यासाठीही डाळींचे सेवन फायदेशीर ठरते. चयापचय क्रियेतही डाळींच्या सेवनाने सुधारणा होते.

⦁ तंतूमय पदार्थांचा समावेश असल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठीही डाळींचे सेवन फायदेशीर ठरते. रक्तातील साखरेचे प्रमाणही यामुळे नियमित राहते.

⦁ डाळींतील तंतूमय पदार्थांमुळे पचनशक्ती सुधारते आणि आतड्यांचे कार्यही सुधारण्यास मदत होते.

⦁ डाळींच्या सेवनाने लवकर भूक लागत नाही. त्यामुळे वजन घटविण्यात डाळींचे सेवन सहाय्यकारक ठरते.

⦁ डाळींमध्ये अँटीऑक्सिडंट, ब जीवनसत्व, झिंक, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.

⦁ डाळींच्या दररोज सेवनाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यामुळे दररोजच्या आहारात डाळींचा समावेश करणे गरजेचे आहे.

सुमारे 60 टक्के डाळींचा वापर मानवाला खाण्यासाठी होतो. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये डाळींच्या सेवनाचे प्रमाण अधिक आहे. एक चतुर्थांश डाळींचे उत्पादन हे वराह आणि कुक्कुटपालनासाठी केले जाते.

हेही वाचा - नाशकात तुरडाळीची शंभरी पार, इतर डाळीही महागल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.