टेक डेस्क - रिअलमीचा नवा स्मार्टफोन रिअलमी 3 गेल्या काही आठवड्यापासून चर्चेत आहे. हा फोन येत्या ४ मार्चला लाँच करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने मीडिया इनवाईट पाठवणे सुरू केले असून फोनच्या लाँचिंगसंबंधी माहिती रिअलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांनी ट्विट करुन दिली आहे.
रिअलमी 3 च्या स्पेसिफिकेशन संबंधी कंपनीकडून अद्याप काही माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र फोनशी संबंधीत एक फोटो लीक झाला होता. या फोटोला बघून फोनच्या बॅक पॅनलवर ब्लॅक ग्रेडियन्ट फिनिश असणार आहे, असा अंदाज लावण्यात येत आहे. यासह फोनमध्ये रिअलमी 1 सारखा डायमंड कटही मिळणार.
फोटोवरुन असे समजते की फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर नसणार. त्यामुळे शक्यता आहे की कंपनी फोनला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह लाँच करणार. याशिवाय रिपोर्ट्सनुसार फोनमध्ये मीडियाटेकचे हिलियो पी-70 प्रोसेसर असणार आहे. रिअलमीने काही महिन्यापूर्वीच रिअलमी यू 1 भारतीय बाजारात सादर केला होता. या फोनमध्ये हिलियो पी-70 प्रोसेसर देण्यात आले होते. या फोनमध्ये २५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि ६.३ इंचीचा डिस्प्ले आहे. या फोनची विक्री ऑफलाईन आणि ऑनलाईन स्टोरमधून होत आहे.