ETV Bharat / opinion

ग्लोबल वार्मिंग - गंभीर परिस्थितीचे मूळ - प्रतिकूल हवामान स्थिती

कोविड महामारीच्या कारणाने सर्वसाधारण मानवी जीवन ठप्प झाल्याने, जंगले आणि गवताळ प्रदेशात आग लागून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात 4 ते 7 टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2010 च्या तुलनेत 2030 च्या अखेरीस कार्बन उत्सर्जनात 45 टक्क्यांची घसरण अपेक्षित असल्याचे ग्लोबल वार्मिंग अहवालात म्हटले असले तरी हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. सरकारे, प्रसार माध्यमे आणि नागरिक या समस्येची गंभीरता लक्षात घेण्यास तयार नाहीत.

ग्लोबल वार्मिंग
ग्लोबल वार्मिंग
author img

By

Published : Oct 9, 2020, 7:57 PM IST

जगात नैसर्गिक आपत्तींची मालिका नेहमीच सुरू असते. जगाच्या कानाकोपऱ्यात आग, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ किंवा आणखी कुठल्यातरी आपत्तींचा सामना लोकांना करावा लागतो. किनारपट्टीवरील उष्ण लाटांमुळे अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील 12 राज्यात आग पसरत आहे. आगीच्या ज्वाळांनी आकाशात केशरी रंग भरला गेला आहे. आगीच्या ज्वाळांमधून निघणारे धुरांचे लोट आकाशात 10 किलोमीटर उंचीपर्यंत पसरले आहेत. एवढेच नाही तर, अमेरिकेच्या पूर्वेकडील किनारपट्टीच्या राज्यातही हे धुरांचे लोट पोचले असून त्या राज्यातील वायू प्रदूषण वाढले आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण ६९ मिलियन एकरपेक्षा जास्त क्षेत्र आगीत भस्मसात झाले आहे. यापैकी एकट्या कॅलिफोर्नियामध्ये 33 मिलियन एकर जमीन जळून खाक झाली. जगाच्या उत्तर ध्रुवावर अलास्का आणि सायबेरिया पासून दक्षिणेस ऑस्ट्रेलिया, पूर्वेकडील आशिया तर पश्चिमेकडे अमेरिकन पॅसिफिक किनारपट्टीपर्यंत कुठेतरी आगीत जंगले जळून खाक होण्याची मालिका सुरूच असते.

सर्वच देशांना धोका

भारतामध्ये 21.4 टक्के जंगले ही सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे बाधित क्षेत्र म्हणून ओळखली जातात. मागील वर्षी जंगलात लागलेल्या आगीच्या 29,547 घटनांची नोंद आहे. यावर्षी मे महिन्यात उत्तराखंड राज्यातील जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी होती. 1 सप्टेंबरला अफगाणिस्तानात पुरामुळे 190 लोकांचा मृत्यू झाला. तर, सप्टेंबर महिन्यात नेपाळ, चाड, सेनेगल, सुदान, नायजेरिया, केनिया, बुर्किना फासो, घाना, पाकिस्तान, कॅमरून, अल्जेरिया, ट्युनिशिया, व्हिएतनाम आणि युगांडा या देशांमध्ये पुराचे दुष्परिणाम दिसून आले. ऑगस्ट महिन्यात भारतातील 11 राज्यांमधील 868 लोकांचे पुरामध्ये नुकसान झाले तर दुसऱ्या बाजूला देशातील एक पंचमांश भागात दुष्काळ होता. तर एक तृतीयांश अमेरिका उपासमारीचा सामना करत होती. जगभरात एकूण 5 कोटी 30 लाख नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागला. यावरून हे स्पष्ट होते की, पृथ्वीवर असा कोणताही देश नाही जो नैसर्गिक आपत्तीला बळी पडत नाही.

यावर्षी, कोविड महामारीच्या कारणाने सर्वसाधारण मानवी जीवन ठप्प झाल्याने, जंगले आणि गवताळ प्रदेशात आग लागून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात 4 ते 7 टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2010 च्या तुलनेत 2030 च्या अखेरीस कार्बन उत्सर्जनात 45 टक्क्यांची घसरण अपेक्षित असल्याचे ग्लोबल वार्मिंग अहवालात म्हटले असले तरी हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. सरकारे, प्रसार माध्यमे आणि नागरिक या समस्येची गंभीरता लक्षात घेण्यास तयार नाहीत. मागील वर्षी पार पडलेल्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान कोणत्याही पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात या विषयाचा उल्लेख देखील केलेला नाही. जगातील आघाडीच्या सहा वैज्ञानिक संशोधन संस्थांच्या साथीने जागतिक पर्यावरण संघटनेने सप्टेंबर 2020 मध्ये जाहीर केलेल्या अहवालात 2024 पर्यंत ग्लोबल वार्मिंगमध्ये तात्युरत्या स्वरूपात 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढ होईल असे म्हटले आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, लवकरच ही वाढ तात्पुरती न राहता कायमस्वरूपी वाढत जाण्याची शक्यता आहे. मागील महिन्याच्या शेवटी जाहीर करण्यात आलेल्या आणखी एका अहवालानुसार, हवामान संकटामुळे संपूर्ण जग संकुचित होऊन 2050 पर्यंत १120 अब्ज लोक विस्थापित होतील. प्रशांत महासागरामधून जाणाऱ्या विषुववृत्तावर, जेव्हा पृष्ठभागाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा 0.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होते, तेव्हा त्याला ला निना इफेक्ट असे म्हणतात. ला निना इफेक्टमुळे अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावर लागणाऱ्या आगीत वाढ होत आहे.

