ETV Bharat / opinion

इराणसंदर्भात अमेरिकेच्या हुकुमापुढे झुकणार नाही : भारतीय राजदूत

author img

By

Published : Jul 26, 2020, 5:00 PM IST

इराणी राजवट आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील संबंध आणखीच बिघडत चालले असतानाच, चाबहार झिहेदान रेल्वे मार्गाच्या बांधकामात भारताच्या सहभागावरून निर्माण झालेले वाद आणि चाबहार बंदर प्रकल्पाबाबत असलेली अनिश्चितता या पार्ष्वभूमीवर, तेहरानबाबत भारत अमेरिकेच्या भूमिकेनुसार चालणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. तेहरानमधील भारताचे राजदूत गद्दाम धर्मेंद्र यांनी तेहरान टाईम्स या इंग्लिश दैनिकाच्या वरिष्ठ पत्रकारांशी साधलेल्या संवादात हे विधान केले आहे.

Not Bowing To US Diktats On Iran: Indian envoy
इराणसंदर्भात अमेरिकेच्या हुकुमापुढे झुकणार नाही : भारतीय राजदूत

हैदराबाद : इराणी राजवट आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील संबंध आणखीच बिघडत चालले असतानाच, चाबहार झिहेदान रेल्वे मार्गाच्या बांधकामात भारताच्या सहभागावरून निर्माण झालेले वाद आणि चाबहार बंदर प्रकल्पाबाबत असलेली अनिश्चितता या पार्ष्वभूमीवर, तेहरानबाबत भारत अमेरिकेच्या भूमिकेनुसार चालणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. तेहरानमधील भारताचे राजदूत गद्दाम धर्मेंद्र यांनी तेहरान टाईम्स या इंग्लिश दैनिकाच्या वरिष्ठ पत्रकारांशी साधलेल्या संवादात हे विधान केले आहे.

१५ जुलै रोजी घेण्यात आलेल्या या बैठकीची व्हिडिओ चित्रफित समोर आली असून त्यात धर्मेद्र यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भारत हा एकमेव देश असा आहे की जो आंतरराष्ट्रीय निर्बंध असतानाही स्थानिक इराणी चलनात सुलभ व्यापार करत आहे. सध्याच्या घडीला, भारत बहुतेक चहा, तांदूळ अशा कृषि क्षेत्रातील वस्तु आणि काही कार्सचे सुटे भाग यांची इराणला निर्यात करत आहे. परंतु अमेरिकन दबावामुळे त्याची तेल आयात जवळपास शून्यावर आली आहे.

इराणचे सेंट्रल बँक ऑफ इराण आणि युको बँकेसह भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच इराणच्या इतर ६ बँका वस्तुंच्या विनिमयासाठी स्थानिक चलनात व्यापार करण्याची सुविधा प्राप्त करून देत आहेत. तसेच भारताने अमेरिकेला चाबहारमध्ये आम्ही काय करावे ते अमेरिकेने सांगू नये असे ठणकावले आहे, हे महत्वाचे आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. दबावासंदर्भात, वस्तुस्थिती ही आहे की, जेथे आम्ही देशांशी द्विपक्षीय व्यापार करतो, त्यात आम्ही एकमेव देश असा आहोत की रूपया-रियाल व्यापारी व्यवस्था सुरू ठेवली आहे. चाबहारमध्ये आम्ही काम करत आहोत,चाबहारसाठी आम्ही यंत्रसामुग्रीची खरेदी करत आहोत, तेथे आम्ही चाबहारची तयारी करत आहोत. आम्ही अमेरिकेला स्पष्ट सांगितले आहे की चाबहारमध्ये आम्ही काय करावे, हे ते सांगू शकत नाहीत, असे राजदूत म्हणाले.

