मुंबई - जागतिक तापमानवाढीचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. सन 1994 ते 2017 या 23 वर्षांच्या काळात जगातील तब्बल 28 लाख कोटी टन बर्फ वितळला असल्याचे एका संशोधक अहवालातून समोर आले आहे. हे संशोधन एका उपग्रहाच्या मदतीने करण्यात आले आहे.
लेड विद्यापिठाच्या संशोधन पथकाने केलेल्या संशोधनानुसार, 1990 साली 0.8 लाख कोटी टन बर्फ वितळत होता 2017 साली बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले असून 1.3 लाख कोटी टन बर्फ एका वर्षात वितळला आहे. तापमान वाढी वितळणाऱ्या बर्फामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे जंगली प्राण्यांचे जीव धोक्यात येणार आहे.
सन 1980 पासून वातावरणाती तापमान 0.26 अंश सेल्सिअस व समुद्राचे तापमान 0.12 अंश सेल्सिअसने वाढत आहे. यामुळे बर्फ वितळण्याचे प्रमाणही वाढत आहे. जगभरात जेवढे बर्फ वितळले आहे. त्यापैकी 68 टक्के हे तापमानामुळे तर 32 टक्के बर्फ समुद्रामुळे वितळल्याचे त्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक तापमान वाढीमुळे आर्कटिक महासागरातील बर्फ व बर्फाचे डोंगर वितळत आहे. तर ग्रीनलॅण्ड व अंटार्क्टिका महासागरातील बर्फ समुद्र व वातावरणात वाढलेल्या तापमानामुळे वितळत आहे.
सर्वाधिक म्हणजेच तब्बल 7.6 लाख कोटी टन बर्फ आर्कटिक महासागरातून तर त्याखालोखाल 6.5 लाख कोटी टन बर्फ अंटार्क्टिका महासागरातून वितळ्याचे संशोधानात समोर आहे आहे.
हेही वाचा - 'सत्य आत्मनिर्भर', राहुल गांधींची महात्मा गांधींना श्रद्धांजली