ETV Bharat / opinion

कोरोना संकटकाळातला सायबर दहशतवाद

author img

By

Published : May 27, 2020, 4:57 PM IST

जगभर सुरू असलेल्या कोविड-१९च्या संकटाचा फायदा घेण्यासाठी सायबर हल्लेखोर सध्या ‘सर्बेरस ट्रोजन’ (Cerberus Trojan) नावाचे मालवेयर वापरत आहेत. कोरोना विषाणूबाबतची महत्त्वपूर्ण अद्ययावत आकडेवारी अथवा माहिती देत असताना, त्यासोबतच सायबर गुन्हेगार अनेक वापरकर्त्यांना संशयास्पद लिंक्स पाठवत आहेत...

Cyberterrorism amid COVID-19
कोरोना संकटकाळातला सायबर दहशतवाद..

हैदराबाद - सायबर गुन्हेगार नेहमीच समाजातील कमकुवत दुव्यांच्या शोधात असतात. सध्या सायबर हल्लेखोरांनी आपला मोर्चा कोरोनाच्या भितीने ग्रस्त असलेल्या लोकांकडे वळवला आहे. अवघ्या एका महिन्यातच जगभरात कोरोनाशी संबंधित ४ लाख सायबर हल्ल्यांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या सायबर हल्लेखोर डब्ल्यूएचओ आणि यूएनचे प्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख सांगत आहेत. गेल्या दोन महिन्यांत कोरोना विषाणू संबंधित माहिती पुरवण्याच्या नावाखाली ४ हजार नव्या फसव्या वेबसाइट्स (संकेतस्थळ) तयार झाल्या आहेत.

जगभर सुरू असलेल्या कोविड-१९च्या संकटाचा फायदा घेण्यासाठी सायबर हल्लेखोर सध्या ‘सर्बेरस ट्रोजन’ (Cerberus Trojan) नावाचे मालवेयर वापरत आहेत. कोरोना विषाणूबाबतची महत्त्वपूर्ण अद्ययावत आकडेवारी अथवा माहिती देत असताना, त्यासोबतच सायबर गुन्हेगार अनेक वापरकर्त्यांना संशयास्पद लिंक्स पाठवत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने चुकून अशा लिंक्सवर क्लिक केले, तर त्यांच्या बँकेचा तपशील, बँकिंग पासवर्ड, पत्ता अशा संवेदनशील माहितीची चोरी होते.

इंटरपोलच्या इशाऱ्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) पोलीस विभाग आणि केंद्रीय गुप्तहेर यंत्रणेला सतर्क केले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी अशाप्रकारचे फिशिंग घोटाळे सामान्य होते. पण कोविड-१९च्या उद्भवानंतर सायबर घोटाळ्यांचे प्रमाण तब्बल दहापट वाढले आहे. हल्लेखोर त्यांची भाषा, राष्ट्रीयत्व, व्यवसायिक आवडीनुसार प्रत्येक गटाला व्यावहारिकदृष्ट्या लक्ष्य करीत आहेत.

सामान्य लोक मास्ककडे एक गरज म्हणून पाहत आहेत, पण या वस्तुस्थितीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. जगभरात डिजिटल व्यवहारात जसी वाढ झाली आहे त्याचप्रमाणे सायबर दहशतवादही आपली मुळं मजबूत करत आहे. अलिकडच्या काळात इंटरनेटवरील प्रत्येक स्रोतावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. अलीकडेच एका हैदराबादी व्यक्तीने एका वेबसाइटवर आढळलेल्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधला होता. प्राप्तकर्त्याने संपर्ककर्त्या व्यक्तीच्या मोबाइलमध्ये न कळतपणे एक द्वेषपूर्ण अ‌ॅप इन्स्टॉल केले. आणि त्या ॲपच्या सहाय्याने त्या संबंधित व्यक्तीच्या बँक खात्याच्या तपशीलाची चोरी केली.

लॉकडाऊनमुळे बर्‍याच कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करायला भाग पाडले जात आहे. कार्यालयांच्या तुलनेत घरी सायबर सुरक्षेचा असलेला अभाव हा सायबर गुन्हेगारांसाठी वरदान ठरत आहे. इंडीयन कम्प्युटर इमरजेन्सी रिस्पॉन्स टीमने (आयसीईआरटी) खुलासा केला आहे, की अलीकडील काळात घरगुती उपकरणांवरील सायबर हल्ले वाढले आहेत. सायबर हल्ल्यांसंबंधित ताज्या अभ्यासानुसार केरळमध्ये सर्वाधिक सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे.

चार वर्षांपूर्वी पाकिस्तानशी संबंधित असलेल्या सायबर हल्लेखोराने भारतीय दूतावासावर हल्ला करण्यासाठी क्रिम्सन आरएटी (Crimson RAT) नावाच्या मालवेअरचा वापर केला होता. अलीकडेच सायबर हल्लेखोराने बनावट ई-मेलचा वापर करून कम्प्युटरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा एक समान हॅकिंग प्रयत्न समोर आला आहे.

कोरोना संबंधित माहिती देण्यासाठी केंद्र सरकारनेही प्रतिष्ठित आरोग्य सेतू अ‍ॅप सुरू केले आहे. परंतु या अ‍ॅपच्या सुरक्षितते बाबतच्या त्रुटी अनेक वेळा उघडकीस आल्या आहेत. अशा परिस्थितीत सीबीआय केवळ केंद्र व राज्य सरकारला इशारा देत असेल तर यातून काय सिद्ध होते? तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक अग्रेसर देश म्हणून भारताने आपल्या लोकांच्या रक्षणासाठी सायबर दहशतवादाविरूद्ध सक्रियपणे लढा देणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.