ETV Bharat / opinion

AI Development In India : आर्थिक विकासासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व काय? - AI

AI Development In India : जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर झपाट्यानं वाढत आहे. भारत देखील या दिशेने काम करत आहे. परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे AI तंत्रज्ञान लोकांसाठी फायदेशीर असले तरी, त्याचा अनेक प्रकारे गैरवापर देखील होऊ शकतो. या मुद्द्यावर डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ एल मारुती शंकर यांचं विश्लेषण वाचा...

AI Development In India
AI Development In India
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 6:16 PM IST

मुंबई AI Development In India : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) मानवतेवर आधीच मोठा प्रभाव पडलाय. त्यामुळे सरकार आणि खाजगी क्षेत्रातील संस्था या दोघांनीही याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अमेरिका, चीन तसेच विविध युरोपीय देशांमध्ये एआय मध्ये वेगानं प्रगती होत आहे. हे देश 'एआय'शी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेत आहेत. युएई आणि सौदी अरेबियासारखे आखाती देशही यात सक्रियपणे सहभागी होत आहेत.

  • भारताकडून प्रयत्न चालू : दुसरीकडे, भारतही डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना फळ मिळेल याची खात्री करणं महत्त्वाचंय. तसेच अधिक संसाधनंचं वाटप करणही आवश्यक आहे. यात सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. सरकारनं मार्ग मोकळा केल्यास, खासगी क्षेत्रातील संस्था आयटी क्षेत्रात मोठं यश मिळवून उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.

एआयच्या क्षेत्रात विशेष प्रकल्प सुरू : रिलायन्स ग्रुप ही भारतातील खाजगी क्षेत्रातील संस्था एआय मॉडल्स तयार करण्यात सक्रियपणे गुंतलेली आहे. त्यांनी एआय ऍप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी दोन एक्झाफ्लॉप्सच्या एआय संगणकीय क्षमतेसह एक कॅम्पस स्थापित केला आहे. टेक महिंद्रा आणि आयआयटी मद्रास सारख्या भारतीय संस्थांसोबतच्या सहकार्यामुळे एआयच्या क्षेत्रात विशेष प्रकल्प सुरू झाले आहेत. यामध्ये भारताच्या आर्थिक विकासात लक्षणीय वाढ करण्याची क्षमता आहे. परिणामी, उत्पन्नाची पातळी वाढते तसंच लोकांचं जीवनही सुधारते.

  • AI च्या वापराबाबत भारत अजूनही प्राथमिक टप्प्यात : सिंगापूरमध्ये, AI चा वापर आर्थिक निर्देशक ओळखण्यासाठी केला जातो. तर नेदरलँड्समध्ये, कल्याणकारी कार्यक्रमांचा गैरवापर करणाऱ्यांना ओळखण्यासाठी सरकार AI चा वापर करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) बाबत भारत अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे. भारतात एआय तंत्रज्ञानाचा वापर आणि या क्षेत्रातील विकास अजूनही मर्यादित आहे.
  • सरकारकडून पुरेसं समर्थन आवश्यक : AI मधील संशोधन आणि विकास (R&D) क्षेत्रात लक्षणीय प्रगती करण्यासाठी खासगी क्षेत्रातील संस्थांना पुढाकार घ्यावा लागेल. सरकारनं पुरेसं समर्थन आणि नियमन प्रदान केलं पाहिजे. भारतानं AI मध्ये अग्रेसर होण्यासाठी स्वतंत्रपणे नवीन ऍप्लिकेशन विकसित केले पाहिजेत. हे साध्य करण्यासाठी संशोधनात पुरेशी गुंतवणूक, स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करणे आणि संसाधनांचे कार्यक्षम वाटप महत्त्वाचं आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता : AI मध्ये आगामी काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता आहे. पुढील काही दशकांत भारताच्या आर्थिक मूल्यात ट्रिलियन डॉलर्सची भर घालण्याची क्षमता एआयमध्ये असल्याचं विश्लेषणातून दिसून आलं आहे. भारत मजबूत AI शक्ती म्हणून वेगानं उदयास येत आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या दिशेनं प्रयत्न सुरू केले आहेत.

विविध क्षेत्रात AI चा सक्रियपणे वापर : आधार, UPI, डिजिटल लॉकर, CoWin प्लॅटफॉर्म, उमंग आणि इतर अनेक याची उदाहरणं आहेत. भारतीय संशोधक आणि संस्था बायोमेट्रिक्स, प्रत्यक्ष संशोधन, महिला सुरक्षा यांसारख्या विविध क्षेत्रात AI चा सक्रियपणे वापर करत आहेत. AI विविध प्रकारे जनतेची सेवा करू शकतं. विशेषतः ई-गव्हर्नन्स प्रकल्पांमध्ये. केंद्र आणि राज्य सरकार या दिशेनं अनेक कार्यक्रम राबवत आहे.

भारताला AI ऍप्लिकेशन्स वाढवण्याची गरज : IBM चे अध्यक्ष आणि CEO अरविंद कृष्णा यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत अधोरेखित केल्याप्रमाणे, भारताला प्रगती करण्यासाठी AI ऍप्लिकेशन्स वाढवण्याची गरज आहे. तसेच राष्ट्रीय AI संगणकीय केंद्र स्थापन करण्याचीही आवश्यकता आहे. वाढत्या मानव संसाधनासह भारत आयटी क्षेत्रात प्रगती करत आहे. तरुण व्यावसायिक स्टार्टअपला प्रोत्साहन देत आहेत आणि विविध डिजिटल सेवा पुरवत आहेत.

  • भारतामध्ये मार्गदर्शक शक्ती बनण्याची क्षमता : भारतामध्ये AI च्या क्षेत्रात इतर देशांसाठी मार्गदर्शक शक्ती बनण्याची क्षमता आहे. मोदी सरकारनं डिजिटल तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखून या दिशेनं महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. तथापि, AI च्या जबाबदार आणि नैतिक वापराचे आव्हानं अजूनही आहे. जी २० शिखर परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य करताना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चर्चेला वेग आला आहे.

AI चा दुरुपयोग केला जाऊ शकतो : AI च्या संभाव्यतेचा खऱ्या अर्थानं उपयोग करण्यासाठी, त्याचा गैरवापर टाळण्यासाठी आणि गोपनीयतेचं संरक्षण करण्यासाठी नियम लागू केले पाहिजेत. सत्तेतील लोकांबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यासाठी, प्रतिष्ठित कंपन्यांचं अवमूल्यन करण्यासाठी आणि गुन्हेगारांना कायद्यापासून संरक्षण देण्यासाठी AI चा दुरुपयोग केला जाऊ शकतो. AI बद्दल ग्राहकांना शिक्षित करण्यासाठी आणि AI च्या गैरवापराला परावृत्त करण्यासाठी जागरुकता मोहिमा सुरू केल्या पाहिजेत. हा सर्वसमावेशक दृष्टीकोन सुनिश्चित करेल की AI चे फायदे सर्वांपर्यंत पोहोचतील आणि भारत या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात त्याचं नेतृत्व करू शकेल.

हेही वाचा :

  1. NPCI Launched Hello UPI : आता आवाजाद्वारे होणारं यूपीआय ट्रान्झॅक्शन; म्हणा हॅलो यूपीआय, त्वरित केले जाईल पेमेंट
  2. Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारातील वाढत्या प्रवेशानं क्लायमेट ट्रेंड्सने रिलीज केला 'ईव्ही डॅशबोर्ड'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.