आत्यंतिक प्रतिकूल हवामान स्थिती

ला निना हा स्पॅनिश शब्द असून छोटी मुलगी असा त्याचा अर्थ आहे. तापमान किमान 0.5 टक्क्यांनी वाढल्याने जी परिस्थिती उद्भवते त्या स्थितीला एल निनो (लहान मुलगा) असे म्हणतात. ला नीनामुळे अमेरिकेच्या दक्षिण आणि पश्चिम पॅसिफिक किनारपट्टीवर कोरडे व उष्ण वारे वाहतात. तर, उत्तर व पश्चिम पॅसिफिक किनारपट्टीवर थंड व ओले वारे वाहतात. तसेच यामुळे पूर्व अटलांटिक किनाऱ्यावर मोठ्या वादळांना अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते. ला निना ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु, आघाडीचे हवामानशास्त्रज्ञ मायकल मान यांच्या मते, येत्या काळात हवामानातील बदल उष्ण लाटा, जंगलांना लागणारी आग आणि मोठ्या वादळांसारख्या आपत्तींना जन्म देतील. वाढत्या ग्लोबल वार्मिंगचा तापमानावर परिणाम होऊन ला निनाची वारंवारता वाढत असल्याने अमेरिकेत लागणारी आग अनियंत्रित वेगाने पसरत आहे. 1970 च्या तुलनेत कॅलिफोर्नियातील जंगलांना लागणाऱ्या आगीचा विचार करता आगीत जळून खाक होणाऱ्या वार्षिक क्षेत्रात आता पाच पटींनी वाढ झाली आहे.

उन्हाळ्यात ही वाढ आठपट इतकी प्रचंड आहे. वाढत्या तापमानामुळे झाडे आणि गवतांमधील ओलावा कमी होण्याने आगीच्या प्रमाणात वाढ होत आहे. एकीकडे अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात जंगलातील आग अनियंत्रित वेगाने पसरत आहे तर दुसरीकडे, पूर्वेकडे काहीशे मैलांच्या अंतरावर कोलरॅडो आणि वायोमिंग सारखी शहरे असलेल्या भागात तापमानात तब्बल 33 डिग्री सेल्सियसने घसरून जोरदार पाऊस पडत आहे. संध्याकाळी 7 ला सुरुवात होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे तब्बल 18 तास मुसळधार पाऊस कोसळला. तर, जमिनीच्या पृष्ठभागापासून जवळपास 2 फूट उंच भाग बर्फ़ाने झाकला गेला होता. हे कमी म्हणून की काय, अमेरिकेच्या हवामान खात्याने पूर्व किनारपट्टीवर 25 चक्रीवादळे होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

हे अत्यंत प्रतिकूल हवामान स्थितीचे प्रतीक आहे. अत्यंत वेगाने तापमानात आणि हवामानात होणाऱ्या बदलांमुळे अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थिती हेच एक न्यू नॉर्मल बनत आहे. परिणामी पृथ्वीच्या सरासरी तपमानात 4 अंश सेल्सिअस वाढ होईल अशा वेगाने तापमान स्थिती बदलत गेली आहे. वैज्ञानिकांच्या मते, ही परिस्थिती कायम राहिल्यास जगातील सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 10 टक्केच लोकसंख्येचे अस्तित्व पृथ्वीवर राहील. कल्पना करणे देखील अवघड असलेली परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे. निसर्गाप्रती अत्यंत क्रूरतेने वागलेल्या मानवाला आता ही आपत्ती टाळण्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. यासाठी मानवजातीच्या संयुक्त कृतीची आवश्यकता आहे.

निसर्गाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष ...

गेल्या बारा हजार वर्षांपासून मानवी सभ्यतेच्या उत्क्रांतीत सहकार्य आणि योगदान देणारे हवामान आता मानवजातीच्या अस्तित्वासाठीच इतके धोकादायक का बनले आहे? याचे उत्तर विज्ञानाने स्पष्टपणे सांगितले असून अत्यंत वेगाने हवामानात होणारे बदल ही नैसर्गिक बाब नसून या बदलास मानवी कृतीच कारणीभूत आहे. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढीमुळे ग्लोबल वार्मिंगची परिस्थिती उद्भवेल हे शेकडो वर्षांपूर्वीच अरेनियसच्या संशोधनातून स्पष्ट झाले होते. परंतु संपूर्ण जगाला आर्थिकदृष्ट्या विकसित करण्याच्या कल्पनेने सरकार आणि मानवी संस्थांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले. जेम्स हॅन्सेनने 1988 मध्येच ग्लोबल वार्मिंगचे वर्णन केले असले तरी पहिले आयपीसीसी परिषद 1990 मध्ये पार पडली. ग्लोबल वार्मिंगच्या जोखमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर आणि संयुक्त राष्ट्रांच्या नैतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय परिषदांना सुरुवात होऊन देखील मागील 30 वर्षात हवेमध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 62 टक्क्यांनी वाढले आहे. याचाच अर्थ असा की, धोकादायक परिस्थिती लक्षात आल्यानंतरच कार्बन उत्सर्जणाच्या स्थितीत खऱ्या अर्थाने वाढ झाली आहे. हवेत ग्रीनहाऊस वायूंचे प्रमाण वाढवून आपण पृथ्वीच्या उर्जा पातळीत असंतुलन निर्माण केले आहे. पृष्ठभागावरील तापमानात 1.5 ते 2 डिग्री सेल्सिअस पर्यंतची वाढ मर्यादेत ठेवण्यासाठी एकत्रित कृती करण्यावर डिसेंबर 2015 च्या पॅरिस करारावर सहमती दर्शविणारे देश प्रत्यक्षात मात्र कृती करण्यात अपयशी ठरले आहेत. परिणामी, दरवर्षी उत्सर्जनात सातत्याने वाढ होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.