हा व्हिडिओ प्रथम तेहरान टाईम्सने ट्विट केला असून त्यानंतर काढून टाकण्यात आला. त्याच व्हिडिओत गद्दाम यांनी डिसेंबर २०१८ मध्ये दोन्ही देशांत स्वाक्षऱ्या झालेल्या वार्षिक आधारावर किंवा अंतरिम करारानुसार, चाबहारमध्ये जहाजांच्या वाहतुकीत महत्वपूर्ण वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ आणि २०१९ मध्ये अंतरिम करारानुसार, एका वर्षात आम्ही ६,००० टन कंटेनर्स भरून मालाची वाहतूक केली असून दहा लाखांहून अधिक माल, तांदूळ, साखर, गहू यांची इराण आणि अफगाणिस्तान दोघांसाठीही वाहतूक केली आहे. एका वर्षाच्या आत वाहतूक मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे,असेही राजदूत म्हणाले. तेहरान बिजिंगसोबत २५ वर्षाचा सर्वसमावेशक सहकार्य करार करण्याच्या जवळ पोहचला असतानाच इंग्लिश दैनिकात भारतीय राजदूताची ही मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. इराणी परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी हा करार पारदर्षक असल्याचे म्हटले आहे.

राजदूत धर्मेंद्र यांनी असेही सांगितले की चाबहार बंदरासाठी यंत्रसामुग्री आणण्याची मागणी इटाली, फिनलंड, जर्मनी आणि चिन या देशांकडे नोंदवण्यात आल्या आहेत जे मुख्य पुरवठादार असून यावर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत त्यांच्याकडून या यंत्रसामुग्रीचे वितरण केले जाईल, अशी अपेक्षा आहे. भारताने गुरूवारी सामान्य वित्तीय नियमांमध्ये (२०१७) अशी सुधारणा केली आहे की भारताशी ज्या देशांच्या सीमा लागून आहेत, अशा देशांना कंत्राट दिले जात असेल तर त्यांच्यावर भारताचे संरक्षण किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याने निर्बंध घातले जावेत. चिनकडून केल्या जाणाऱ्या सार्वजनिक अधिग्रहणावर मर्यादा आणण्यासाठी किंवा त्याची अधिक सखोल छाननी होण्याच्या दृष्टिने ही खेळी आहे, हे सहज समजण्यासारखे आहे.

यापूर्वी २० जुलै रोजी, इराणियन कनिष्ठ मंत्र्याशी झालेल्या राजदूतांच्या बैठकीनंतर, भारतीय दूतावासाने इराणने अलिकडच्या वादग्रस्त बातम्यांबाबत हितसंबंधी मंडळींना दोष दिला असल्याचे सांगितले होते. राजदूत गद्दाम धर्मेंद्र यांना आज इराणचे रस्ते उपमंत्री तसेच इराण रेल्वेचे प्रमुख सईद रसौली यांच्याकडून पाचारण करण्यात आले होते. चाबहार झीहेदान रेल्वेमार्गाच्या कामाबाबत सहकार्याचा आढावा घेण्यासाठी त्यांना बोलवले होते. रसौली यांनी हितसंबंधी लोक इराणने चाबहार-झीहेदान रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळले असल्याच्या बातम्यांना जबाबदार असल्याचे म्हटले असून भारतीय दूतावासाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

भारताने चाबहार बंदर विकास प्रकल्प हा आग्नेय आशियातील मध्य आशियासाठी डावपेचात्मक दृष्ट्या उघडणारा मार्ग आहे आणि अफगाणिस्तानला मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पुरवण्यासाठी संक्रमण मार्ग आहे कारण अफगाणिस्तानचा भारताशी जमिनी व्यापार चालतो आणि पाकिस्तानने मार्ग रोखला आहे. भारतावर पहिल्या टप्प्यात चाबहारमधील शाहिद बेहेस्ती बंदर विकसित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मूलतः चाबहार हे नवीन बंदर म्हणून काम करत आहे. ते अजूनही विकासाच्या टप्प्यात आहे आणि आम्हाला आशा आहे की जसे आम्ही पुढे सरकत जाऊ तशी वाहतूक वाढेल. मालवाहतूक अझरबैजान मार्गे अफगाणिस्तान, मध्य आशिया अशी जाईल.

सध्याच्या घडीला इराणसाठी मुख्य बंदर बंदर अब्बास हे आहे. इराणची ९० टक्के बंदर वाहतुकीची हाताळणी बंदर अब्बासमधून होते. एका वर्षात आम्हाला चाबहारमधून ३ टक्के मिळाले आहेत. चाबहारमध्ये आम्हाला सुधारणा करावी लागेल. त्यासाठी वेळ लागणार आहे, असे भारतीय राजदूतांनी तेहरान टाईम्सच्या वरिष्ठ पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले.

- स्मिता शर्मा (वरिष्ठ पत्रकार, नवी दिल्ली)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.