ETV Bharat / opinion

'एच-१बी व्हिसा'बंदीचा भारतीयांवर काय होणार परिणाम..? - एच-१बी व्हिसा बॅन परिणाम

अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांची बुद्धिमत्ता पाहून नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे एच-1 बी व्हिसा आहे. या वर्षाच्या १ ऑक्टोबरपासून अमेरिकेचे २०२१ हे आर्थिक वर्ष सुरू होईल आणि भारतातल्या बऱ्याच कंपन्यांनी संबंधित एच-1 बी व्हिसा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांना या वर्षाच्या शेवटापर्यंत थांबावे लागेल. त्यानंतरच त्यांच्या प्रवासासंबंधी कागदपत्रांवर शिक्का मारला जाईल आणि ते परदेशात जाऊ शकतील..

H-1B visa ban: Impact on Indian professionals
'एच-१बी व्हिसा'बंदीचा भारतीयांवर काय होणार परिणाम..?
author img

By

Published : Jun 25, 2020, 6:10 PM IST

हैदराबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एच-१बी व्हिसा वर्षभरासाठी रद्द करण्याची घोषणा केली. अमेरिकेतील लोकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हजारो भारतीयांचे नुकसान होणार आहे.

एच-१बी व्हिसा म्हणजे काय?

एच-१बी व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे, ज्याद्वारे अमेरिकेतील कंपन्या बाहेरच्या देशांमधील एखाद्या विषयातील तज्ज्ञांना कामावर ठेवण्याची मुभा मिळते. या प्रकारच्या व्हिसाची सुरुवात १९९०मध्ये करण्यात आली. अमेरिकेतील कंपन्यांमध्ये संशोधन, अभियांत्रिकी आणि कम्प्युटर प्रोग्रामिंगसाठी तंत्रज्ञाची आणि तज्ञ कामगारवर्गाची भासणारी कमतरता पाहता, परदेशातील व्यक्तींना कामावर रुजू करण्याच्या उद्देशाने हे सुरू करण्यात आले होते.

कोणावर होणार परिणाम..?

या व्हिसाचा सर्वाधिक फायदा भारतीयांना होतो आहे. वर्षभरात अमेरिका जेवढे एच-१बी व्हिसा देते, त्यांपैकी ७० टक्के हे भारतीयांना मिळतात.

एकूण एच-१बी व्हिसांपैकी ६५हजार व्हिसा हे परदेशात उच्चशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांना मिळतात, तर बाकी हे अमेरिकेत उच्चशिक्षण घेतलेल्यांना मिळतात.

सध्या अमेरिकेत तीन लाखांहून अधिक भारतीय एच-१बी व्हिसावर काम करत आहेत.

जर या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर त्यांना नवीन नोकरी शोधण्यासाठी फक्त ६० दिवस मिळतात. या काळात त्यांना नोकरी मिळाली नाही, तर मात्र संबंधित कर्मचाऱ्यांचा व्हिसा रद्द होतो.

भारतावर परिणाम..

यापुढे एच-१बी व्हिसा हवा असणाऱ्या लोकांना २०२० संपेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आपल्या व्हिसाचे नूतनीकरण करण्यासाठीही वाट पहावी लागणार आहे.

आयटी कंपन्या सध्या आपल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत पाठवू शकणार नाहीत, याचा निश्चितच महत्त्वाच्या कामांवर परिणाम होणार आहे.

वर्क-फ्रॉम होम पद्धतीमुळे कदाचित काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेऊ शकतात.

अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांची बुद्धिमत्ता पाहून नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे एच-1 बी व्हिसा आहे. या वर्षाच्या १ ऑक्टोबरपासून अमेरिकेचे २०२१ हे आर्थिक वर्ष सुरू होईल आणि भारतातल्या बऱ्याच कंपन्यांनी संबंधित एच-1 बी व्हिसा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांना या वर्षाच्या शेवटापर्यंत थांबावे लागेल. त्यानंतरच त्यांच्या प्रवासासंबंधी कागदपत्रांवर शिक्का मारला जाईल आणि ते परदेशात जाऊ शकतील.

हेही वाचा : 'कोविड-19'चा जागतिक व्हिसावर कसा परिणाम होतोय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.