ETV Bharat / opinion

कोविड-१९ : जपानी थीम पार्कचा अजब सल्ला; मोठ्याने नाही, मनातल्या मनात किंचाळा

लॉकडाऊनच्या उपाययोजना सुलभ करून आर्थिक हालचाली पुन्हा सुरू करण्याचा जग प्रयत्न करत असतानाच, नव्या जगामध्ये गोष्टी पुन्हा कधीच पहिल्यासारख्या होणार नाहीत, हे निश्चित आहे. एक नमुना म्हणून जपानमधील थीम पार्कचे उदाहरण देता येईल, या पार्कमध्ये येणारे नागरिक आणि कर्मचारी या दोघांच्याही सुरक्षेची खात्री करण्यासाठी एक विनंती पर्यटकांना केली आहे, ती म्हणजे रोलर कोस्टरमधून सफर करताना अजिबात किंचाळायचे नाही...

New normal: scream inside your heart
कोविड-१९ : जपानी थीम पार्कचा अजब सल्ला; मोठ्याने नाही, मनातल्या मनात किंचाळा..
author img

By

Published : Aug 4, 2020, 3:42 PM IST

हैदराबाद : लॉकडाऊनच्या उपाययोजना सुलभ करून आर्थिक हालचाली पुन्हा सुरू करण्याचा जग प्रयत्न करत असतानाच, नव्या जगामध्ये गोष्टी पुन्हा कधीच पहिल्यासारख्या होणार नाहीत, हे निश्चित आहे. एकीकडे जगाच्या विविध भागांमध्ये असलेल्या प्रशासनांना परिवहन, शाळा, व्यवसाय आणि मनोरंजन अशा सुरक्षित उपक्रमांसाठी सुयोग्य पर्यावरणाची खात्री द्यावी लागेल. तर दुसरीकडे, सामान्य लोकांना अधिकार्यांच्या सूचनांचे पालन करावे करून समजून घेऊन प्रतिसाद देण्याची गरज आहे. एक नमुना म्हणून जपानमधील थीम पार्कचे उदाहरण देता येईल, ज्या जुलैमध्ये पुन्हा उघडण्यात आल्या. हे पार्क कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीतच बंद केले होते.

या पार्कमध्ये येणारे नागरिक आणि कर्मचारी या दोघांच्याही सुरक्षेची खात्री कशी करायची, याबाबत थीम पार्क चालवणार्यांनी मार्गदर्शक तत्वे लागू केली. सामाजिक अंतरासाठी नैसर्गिक उपाय आणि सॅनिटायझरच्या वापरामध्ये वाढ, शरीराचे तापमान नियमित तपासणे आणि मास्कचा वापर यांचा समावेश त्यात होता. ईस्ट अँड वेस्ट जपान थीम पार्क असोसिएशन्सने, ज्यात जपानमधील ३० हून अधिक प्रमुख मनोरंजन पार्क्सचा समावेश आहे, त्यात असे म्हटले आहे की ग्राहक सेवेची नवीन शैली म्हणून, जेव्हा तुम्ही मास्क लावलेला असेल, तेव्हा तुम्ही पाहुण्यांशी संवाद साधण्यासाठी डोळे मिचकावणे, हाताचे हावभाव यांचे मिश्रण वापरू शकता. संवाद शक्य तितका अल्पवेळ ठेवण्याची तडजोडही ग्राहकसेवा विभागाला करता येईल. अशा तर्हेने, नवीन परिस्थिती ही निश्चितच विशेष करून हावभावांबद्दल आहे आणि शाब्दिक उच्चारांना फार थोडे महत्व आहे. अगदी गाणे म्हणणे या कृतीलाही एकाच व्यक्तिने मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवण्याची केलेली कृती म्हणून पाहिली जाऊ शकते.

