हैदराबाद - कोविड-१९ महामारीला जबाबदार असलेल्या सार्स-सीओव्ही २, विषाणुने आरोग्यसेवा वितरणात आमूलाग्र बदल करण्यास भाग पाडले आहे. अशा खिन्न परिस्थितीत, विषाणुचा मुकाबला करण्यासाठी, मसॅच्युएट्स जनरल हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या नव्या संशोधनानुसार इलेक्ट्रॉनिक्स सल्लामसलत पद्धती किंवा ई-सल्ला पद्धतीच्या उपयुक्ततेचे महत्व अधोरेखित केले आहे.
वृत्तानुसार, इलेक्ट्रॉनिक सल्लामसलत (ई-कन्सल्ट्स), सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळत आणि वैयक्तिक संरक्षक साधनांच्या मागणीत घट करतानाच, विशेषतः विशेष सल्लागार सेवा शाश्वत राखण्याची परिणामकारक पद्धत ठरू शकते. डॉ. नीलम ए. फडके (एमडी) आणि डॉ. जेसन वॅस्फी (एमडी) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२० पासून १ एप्रिल,२०२०पर्यंत मॅस जनरल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या दैनंदिन सल्लामसलतीसाठीच्या विनंतीचा अभ्यास केला. असे तंत्रज्ञान डॉक्टरांना विषयतज्ञांना विशिष्ट प्रश्न विचारण्याची परवानगी देते, जे नंतर रूग्णाच्या इलेक्ट्रॉनिक आरोग्यविषयक इतिहासाचा आढावा घेऊन शिफारशी सुचवतात आणि यात विषयतज्ञ ते रूग्ण यांच्यात कोणताही थेट संपर्क प्रस्थापित होत नाही, असे या वृत्तात म्हटले आहे.
मास जनरल हॉस्पिटलच्या आरोग्य धोरण आणि प्रशासन विषयातील फेलो रोगप्रतिकारशास्त्रज्ञ डॉ. फडके म्हणाल्या की सर्व वयातील रूग्णांनी संभाव्य ह्रदयविकाराच्या झटक्यासारख्या प्राणघातक रोगांचा अंदाज घेण्यासाठी, बालरोग लसीकरणासह नित्याच्या किंवा जीवरक्षक सेवांसह अत्युच्च प्रतिबंधात्मक आजारांसाठी प्रत्येक गोष्ट लांबणीवर टाकलेली आम्ही अगोदरच पाहिलेले आहे.
या महामारीचा परिणाम येत्या १८ ते २४ महिने आमच्या राष्ट्रावर जाणवणार असल्याचे तज्ञांनी भाकित वर्तवले असतानाच, आमची आरोग्य सेवा वितरण प्रणालीने पुढे सरसावून पर्यायी सेवा वितरण पद्धती शोधून काढल्या पाहिजेत, ज्यामुळे रूग्णांना अत्यंत गरजेची असलेली सेवा मिळून त्यांना आरामदायक वाटेल. ई-कन्सल्ट्स ही मागणी पूर्ण करते कारण रूग्ण आणि तज्ज्ञ यांच्यात थेट संपर्क होत नाही ज्यामुळे रूग्णाला रूग्णालय किंवा दवाखान्यात यावे लागेल, असे डॉ. फडके म्हणाल्या.
या ई सल्लामसलत मंचाचा उपयोग करून, रूग्ण सल्यासाठी भेटीची वेळ ठरवून घेऊ शकतील आणि आघाडीच्या तज्ज्ञांकडून खासगी संदेश किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स सेवेच्या माध्यमातून वर्षाच्या कोणत्याही वेळेला सल्ला घेऊ शकतात. ई सल्ला हा संपूर्ण कूटबद्ध असून जीडीआरआरच्या निकषांचे पालन करणारा असतो. मुख्य प्रवाहातील चॅट मंचांच्या अगदी उलट, रूग्णांना त्यांचा डेटा घोटाळेबाज आणि सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहिल, याची हमी डॉक्टर्स देऊ शकतात, असे वृत्तात पुढे म्हटले आहे.
