ETV Bharat / opinion

कोविड १९मूळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये शवविच्छेदनादरम्यान शस्त्रक्रिया होणार नाही : आयसीएमआर - कोरोना मृतदेह शवविच्छेदन

कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास या मृत्यूचा समावेश वैद्यकीय न्यायक प्रकरणांमध्ये केला जाणार नसल्याने या प्रकरणांमध्ये फॉरेन्सिक अहवालासाठी शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येणार नसल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. 'वैद्यकीय -न्यायक शवविच्छेदन मार्गदर्शक तत्त्वे' या 32-पृष्ठांच्या दस्तऐवजात आयसीएमआरने हे स्पष्टीकरण दिले आहे.

No invasive techniques in autopsy of COVID-19 deaths: ICMR
कोविड १९मूळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये शवविच्छेदनादरम्यान शस्त्रक्रिया होणार नाही : आयसीएमआर
author img

By

Published : May 13, 2020, 5:33 PM IST

नवी दिल्ली: कोविड १९मृत्यू प्रकरणात फॉरेन्सिक शवविच्छेदन प्रक्रिया पार पडताना कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येणार नसल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडताना मृत शरीरातून बाहेर पडणारे द्रव आणि स्त्राव यामुळे डॉक्टर तसेच शवगृहातील कर्मचारी यांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याचे आयसीएमआरने जारी केलेल्या मसुद्याच्या दस्तऐवजात म्हटले आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) जारी केलेल्या 'कोविड १९ वैद्यकीय -न्यायक शवविच्छेदन मार्गदर्शक तत्त्वे'च्या अंतिम मसुद्यानुसार, कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास या मृत्यूचा समावेश वैद्यकीय न्यायक प्रकरणांमध्ये केला जाणार नसल्याने शवविच्छेदन करताना कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. तसेच उपचारादरम्यान डॉक्टरांकडून रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे देखील म्हटले आहे.

कोविड १९च्या संशयास्पद मृत्यूच्या काही घटनांमध्ये डॉक्टरांकडून या प्रकरणांना वैद्यकीय न्यायक प्रकरणांअंतर्गतील मृत्यू संबोधून मृतदेह शवगृहात पाठविले जातात. तसेच मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पोलिसांना माहिती देऊन पोस्टमॉर्टम तपासणीची मागणी केली जात आहे.

“अशा प्रकरणांची फॉरेन्सिक शवविच्छेदन प्रक्रिया रद्द केली जाऊ शकते,” असे मसुद्यात म्हटले आहे.

आत्महत्या, हत्या किंवा अपघात सारख्या प्रकरणांमध्ये आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पॅझिटिव्ह किंवा संशयास्पद घटना आढळू शकतात. मात्र सखोल चौकशीअंतीदेखील कुठल्याही गुन्ह्याचा संशय येत नसल्यास, अशा प्रकरणांना वैद्यकीय -न्यायक असे संबोधले गेले असले तरी पोलिसांना वैद्यकीय-न्यायक शवविच्छेदन प्रक्रिया थांबविण्याचे अधिकार आहेत.

“कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीत तपास अधिका्याने अनावश्यक शवविच्छेदन प्रक्रिया टाळण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे,” असे मसुद्यात म्हटले आहे.

फॉरेन्सिक शवविच्छेदन करण्याच्या प्रक्रियेनुसार, "हाडे आणि ऊतींचे (टिश्यू) विच्छेदन करताना तयार होणाऱ्या एरोसोलमुळे कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होऊ शकतो. या आधारे तसेच बाह्य तपासणीसह डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शवाची छायाचित्रे घेऊन तोंडी शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली पाहिजे. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया न करता शवविच्छेदन पार पाडले जावावे. जेणेकरून शवविच्छेदन करताना मृत शरीराची हाताळणी करणारे कर्मचारी, डॉक्टर यांना शरीरातून उडणाऱ्या द्रवाचा संपर्क होणार नाही.

आयसीएमआरच्या मसुद्यानुसार, जर कोविड १९चा चाचणी अहवाल अपेक्षित असेल तर अंतिम अहवाल येईपर्यंत मृतदेहास शवगृहातून हलवण्यात येऊ नये तसेच औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शव जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे.

"कोणत्याही परिस्थितीत दोनपेक्षा जास्त नातेवाईकांना मृताशेजारी हजर राहू दिले जाऊ नये. तसेच त्यांना मृतदेहापासून कमीतकमी एक मीटर अंतर राखणे गरजेचे आहे."

मृतांची ओळख पटविण्यासाठी प्लॅस्टिक बॅगचाच वापर करावा. तसेच शवावरील प्लॅस्टिक बॅग काढू नये. तसेच ही सर्व प्रक्रिया कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या समक्ष करावी असे देखील अहवालात म्हटले आहे.

"मृतदेहाला स्मशानभूमीत घेऊन जात असताना मृत व्यक्तीच्या पाचपेक्षा जास्त नातेवाईकांना परवानगी नसावी. तसेच ही सर्व प्रक्रिया कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. स्मशानभूमी किंवा दफनभूमी येथे मोठ्या संख्येने होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे जेणेकरून सामाजिक अंतराचे पालन होईल. या प्रक्रियेत सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे कारण मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना विषाणूचा संपर्क झालेला असू शकतो ज्यामुळे त्याचा फैलाव होऊ शकतो.

हे मार्गदर्शक तत्वे बनविताना कोविड १९चा संसर्ग होण्याच्या ज्या शक्यता समोर आल्या आहेत त्या आधारे तसेच शवविच्छेदन पद्धतीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक तत्वे यांचा आधार घेतला आहे. त्याचबरोबर भारतातील शवागृहांच्या सुविधा आणि लॉजिस्टिकची समर्थता लक्षात घेऊन ही तत्वे बनविण्यात आली असल्याचे या मसुद्यात म्हटले आहे.

  • शवगृहात मृतदेह हलविताना जर मृतदेहाशी थेट संपर्क येत असल्याने तर कर्मचाऱ्यांनी पीपीई किटचा वापर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
  • या दरम्यान मृतदेहातून कोणत्याही प्रकारचा द्रव शरीराला चिकटू नये म्हणून गळती विरहित दुहेरी आवरण असलेल्या प्लॅस्टिक बॅगेत मृतदेह ठेवण्यात यावा.
  • शवगृहांची कोविड १९ आणि कोविड १९ विरहित अशा दोन विभागांमध्ये वर्गवारी करावी.
  • मृतदेहाचे दफन करण्यात येणार असल्यास दफन करण्यात आलेला वरचा पृष्ठभागावर सिमेंटने बंदिस्त करावा.
  • ज्या ठिकाणी मृतदेह जाळण्यात येणार आहे तिथे शक्यतो इलेक्ट्रिक स्मशानभूमीचा वापर करावा जेणेकरून अंत्यसंस्कार करताना शरीराची हालचाल आणि हाताळणी कमी होईल, असे देखील मसुद्यात नमूद करण्यात आले आहे.

अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाला अंघोळ घालणे, मिठी मारणे किंवा चुंबन घेणे यांसारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत असे या मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र राखेला कोणताही धोका नसल्याने अंतिम संस्कार करण्यासाठी राख गोळा केली जाऊ शकतो असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : गर्भवती पत्नी अन् मुलीसह 'त्याने' केले ८०० किमी अंतर पार!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.