जपानी थीम पार्कमध्ये आणखी एक विनंती पर्यटकांना केली आहे जिचे पालन करताना त्यांना फार अवघड जाऊ शकते. ती म्हणजे जपानी थीम पार्क्समध्ये मास्क घालण्याबरोबरच रोलर कोस्टरमधून सफर करताना अजिबात किंचाळायचे नाही. ही कल्पना निश्चितच कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी आहे कारण १२० किलोमीटर ताशी वेगाने जेव्हा ही सफर केली जाते तेव्हा किंकाळी मारली तर तुषार तोंडातून दूरवर उडतातच. रोलर कोस्टरची सफर करायची आणि आरोळी ठोकायची नाही, हे काहीसे विचित्र वाटते कारण या दोन गोष्टी एकमेकांशी खूप घनिष्टपणे जोडल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर जगाच्या काही भागांतील प्रसिद्ध रोलर कोस्टरचे नावच या संबंधांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, स्काय स्क्रीम हा जर्मनीतील ह्राईनलँड पॅलेशिनेटमधील हॅसलोकमधील हॉलिडे पार्कमध्ये पोलादी रोलर कोस्टर आहे. स्क्रीम हा आणखी एक पोलादी रोलर कोस्टर अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील व्हलेंशियमधील सिक्स फ्लॅग्ज मॅजिक माऊंटन येथे आहे. किंचाळायचे नाही, या नियमाचे पालन करणे कधीच सोपे नाही कारण शेकडो फूट वर जाऊन रोलर कोस्टर खाली येत असते. जपानमधील फुजी-क्यू हायलँड थीम पार्कने तर एक व्हिडिओही टाकला होता ज्यात पार्कचे दोन अधिकारी पार्कच्या फुजियामा रोलर कोस्टरवरून अतिशय वेगाने फेकले गेले परंतु ते एकदाही किंचाळले नाहीत. कृपया तुमच्या मनातल्या मनात किंचाळा, अशा संदेशाने या व्हिडिओचा शेवट होतो. रोलर कोस्टरवर सफर करताना गंभीर चेहरा करून बसण्याच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सोशल मीडिया ट्रेंडही उदयाला आला होता.

निश्चितच, माझ्या माहितीप्रमाणे, जगातील इतर थीम पार्क्सनी अजून असा नियम लादलेला नाही. उदाहरणार्थ, ओरलँडोच्या डिस्ने वर्ल्ड पार्क जुलैमध्ये पुन्हा उघडला, परंतु तेथे किंचाळण्यावर बंदी जाहीर करण्यात आलेली नाही. मौजमजा आणि मनोरंजनाच्या ठिकाणी अशा निर्बंधांची अंमलबजावणी कधीच सोपी जाणार नाही, कारण किंचाळू नका या तत्वाचे पालन केले नाही म्हणून लोकांना कडक शिक्षा किंवा दंड आकारला तर लोक अशा ठिकाणांकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, जपानी थीम पार्कमध्ये किंचाळण्यावर बंदी तत्वाचे उल्लंघन केल्यास शिक्षा ठेवलेली नाही, तरीही लोक नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्षात, हा सर्व शिस्त आणि संस्कृतीचा भाग आहे. सामाजिक सौजन्याने जपान झपाटलेला आहे, हे यावरून स्पष्ट होते की आपल्या दैनंदिन आधुनिक जीवनात खोकला आणि सर्दी झालेल्यांनी आपले जंतु दुसर्यांकडे संक्रमित करण्याचे टाळण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. देशातील लोक केवळ त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी नव्हे तर इतरांना वाचवण्यासाठी दशकांपासून चेहर्यावरील मास्क वापरत आहेत. संक्रमणाच्या या काळात सामाजिक सौजन्याने झपाटलेपणा विस्तारित केला जाण्याची शक्यता आहे आणि घातक रोलर कोस्टर सफारीच्या दरम्यान किंचाळायचे नाही, या नियमाचे अत्यंत यशस्वीपणे देशातील लोक पालन करतील. पूर्व आशियाच्या काही भागांसह काही इतर ठिकाणीही हे नियम य़शस्वी होऊ शकतात. जगाच्या बहुतेक भागांमध्ये या चित्राची पुनरावृती केली जाणे अवघड आहे. प्रख्यात ऑस्ट्रियन न्यूरॉलॉजिस्ट आणि मानसोपचार तज्ञ व्हिक्टर एमिल फ्रँकल यांनी म्हटले आहे की उत्तेजना आणि प्रतिसद यात एक अवकाश आहे. हा अवकाश आमच्या प्रतिसादाची निवड करण्याची शक्ति आहे. आमच्या प्रतिसादात आमचा विकास आणि आमचे स्वातंत्र्य आहे. निश्चितच. त्या अवकाशाच्या परिक्षेचाही हा काळ आहे. स्वातंत्र्याच्या दिशेने या अवकाशाचा वापर करण्यावर ज्या देशांनी नैपुण्य मिळवले आहे, तो देश महामारीच्या काळात अधिक यशस्वी होईल.

एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे. नव्या निकषाच्या सामान्य परिस्थिती खूप वेगळी असणार आहे. सध्या तरी आपणा सर्वांवरच मनातल्या मनात किंचाळायची वेळ आहे.

- अतनु बिस्वास (सांख्यिकी प्राध्यापक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.