ETV Bharat / opinion

कुष्ठरोगावरील लस कोरोनावर ठरतीय प्रभावी; आयआयसीटीच्या संचालकांनी व्यक्त केला विश्वास.. - कोरोना लस

केवळ विषाणूविरूद्ध प्रभावी लस किंवा औषध तयार करण्याव्यतिरिक्त, विषाणूचा शरीरात होणारा प्रवेशच रोखू शकणारी लस तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) प्रयोगशाळा यावर संशोधन करीत आहे, अशी माहिती आयआयसीटीने दिली.

Leprosy Vaccine is Working in COVID treatment claims, Director of chemical technology institute
कुष्ठरोगावरील लस कोरोनावर ठरतीय प्रभावी; आयआयसीटीच्या संचालकांनी व्यक्त केला विश्वास..
author img

By

Published : May 14, 2020, 1:57 PM IST

हैदराबाद - येथील सीएसआयआरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) चे संचालक डॉ. एस. चंद्रशेखर म्हणाले, “आम्ही कोवीड -१९ वर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध धोरणांसह पुढे जात आहोत. त्याचाच एक भाग म्हणुन आम्ही केवळ विषाणूविरूद्ध प्रभावी लस किंवा औषध तयार करण्याव्यतिरिक्त, विषाणूचा शरीरात होणारा प्रवेशच रोखू शकणारी लस तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) प्रयोगशाळा यावर संशोधन करीत आहे, अशी माहिती आयआयसीटीने दिली. ‘कोवीड-१९ चाचण्या, सद्य आव्हाने आणि योग्य औषधाची प्रगती’ या विषयावर राज्यसभा टीव्हीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

रिवर्स इंजिनिअरिंग...

कोवीड -१९ च्या सध्या जगभर पसरलेल्या साथीच्या महाभयंकर प्रादुर्भावाला कारणीभूत असणारा कोरोना विषाणू गेल्या ४ महिन्यांपासून जगभर विनाशकारी प्रलय आणत आहे. इतक्या कमी कालावधीत या प्राणघातक विषाणूचा प्रतिकार करणारे औषधे किंवा लस निर्माण करणे अवघड आहे. तथापि, आयआयसीटीने रिव्हर्स गीअर अभियांत्रिकी पद्धतीद्वारे जागतिक स्तरावर काम करण्यासाठी काही औषधांची निर्मिती करण्याचे धोरण अवलंबले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एखादे औषध तयार केले गेले आणि त्याचे पेटंटही झाले असले तरीही आयआयसीटी हे औषध एका वेगळ्या प्रकारे तयार करते. जे मुळात तयार केलेल्या प्रक्रियेपेक्षा सोपे असते. अशाप्रकारे जगभरात कमी किंमतीत औषध उपलब्ध केले जातात. यालाच आपण जेनेरिक औषधे म्हणतो ज्याचे रिव्हर्स गियर इंजिनीअरिंगद्वारेच उत्पादन घेतले जाते. जगात जिथे कुठेही या औषधाचा किंवा लसचा शोध लावला जाईल. त्यानंतर लवकरात लवकर ते औषध भारतात तयार केले जावे. कारण आपल्याकडे देशातील विविध भागात एफडीएने मंजूर केलेले अनेक उत्पादन प्रकल्प आहेत.

आतापर्यंतचा एपीआयचा प्रवास...

सीएसआयआरची प्रयोगशाळा गुजरातमधील कंपनीशी समन्वय साधत कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी कुष्ठरोगाच्या विषाणूवरही उपचार करण्यासाठी तयार केलेली एमडब्ल्युची लस सध्या कोरोना विषाणूवर उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. डॉ. चंद्रशेखर म्हणाले, “आम्ही सध्या चार रुग्णालयांमध्ये यावर चाचण्या घेत आहोत. आम्ही सध्या कार्यरत असलेल्या इतर औषधांच्या संदर्भात अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडींट्स (एपीआय) तंत्रज्ञान देखील विकसित केले आहे. एपीआय हे मूळ औषध आहे जे रोगाचा उपचार करू शकते.

पण आपण हे औषध जशास तसे घेऊ शकत नाही. त्यामध्ये चव आणि रंगासाठी इतर रसायने मिसळली जातात. त्यानंतरच ही औषधे गोळ्या आणि सिरपच्या स्वरूपात तयार केल्या जातात. हे सर्व एपीआयचे तंत्रज्ञान उद्योगात हस्तांतरित झाल्यानंतर केले गेले आहे. आयआयसीटीच्या शास्त्रज्ञांनी रात्रंदिवस प्रयत्न करुन ४ आठवड्यांच्या कालावधीत एपीआय तंत्रज्ञानाद्वारे ‘फेविपिरावीर’ नावाचे औषध विकसित केले आहे. हे औषध ९९.९९ टक्के शुद्धतेसह विकसित केले गेले आहे. चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये औषध निर्मिती करण्यासाठी या ड्रक्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. आम्ही हे तंत्रज्ञान एका स्थानिक औषध कंपनीकडे हस्तांतरित केले आहे, जे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणार आहे. सध्या आम्ही ड्रग कंट्रोलरच्या क्लियरन्स टप्प्यातील मंजुरीची प्रतीक्षा करीत आहोत.”

हेही वाचा : कोरोनासाठी कोणकोणत्या प्रकारच्या लस विकसित केल्या जात आहेत..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.