टेक डेस्क - चीनची स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी Xiaomi ने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'Redmi Go' भारतात लाँच केला आहे. 'Redmi Go' साठी लीडिंग ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने पूर्वी पासूनच एक डेडिकेटेड पेज बनवले होते. MI स्टोर्सच्या व्यतिरिक्त ई-कॉमर्स साईट वरुनही हा मोबाईल खरेदी करता येणार आहे.
'Redmi Go' ची किंमत
'Redmi Go' च्या बेस व्हेरिएंटची (1GB/8GB) किंमत ४,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. जेव्हा की अन्य व्हेरिएंट (2GB/32GB) सध्या भारतात लाँच करण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनला प्रमुख ई-कॉमर्स वेबसाईटच्या व्यतिरिक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोर्सवरुन २२ मार्चपासून विकत घेता येणार आहे.
'Redmi Go' चे फिचर्स
- ५ इंचीचा एचडी डिस्प्ले
- रिजोल्यूशन 720x1280 पिक्सेल
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट प्रोसेसर
- अँड्रॉईड गो ऑपरेटिंग सिस्टम
- ८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह
- सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेल कॅमेरा (एचडीआर फिचरसह)
- मेमोरी (मायक्रोएसटी कार्डच्या माध्यमातून १२८ GB पर्यंत वाढवता येणार)
- मायक्रो युएसबी आणि ३.५ एमएमचे ऑडिओ जॅक
- ३,००० एमएएच बॅटरी