टेलिमेडिसिन आणि ई-सल्ला यांचा उपयोग मास जनरल हॉस्पिटलमध्ये २०१४ पासून लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी करण्यात येत असून रूग्णांच्या तज्ञांकडे अनावश्यक भेटी कमी केल्या जातात तसेच ज्या रूग्णांना तज्ञांच्या भेटीची गरज आहे त्यांच्या प्रतिक्षाकालात घट होते, याचा उल्लेख करणे येथे समर्पक ठरेल. जेव्हा अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्रे आर्थिक दृष्ट्या संघर्ष करत असताना, अगोदरच अस्तित्वात असलेल्या इलेक्ट्रॉनिक आरोग्य विषयक रेकॉर्ड प्रणालीचा उपयोग करून ई सल्ला पद्धती आरोग्यसेवा प्रणालीच्या खर्चावर अगदी किमान भार टाकते, असे डॉ.फडके पुढे म्हणाल्या,
डॉ. फडके यांनी असेही नमूद केले, की ई-सल्ला तीव्र स्थिती असलेल्या अवस्थेतील रूग्णाच्या प्रत्यक्ष भेटीची (ह्रदयविकार) किंवा ज्यांना प्रक्रियेची गरज आहे(लसीकरण), त्यांची जागा घेऊ शकत नाही, तरीही अनेक रूग्णांना, एरवी जी सेवा घेण्याचे त्यांनी टाळले असती किंवा दुर्लक्ष केले असते, त्या सेवा प्राप्त करण्याची मुभा देतात.
महामारीच्या दरम्यान ई-सल्ला पद्धतीच्या वापराने इतर स्थितींमध्ये विकसित केलेल्या साधनांचा उपयोग आणिबाणीच्या काळात कसा केला जाऊ शकतो, हे दर्शवते. २०१४मध्ये, ई-सल्ला पद्धती खर्च कमी करण्यासाठी आणि मूल्यवर्धनासाठी तयार करण्यात आली होती. टाळता येण्याजोग्या आरोग्याच्या खर्चात कपात करण्यासाठी आरोग्य सेवा पुरवठादारांना पुरस्कार देणाऱ्या जबाबदार आरोग्य सेवा संघटनांना प्रतिसाद म्हणून आम्ही ती साधने विकसित केली होती, असे मास जनरल हॉस्पिटलच्या कोरिगन माईनहन हृदयविकार केंद्राच्या दर्जा आणि विश्लेषण संचालक तसेच मास जनरल फिजिशियन्स संघटनेचे वैद्यकीय संचालक डॉ. वॅस्फी यांनी सांगितले.
आता आम्ही हे पाहत आहोत की वेगळ्या उद्देष्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सहाय्य सार्वजनिक आरोग्याच्या संकटात प्रतिसाद देण्यासाठी होत आहे. येत्या महिन्यांत ई सल्ला पद्धतीचा अवलंब करणे महत्वाचे ठरेल. काही आठवड्यातच सल्ल्यासाठी येणाऱ्या विनंत्यांमध्ये महत्वपूर्ण वाढ झाल्याने, दीर्घ अभ्यासातून अधिकच मोठा परिणाम झालेला दिसेल, असे डॉ. वॅस्फी यांनी पुढे सांगितले. जनरल इंटर्नल मेडिसिनमध्ये नीलम ए. फडके आणि जेसन वॅस्फी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत, हे उल्लेखनीय आहे.
११ मार्चपूर्वी ज्या दिवशी मसॅच्युएट्सच्या महापौरांनी कोविड-१९ शी संबंधित आणीबाणी जाहिर केली, आणि त्यानंतर प्रत्यक्षात रूग्णांनी येऊन घेतलेला सल्ला आणि ई सल्ला यांच्यात तुलनात्मक अभ्यास केला. ११ मार्चनंतर दोन्ही प्रकारच्या सल्लामसलतीसाठीच्या विचारणांमध्ये कपात झाली, परंतु प्रत्यक्षात येऊन सल्ला मागणाऱ्यांच्या संख्येत ई-सल्ला मागणाऱ्यांपेक्षा जास्त घट झाली. परिणामी, ११ मार्चपूर्वी ई-सल्ला मागणाऱ्यांची संख्या ८.५ टक्क्यांनी वाढली होती ती ११ मार्चनंतर १९.६ टक्क्यापर्यंत वाढली. त्यामुळे, ई-सल्ला मागणाऱ्यांच्या प्रमाणात दुपटीपेक्षाही जास्त वाढ झाली.
या व्यतिरिक्त, या प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवण्यामुळे रूग्णांना शारीरिक अंतर राखण्याचे निकष बाजूस सारण्याची आवश्यकता राहत नाही, किंवा आरोग्य सेवा प्रणालीला अतिरिक्त वैयक्तिक संरक्षक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचीही गरज राहत नाही.